Type Here to Get Search Results !

संतसूर्य

राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आणण्यासाठी अनिल दादा सावंत यांना विजयी करा खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांचे आवाहन 


मंगळवेढा / संतसूर्य वृत्तसेवा

 पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार अनिल दादा सावंत असून त्यांच्या तुतारी या चिन्हावर मतदान करून त्यांना बहुमताने विजयी करा राज्यात महाविकास आघाडीचे सत्ता आणण्यासाठी तुम्ही आम्हाला मतदान करा असे आवाहन माढ्याचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी केले ते अनिल दादा सावंत यांच्या प्रचार सभेत मंगळवेढ्यात मारुतीच्या पटांगणात बोलत होते व्यासपीठावर माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे रतनचंद शहा सहकारी बँकेचे चेअरमन राहुल भैया शहा उमेदवार अनिल दादा सावंत शिवसेना शहराध्यक्ष दत्ताजीराव भोसले माजी उपनगराध्यक्ष चंद्रशेखर कोंडुभैरी युवक नेते जमीन इनामदार राष्ट्रवादीचे तालुका प्रथमेश पाटील बबन डावरे सर प्राध्यापक सुरेश कट्टे यांच्यासह अनेक जण व्यासपीठावर होते यावेळी बोलताना मोहिते पाटील यांनी सोलापूर जिल्ह्यामध्ये 2009 या वर्षापासून जिल्ह्याला पालकमंत्री मिळू शकला नाही जिल्ह्याचे मोठे राजकीय नुकसान झाले. मंगळवेढा तालुक्यामध्ये आम्ही सायन्स कॉलेज बंद पडले होते म्हणून विनाअंदाने सायन्स कॉलेज सुरू केले यामुळे विद्यार्थी विद्यार्थिनींची सोय झाली अन्यथा विद्यार्थ्यांना सांगोला पंढरपूर सोलापूर या ठिकाणी जावे लागत होते 2009 मध्ये जो पराभव झाला याची साक्षीदार माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे हे स्वतः आहेत मात्र आम्ही पराभवाने खचून जात नाही आम्ही जिल्ह्याच्या विकासासाठी काम करत आहे या पुढील काळात देखील करत राहू. असे स्पष्ट करून त्यांनी अनिल सावंत यांना मतदान करण्याचे आवाहन केले यावेळी माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांनी आमदार समाधान दादा अवताडे यांना माझ्यासारखे माजी आमदार करा असे आवाहन करून अवताडे यांच्यावर सडकून टीका केली पंढरपूर मंगळवेढ्यातून समाधान आवताडे यांची राजकीय सुटका करा. त्यांना पराभूत करून राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आणा असे आवाहन केले यावेळी राहुल शहा म्हणाले आम्ही गेल्या तीन पिढ्यापासून शरद पवार यांच्याशी एकनिष्ठ असून त्यांचे मार्गदर्शनाखाली राजकीय सामाजिक कार्य करत आहे त्यांच्या मार्गदर्शनामुळे व त्यांच्या मदतीमुळे मंगळवेढा तालुक्याचा आर्थिक सामाजिक सांस्कृतिक कृषी सर्व क्षेत्रात विकास झालेला आहे यापुढे देखील शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी शरद पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तुतारी चिन्हाला विजयी करावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

Post a Comment

0 Comments