सांगोला... जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खोमनाळ ता मंगळवेढा येथील उपक्रमशील शिक्षक श्री कांताराम तात्या बाबर यांना बेळगावी (कर्नाटक) येथील इंटिग्रेटेड सोशल वेल्फेअर सोसायटी (रजि)चि.बेळगावी या संस्थेच्या वतीने दिल्ली, कर्नाटक, महाराष्ट्र, गुजरात,व गोवा या राज्यातील सामाजिक व शैक्षणिक,व निमशासकीय क्षेत्रात उल्लेखनीय व अतुलनीय,नि:स्वार्थी व भरीवपणे कार्य करुन शाश्वत सेवा केलेबद्दल राष्ट्रीय आदर्श शिक्षक गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले..या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा वीरप्पा मोईली..मा मुख्यमंत्री कर्नाटक राज्य व या केंद्रिय कायदा मंत्री,भारत सरकार दिल्ली होते.. विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देऊन गुणवत्तेच्या सार्वत्रिकरणासाठी कार्य करणाऱ्या शिक्षकांचा तसेच वैद्यकीय, सामाजिक, राजकीय सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या १७६ व्यक्तींचा बेळगावी कर्नाटका येथे सन्मान करण्यात आला.यावेळी व्यासपीठावर अरविंद गट्टी पोलिस महासंघ अध्यक्ष बेंगलोर,राजु शिंगाडे माजी महापौर कोल्हापूर महानगरपालिका,सौ लिमये मॅडम जि.प.अध्यक्षा रत्नागिरी,सौ खडते मॅडम उपजिल्हाधिकारी कोल्हापूर, इन्चार्ज अध्यक्षा बाळु मामा देवस्थान ट्रस्ट अदमापुर, परशुराम बड साहेब जनसंपर्क अधिकारी गोवा , कर्नाटक, महाराष्ट्र राज्य, त्याचबरोबर श्री भारत भिमराव बिले सर.श्री रविकिरण पैलवान, श्री रघुनाथ हजारे सर.श्री संदीप कांताराम बाबर सर उपस्थित होते... श्री कांताराम बाबर सर हे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खोमनाळ ता मंगळवेढा येथे पदवीधर शिक्षक म्हणून कार्यरत आहेत... गेल्या ३३ वर्षांपासून विविध नाविण्यपूर्ण उपक्रम राबवित विद्यार्थ्यांना क्रुतीशील अध्यापन करणारे शिक्षक म्हणून जिल्हाभरात परिचित आहेत..चालु शैक्षणिक सालामध्ये २४मे २०२४ रोजी नाशिक येथे महाराष्ट्र शिक्षक पॅनल च्या वतीने राज्यस्तरीय आदर्श शिक्षक सेवा सन्मान पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.. त्यांनी निर्माण केलेल्या श्री वेताळ विद्यामंदिर शिरसी ता मंगळवेढा या संस्थेचे ते सचिव आहेत.१९९६ साली जुनोनी ता मंगळवेढा या ठिकाणी विद्यार्थ्यांना इयत्ता पाचवीपासून पुढील शिक्षणासाठी परगावी जावे लागत होते, म्हणून त्यांनी प्राथमिक शाळेस इयत्ता पाचवीचा वर्ग जोडुन विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी प्रयत्न केले तसेच शिरसी ता मंगळवेढा येथील विद्यार्थ्यांना सातवी नंतरचे शिक्षण घेण्यासाठी परगावी जावे लागत होते म्हणून शिरसीचे माजी सरपंच, श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक कै. काकासाहेब गायकवाड यांच्या सहकार्याने गावातच हायस्कूल सुरू करण्यासाठी पुढाकार घेऊन ग्रामस्थांच्या मदतीने आठवीपासून शिक्षणाची सोय शिरसी गावातच केली. श्री कांताराम बाबर सर यांना आजपर्यंत २०२३-२०२४ या शैक्षणिक वर्षामध्ये लोकमंगल फाऊंडेशन चार आदर्श शिक्षक पुरस्कार,व्रुक्षमित्र पुरस्कार, क्रुतीशील आदर्श शिक्षक पुरस्कार.श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याचा गुणवंत शिक्षक पुरस्कार,असे जवळपास दहा पुरस्कार मिळाले आहेत.त्यांना मिळालेल्या राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्काराबद्दल माजी आमदार दिपक आबा साळुंखे पाटील यांनी फोन करून शुभेच्छा दिल्या. यशनगर रहिवासी सांगोला व शिरसी ग्रामस्थांनी शुभेच्छांच्या वर्षाव केला... सांगोला नगरीचे संपादक व या नगरसेवक श्री सतिष भाऊ सावंत यांनी समक्ष भेटून शुभेच्छा दिल्या
Post a Comment
0 Comments