सिताराम शुगरच्या १४ व्या गळीत हंगामाचा प्रारंभ
मंगळवेढा /संतसूर्य वृत्तसेवा
सिताराम महाराज साखर कारखाना (खर्डी) लि., च्या व्यवस्थापनाने यंदाच्या गळीत हंगामात सहा लाख मे. टन ऊस गाळपाचे उद्दिष्ठ ठेवलेले आहे. व्यवस्थापनाचे हे उद्दिष्ठ साध्य करण्यासाठी ऊस पुरवठादार शेतकरी, ऊस तोडणी व वाहतुक कंत्राटदार, हितचिंतक, कारखान्याचे अधिकारी व कर्मचा-यांनी संपुर्ण सहकार्य करुन यंदाच्या गळीत हंगामात उच्चंकी गाळप करून यशस्वी करावा, तसेच चांगल्या प्रतिचा परिपक्क्व ऊस गाळपास आणुन शेतकऱ्यांनी त्याच्या घामाचा दाम मिळावा असे आवाहन कारखान्याचे मुख्य प्रवर्तक प्रा. शिवाजीराव काळुंगे यांनी केले.
कारखान्याच्या २०२४-२५ च्या १४ व्या गळीत हंगाम शुभारंभ ऊस विकास अधिकारी इस्माईल अत्तार व शेती विभागातील सर्व गटातील गट प्रमुख व त्यांच्या सुविद्य पत्नी यांचेहस्ते करण्यात आला. यावेळी कारखान्याचे मुख्य प्रवर्तक प्रा. शिवाजीराव काळुंगे व चेअरमन प्रा. शोभाताई काळुंगे उपस्थित होते अध्यक्षस्थानी ह.भ.प. जयवंत बोधले महाराज होते, तत्पुर्वी कारखान्याचे मुख्य शेती अधिकारी कल्याणराव पताळे व सुधाकर देशमुख या उभयतांच्या शुभहस्ते गव्हाण व काटापुजन करण्यात आले.
प्रा. शिवाजीराव काळुंगे पुढे म्हणाले, उद्योग उभारणीकरीता मन, मेंदु व मनगटामध्ये इच्छाशक्ती असावी लागते आपले धनश्री, सिताराम व आष्टी शुगर परिवारावर सर्व शेतकरी व कष्टकरी बांधवांमध्ये खुप प्रमाणात विश्वास निर्माण झालेला आहे. तसेच आपला कारखाना इतर कारखान्यांच्या बरोबरीने व वेळेवर दर देण्याची प्रथा कायम ठेवत आलेला आहे व यापुठेही असेच कार्य करत राहील. सध्यस्थितीमध्ये कारखान्याचे विस्तारीकरण केल्यामुळे उच्चांकी गाळप करून कामगारांना त्यांच्या कामाचा योग्य मोबदला वेळेवर अदा केला जाईल असे अश्वासन दिले. यंदाचा गाळप हंगाम यशस्वी करण्याची जबाबदारी ऊस पुरवठादार शेतक-यांची आहे. हि जबाबदारी ऊस पुरवठादार शेतकरी पार पाडतील अशी अपेक्षा व्यक्त केली.
ह.भ.प. जयवंत बोधले महाराज यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतात धनश्री व सिताराम शुगर परिवाराची सुरु असलेली घैडदौड कौतुकास्पद असल्याचे सांगुन उत्तरोत्तर अशीच प्रगती होत जावो अशी सदिच्छा व्यक्त केली व गळीत हंगामास शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक कारखान्याच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सौ. राजलक्ष्मी काळुंगे- गायकवाड यांनी केले.
यावेळी कारखान्याचे विस्तारीकरण केलेल्या कॉन्ट्रॅक्टर, सर्व विभागप्रमुख व शेतीविभागातील ओव्हरसिअल यांचा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी कारखान्याच्या संचालिका ॲड. दिपाली काळुंगे-पाटील, संचालिका स्नेहल काळुंगे- मुदगल, संचालक दत्तात्रय सुर्यवंशी, कार्यकारी संचालक सुयोग गायकवाड, शिखर पाटील, प्रकाश काळुंगे, प्रा.गोरे , कायदे सल्लागार शैलेश हावनाळे, भविष्य निर्वाह निधीचे सल्लागार संकेत बिंगी, उद्योजक सार्थक कावळे,
कारखान्याचे जनरल मॅनेजर हणमंतराव पाटील, श्री सिताराम अर्बनचे व्यवस्थापक लक्ष्मण पवार, सिताराम अर्बनच्या संचालिका राधिका पराडे-पाटील, प्यारेलाल सुतारसो, प्रगतशिल बागायतदार, बिभिषन ताड, सोमनाथ आरे, शेटफळ ग्रामपंचायत माजी सरपंच मारुती मासाळ, आसवाणी प्रकल्पचे जनरल मॅनेजर राहुल बडवे, चिफ इंजिनिअर श्रीकांत रोंगे, परचेस ऑफिसर ओंकार घोडके, चिफ केमिस्ट अरविंद वाघमारे, को-जन मॅनेजर अमित गाजरे , फायनान्स मॅनेजर विजय कोकरे, सिव्हील इंजिनिअर राजेद्र वायदंडे, केनयार्ड सुपरवायझर जी. जी. शिदे, स्टोअर किपर अमोल सातपुते, आष्टी शुगरचे मुख्य शेती अधिकारी तानाजी कदम, सुरक्षा अधिकारी अस्लम पठान, टाईम किपर राकेश जाधव तसेच सर्व कर्मचारी, ऊस पुरवठा ठेकेदार, कॉन्ट्रॅक्टर, ऊस उत्पादक शेतकरी आदी उपस्थित होते.कार्यक्रमाचे आभार कारखान्याचे जनरल मॅनेजर हणमंतराव पाटील यांनी केले.
Post a Comment
0 Comments