धनगर समाजाचा आमदार समाधान आवताडे यांना पाठिंबा जाहीर
मंगळवेढा संतसूर्य वृत्तसेवा
मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील धनगर बांधवांनी भाजपा महायुतीचे उमेदवार समाधान आवताडे यांना आपला पाठींबा जाहीर करुन त्यांच्या विजयाचा पक्का निर्धार यावेळी व्यक्त केला. श्री.काशीविश्वेश्वर मंगल कार्यालय, मंगळवेढा येथे बांधवांची बैठक संपन्न झाली त्यावेळी हा पाठिंबा जाहीर करण्यात आला.
सदर बैठकीप्रसंगी प्रास्ताविक करताना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा कार्याध्यक्ष रामेश्वर मासाळ यांनी सांगितले की, कोणत्याही प्रकारचे गटातटाचे अथवा जातीचे राजकारण न करता आमदार समाधान आवताडे यांनी सामान्य माणसाला केंद्रस्थानी ठेवून या मतदारसंघांमध्ये विकासाच्या रूपाने खूप मोठे परिवर्तन केले आहे. त्यांचा विकासाबद्दल असणारा व्यापक दृष्टिकोन आणखी गतिमान होण्यासाठी सकल धनगर बांधवांनी त्यांना एकमुखाने पाठिंबा जाहीर केला आहे. धनगर बांधवांची ही एकोप्याची वज्रमूठ आमदार समाधान आवताडे येणाऱ्या काळामध्ये आणखी परिपूर्ण करतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
यावेळी श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याचे माजी व्हाईस चेअरमन सूर्यकांत ठेंगील यांच्या सार्वजनिक जीवनातील कार्य व्यापकतेची योगदान लक्षात घेऊन त्यांची पंढरपूर मंगळवेढा धनगर बांधव कमिटीच्या समन्वयक पदी सर्वानुमते निवड करण्यात आली. माझ्या धनगर बांधवांनी माझ्यावर सोपवलेल्या या जबाबदारी साठी मी कटीबद्ध असून समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी आमदार समाधान आवताडे यांच्या माध्यमातून मोठे कार्य उभा करू असे त्यांनी यावेळी सांगितले.
धनगर समाज बांधवांनी आपुलकीने केलेले स्वागत आणि दिलेल्या आश्वासक अपेक्षित प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक आभार व्यक्त करुन समाजाच्या विकासासाठी असलेल्या योजना व आवश्यक सुधारणा यावर चर्चा करण्यात आली. कोणत्याही सामाजिक जात, धर्म, पंथ अथवा इतर भेद यांच्या भिंती उभ्या न करता आवताडे परिवाराने नेहमीच सर्वसमावेशक मानवतेच्या कर्तव्याला प्राधान्य दिल्याचे आमदार आवताडे यांनी यावेळी आवर्जून नमूद केले.
यावेळी जिल्हा नियोजन समिती सदस्य प्रदीप खांडेकर, धनगर समाज समन्वय समितीचे नूतन अध्यक्ष सूर्यकांत ठेंगील, जेष्ठ नेते माऊली हळणवर, भाजपा तालुकाध्यक्ष अंबादास कुलकर्णी, उद्योजक रामचंद्र सलगर, कृषिभूषण अंकुश पडवळे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक जगन्नाथ रेवे, माजी उपसभापती सूर्यकांत ढोणे, माजी सभापती सुधाकर मासाळ, सरपंच विजय माने, माजी उपसभापती शिवाजीराव पटाप, ओबीसी महिला नेत्या विश्रांती भुसनर, रुक्मिणी दोलतोडे, सरपंच शिवाजी सरगर, विठ्ठल सरगर, राजाराम कालिबाग, अमोल माने, मायाप्पा पांढरे, माजी सरपंच रवी खांडेकर, देवा घोडके, युवक नेते बापूसाहेब काकेकर, जयराम आलदर तंटामुक्ती अध्यक्ष अभिजित लोखंडे, माजी सरपंच मरगू कोळेकर आदी मान्यवर तसेच समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते..
Post a Comment
0 Comments