Type Here to Get Search Results !

संतसूर्य

पुन्हा एकदा शेटजीच्या वाड्याचे राजकीय महत्व झाले स्पष्ट , अनिलदादा सावंत विजयी होणार


मंगळवेढा/ विक्रांत पंडित 

मंगळवेढा तालुक्याच्या राजकारणात स्वर्गीय रतिलाल शेठजींच्या वाड्याचे महत्व तिसऱ्या पिढीने टिकवून ठेवले आहे. मंगळवेढा तालुक्याचे माजी आमदार किसनलाल मर्दा माजी नगराध्यक्ष रतनचंद शहा यांनी तालुक्याच्या राजकारणामध्ये 40 ते 50 वर्ष वर्चस्व ठेवले यामध्ये रतनचंद शहा यांनी मंगळवेढा अर्बन बँकेची स्थापना केली. तालुक्यातील 88 सहकाऱ्यांना घेऊन विद्या विकास शिक्षण मंडळ संस्थेची संत दामाजी कॉलेज, डामजी हायस्कूल स्थापना केली नगरपालिकेच्या नगराध्यक्ष म्हणून राज्यात सर्वाधिक काळ नगराध्यक्षपद उपभोगले .त्यांनी मंगळवेढा शहराचा कायापालट करून दाखवला. सामाजिक वारसा असलेले नेतृत्व म्हणून रतिलाल शेडजी यांच्याकडे पाहिले जात होते .शरद पवार यांचे खंदे समर्थक, कट्टर अनुयायी म्हणून त्यांची सोलापूर जिल्ह्यात ओळख होती. त्यांनी मंगळवेढा शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात विकासाची कामे केली. मंगळवेढ्याची बाजारपेठ उभी केली. बँकेच्या माध्यमातून अनेकांना आधार दिला .अशी ख्याती असलेले शेडजी वृद्धापकाळाने निधन झाल्यानंतर त्यांच्या पश्चात सुभाषशेठ यांनी नगरपालिका, नगरपालिका शिक्षण मंडळ ,अर्बन बँक, दामाजी कॉलेज , संत दामाजी व जवाहरलाल हायस्कूल आदी ठिकाणी सक्षम असे प्रशासन चालवले. सामाजिक वारसा जपला. दुदैवाने त्यांचे अपघाती निधन झाल्यानंतर तिसरी पिढी म्हणून राहुल भैया शहा यांनी सर्व संस्थेची राजकारणाची सूत्रे हाती घेतली. मंगळवेढा तालुक्याच्या राजकारणात त्यांनी स्वच्छपणा आणला.चांगुलपणा आणला संस्था स्वच्छपणे चालवल्या राजकीय विरोधक अकसापोटी त्यांच्यावर आरोप करत आहेत परंतु खोट्या आरोपाकडे त्यांनी दुर्लक्ष करत सर्व ठिकाणी कामकाज सक्षमपणे चालू केले आहे .नुकत्याच विधानसभेच्या निवडणुकीत त्यांनी लवंगी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष अनिलदादा सावंत यांना पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्याकडून उमेदवारी मिळवून दिली. राज्यात अतिशय राजकीय परिस्थिती प्रत्येक प्रतिकूल असताना राहुल भैया शहा यांनी त्यावर मात करत तानाजी सावंत यांचे पुतणे अनिलदादा सावंत यांना उमेदवारी मिळवून दिली आहे यावरून त्यांची राजकीय पोहोच ताकद किती आहे हे संपूर्ण जिल्ह्याने पाहिले आहे. शहा कुटुंबीयाचे गेली 50 वर्षे पवार कुटुंबीयांवर प्रेम आहे राहुलभैय्या शहा यांनी आपली राजकीय ताकद पणाला लावून अनिलदादा सावंत यांना उमेदवारी मिळवून दिल्यामुळे सोलापूर जिल्ह्यात शरद पवार यांच्या जवळचे व्यक्तिमत्व म्हणून राहुलभैया शहा यांची नोंद झाली आहे .