Type Here to Get Search Results !

संतसूर्य

बबनराव आवताडे गटाची मंगळवारी जोगेश्वरी मंगल करण्यात बैठक, नाते विश्वासाचे आपुलकीचे


मंगळवेढा संतसूर्य वृत्तसेवा  

मंगळवेढा तालुक्याचे लोकनेते बबनराव आवताडे यांच्या गटाची बैठक मंगळवारी सकाळी 11 वाजता जोगेश्वरी मंगल कार्यालय येथे आयोजित करण्यात आली आहे विधानसभेच्या निवडणूक संदर्भात या बैठकीत कार्यकर्त्याबरोबर हितगुज करून विचार विनिमय करून निर्णय घेतला जाणार आहे.
मंगळवेढा तालुक्यात सहकार क्षेत्रात गेली 40 वर्षे वर्चस्व गाजवणारे व सहकाराच्या माध्यमातून सर्वसामान्य शेतकऱ्यांना सर्वसामान्य जनतेला मदत करणारी व्यक्तिमत्त्व म्हणून बबनराव आवताडे यांची मंगळवेढा तालुक्यात ओळख निर्माण झालेली आहे विधानसभेच्या निवडणुकीत बबनराव अवताडे गटाने काय भूमिका घ्यावी यासाठी स्वतः बबनराव आवताडे व युवक नेते सिद्धेश्वर अवताडे हे निर्णय न घेता आपल्या कार्यकर्त्याबरोबर समर्थकांबरोबर जोगेश्वरी मंगल कार्यालयात विचार विनिमय करून कार्यकर्त्यांचे मनोगत ऐकून तालुक्याच्या विकासासाठी मंगळवेढा तालुक्यातील जनतेच्या हिताच्या निर्णयासाठी कार्यकर्त्यांकडून येणाऱ्या सूचनांचा आदर करून योग्य तो निर्णय घेणार आहे विधानसभेच्या निवडणुकीसाठी अवताडे गटाची भूमिका निर्णय ठरणार आहे बबनराव अवताडे हे स्वयंभू नेतृत्व असून त्यांनी आपल्या नेतृत्वाखाली अनेक सहकारी संस्था यशस्वीपणे चालवलेले आहेत शिक्षण कमी असताना सुद्धा त्यांनी राजकारणात मोठ्या प्रमाणात यश मिळवत तालुक्याच्या विकासात मोठे योगदान दिले आहे यामुळे आज होणाऱ्या अवताडे गटाच्या बैठकीकडे पंढरपूर मंगळवेढा तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे लोकसभेच्या निवडणुकीत बबनराव अवताडे गटाने लक्ष्मीनारायण मंगल कार्यात बैठक घेऊन विद्यमान खासदार प्रणितीताई शिंदे यांना पाठिंबा दिला होता यामुळे या निवडणुकीत मंगळवेढा तालुक्यातून अवताडे गटाने सुमारे 25000 मताचे मताधिक्य खासदार प्रणितीताई शिंदे यांना मिळवून दिले होते या पार्श्वभूमीवर या निवडणुकीत बबनराव अवताडे व सिद्धेश्वर अवताडे यांच्या भूमिकेकडे पंढरपूर मंगळवेढा च्या तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे

Post a Comment

0 Comments