पक्ष टिकवणे, संघटना मजबूत करणे, पक्षाची ध्येय धोरण तळागाळाशी नेणे ,सामान्य जनतेशी पक्षाला जोडणे अशा पद्धतीने प्रांतिक सदस्य म्हणून राहुल भैया शहा यांनी मंगळवेढा तालुक्यात काम केले. शहा कुटुंबीयांचे मंगळवेढा शहर व तालुक्यावर खूप मोठे उपकार आहेत. त्यांच्या उपकाराचे ओझे कार्यकर्त्यांनी समर्थकांनी किती काम केले तरी फिटू शकत नाही .1985 मध्ये लक्ष्मण ढोबळे यांना पवार साहेबांचा आदेश म्हणून रतनचंद शहा यांनी आमदार केले .वीस वर्ष ढोबळे यांनी आमदार,मंत्री म्हणून काम पाहिले परंतु ढोबळे यांनी शेवटच्या टप्प्यात रतनचंद शहा यांच्याबरोबर राजकीय मतभेद केले . याबाबत एक मोर्चा आल्यानंतर नाराज झालेल्या संतप्त झालेल्या कार्यकर्त्यां समोर बोलताना शेटजी म्हणाले,सोने सांभाळण्यासाठी चिंधी सांभाळत आहे .ही राजकीय आठवण नवीन कार्यकर्त्यांना माहित नाही ,युवा पिढीला माहीत नाही ,इतके प्रेम स्वर्गीय रतनचंद शहाचे शरद पवार यांच्यावर होते. किंबहुना त्यामुळे 2004 मध्ये ढोबळेंना उमेदवारी मिळू शकली नाही अवघ्या पंधरा दिवसात रतनचंद शहा यांनी राम साळे यांना आमदार केले. रतीलाल शहा यांच्या पश्चात सुभाष शहा यांनी राजकीय सामाजिक क्षेत्रात काम केले. दुर्दैवाने त्यांच्या निधनानंतर राहुल शहाने अर्बन बँक, दामाजी कॉलेज जवाहरलाल हायस्कूल आदी संस्था सुस्थितीत आणून ठेवले. आत्ता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर अजितदादा पवार यांनी चाळीस आमदार घेऊन बाहेर गेल्यानंतर अडचणीत असलेल्या शरद पवार यांना आपल्या आहे त्या कार्यकर्त्याच्या माध्यमातून सहकार्य करण्याचा निर्णय घेतला चंद्रशेखर कोंडूभैरी प्रथमेश पाटील , संतोष रणदिवे ,मुझफ्फर काझी, किसन गवळी ,बाबासाहेब पाटील यांच्यासह लहान, मोठ्या, सर्व कार्यकर्त्यांना घेऊन आपली ताकद राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबरोबर ठेवली .त्या माध्यमातून त्यांनी अनिलदादा सावंत यांना उमेदवारी मिळवून देऊन आपले शरद पवार यांच्यापाशी किती मोठे वजन आहे हे दाखवून दिले .आता मंगळवेढा तालुक्यात अनिल दादा सावंत यांना आमदार होण्याची संधी उपलब्ध झाली आहे .केवळ आणि केवळ ही संधी शहापरिवार व त्यांच्यावर प्रेम करणारे ज्येष्ठ नेते कार्यकर्ते युवक कार्यकर्ते या सर्वांमुळे निर्माण झाली आहे .पंढरपूर मंगळवेढा तालुक्यात सध्या अनिलदादा सावंत यांची हवा मोठ्या प्रमाणात निर्माण झाली आहे तुतारी चिन्हाचा लाभ मोठ्या प्रमाणात होणार असल्याचे दिसून येत आहे मनोज जरांगे पाटील यांच्या पॅटर्नचा लाभ देखील अनिल दादा सावंत यांना होणार आहे यामुळे अनिल दादा सावंत यांच्या विजयाची शक्यता मोठ्या प्रमाणात निर्माण झाली आहे त्यांच्यासाठी आत्तापर्यंत माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे खासदार अमोल कोल्हे यांच्या सभा झाले असून लवकरच शरद पवार जयंत पाटील यांच्या देखील जाहीर सभा पंढरपूर मंगळवेढ्यात होणार आहे लवंगीच्या कारखान्यामुळे अनिलदादा पाटील यांना मंगळवेढा पंढरपूर तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत आहे यामुळेच या शुगर पट्ट्यात अनिलदादा सावंत यांची हवा राहुलभैया शहा यांच्यामुळे मोठ्या प्रमाणात निर्माण झालेली दिसत आहे.

Post a Comment

0 Comments