Type Here to Get Search Results !

संतसूर्य

समाधानदादा अवताडे यांना मिळणार पुन्हा आमदारकी....

 मंगळवेढा / विक्रांत पंडित 

पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीची मतमोजणी ही शनिवारी होणार असली तरी या निवडणुकीबाबत मतदार संघात चर्चा जोरात सुरू झाली आहे .कोण विजयी होणार, कोणाला किती मताधिक्य मिळणार, कोण कोणामुळे पडणार, तर कोण कोणाला पाडणार या पासून आमच्या गावात आम्ही चांगले केले आहे .आमच्या गटात पर्याय ठेवला नाही अशा चर्चांना उधान आले. असे असताना या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे विद्यमान आमदार समाधानदादा अवताडे हे परत एकदा माजी आमदार प्रशांतराव परिचारक मालक यांच्या सहकार्याने या मतदारसंघात कमळाचे फूल फुलवणार असल्याचे स्पष्ट दिसू लागले आहे. मतदान झाल्यानंतर मतदारांकडून होत असलेली चर्चा, मतदारांकडून सांगितले जाणारे वाक्य, कार्यकर्त्यांनी केलेले काम याबद्दल तर्कवितर्क याशिवाय बसल्या जागी गप्पामधील अनेक तर्क या सर्वांना छेद देऊन मिळालेल्या माहितीनुसार, परत एकदा पोटनिवडणुकीप्रमाणे पंढरपूर शहर समाधानदादा अवताडे यांना तारणार आहे. आमदार प्रशांत परिचारक यांच्या पांडुरंग परिवाराने केलेले काम परत एकदा आमदार समाधान दादा अवताडे यांना विधिमंडळ सभागृहात नेऊन बसवणार असल्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत. मंगळवेढा शहरात देखील यावेळी मोठ्या प्रमाणात समाधानदादा अवताडे यांना मताधिक्य मिळणार आहे. गेल्या निवडणुकीत चार हजार आठशे मताधिक्य मिळवलेले आमदार अवताडे या निवडणुकीत अधिक मताधिक्य मिळवण्यासाठी यशस्वी ठरले आहेत. शहरात मतदान 60 टक्के झाले असले तरी मतदानाचा आकडा हा समाधानदादा अवताडे यांच्या बाजूने अधिक असल्याचे त्यांच्या राजकीय विरोधकाकडूनही मान्य केले जात आहे. भीमनगर, साठे नगर मध्ये एकगठ्ठा मतदान समाधान आवताडे यांना मिळालेले दिसत आहे. निकालबद्दल असलेली उत्सुकता ही निवडणुकीच्या मतमोजणीतून स्पष्ट होईल.
 परंतु ज्या पद्धतीने भोसे गट भगीरथ भालके यांना मताधिक्य देईल असे सांगितले जात होते तितकी वढ भगीरथ भालके यांना या गटातून काढता येईल असे दिसत नाही. 24 गाव पाणी प्रश्नाचा प्रभाव आमदार अवताडे यांच्या बाजूने नसला तरी शंभर टक्के भगीरथ भालके यांच्या बाजूनेही झुकलेला दिसत नव्हता.  या भागातील निवडणूक ज्या पद्धतीने खेळली जाते, ज्या पद्धतीने चालवली जाते त्या पद्धतीने चालवण्यात भारत भालके यांना यश मिळत होते तसे भगीरथ भालके यांना यश मिळवता आले नाही. पोटनिवडणुकीत सहानभूतीवर भालके यांना यश मिळवता आले नाही परंतु तीन वर्षांनी होत असलेल्या सर्वसाधारण निवडणुकीत परत एकदा सहानुभूती निर्माण करण्याचा प्रयत्न भालके यांच्या समर्थकांतून केला जात होता. प्रचारात चित्र चांगले दिसत असले तरी प्रत्यक्ष मतदानात चित्र तितके उमटलेले दिसत नव्हते. भोसे गट वगळता इतर मरवडे गट, संत दामाजी नगर गट, संत चोखामेळा नगर गट या भागात पूर्वीसारखी परिस्थिती नसल्याचे दिसून आले आहे. यामुळे साधारण मंगळवेढा शहर व ग्रामीण भागात समाधान दादा यांची मताबाबत दादागिरी झालेली दिसत आहे. मतदारांनी मतदान रुपी दादागिरी समाधान आवताडे यांना बहाल केल्याचे चित्र दिसत आहे.
पंढरपूर ग्रामीण भागात आमदार अवताडे यांना मतदान मिळणार नाही अशी छातीठोकपणे त्यांचे विरोधक सांगत आहेत. परंतु ज्यांना समाधान आवताडे समजला नाही त्यांनी समाधान आवताडे यांच्या बद्दल, त्यांच्या राजकारणाबद्दल ते करत असलेल्या भविष्यातील खेळीबद्दल मत व्यक्त करणे चुकीचे ठरत आहे. अगदी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील प्रत्येक नेत्याला कार्यकर्त्याला असे वाटत असते की आपण आमदार अवताडे यांना सांगू आणि त्यांना तसे करायला सांगू. या कल्पनेत वावरणारांना या निवडणुकीत मोठा छेद मिळाला आहे. अवताडे यांनी तीन वर्षात परिचारक यांना नाराज न करता, परिचारक यांच्या कार्यकर्त्याला आपलेसे करण्याचा प्रयत्न देखील केलेला नाही. मुळात परिचारक व अवताडे यांनी भगीरथ भालके यांचा भालके गट पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यात किती कमकुवत केला आहे हे या निवडणुकीच्या निकालानंतर स्पष्ट होणार आहे. भगीरथ भालके यांचा पंढरपुरातील विठ्ठल कारखान्यातील पराभव हा त्यांना अधिक अडचणीत आणणारा ठरला आहे. पोट निवडणुकीतील पराभवानंतर, विठ्ठलच्या पराभवानंतर त्यांनी ज्या पद्धतीने राजकारण करणे आवश्यक होते त्या पद्धतीने केले नाही. हैदराबादचे राजकारण करण्याचा प्रयत्न केला म्हणून शरद पवार यांनी डावलले असले तरी, मुळात भगीरथ भालके यांनीच शरद पवार यांच्या खेळी पुढे आपली खेळी नेऊन राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा छेद दिला आहे. परंतु प्रत्यक्ष मतदारसंघात मतदाराबरोबर असलेल्या संपर्क नसल्यामुळे त्यांच्या गटाची होत असलेली होरपळ ही या निवडणुकीत त्यांना त्रासदायक ठरू लागली होती. त्यांच्या मतपत्रिका कार्यकर्त्यांमार्फत मतदानाच्या आदल्या दिवशी रात्री आल्या नाहीत. संध्याकाळी सांगितले येतील म्हणून, परंतु रात्र झाली तरी आल्या नाहीत, पहाटे आल्या नाहीत. शहरात, ग्रामीण भागात बऱ्याच ठिकाणी दुपारनंतर आल्या. या छोट्या छोट्या मत पत्रिका त्यांना अधिक लाभ मिळवून देऊ शकणार नाहीत अशी राजकीय परिस्थिती असल्याचे चित्र मतदारसंघात दिसत आहे. सैन्य हे पोटावर चालते त्यांना देखील कसरत केल्यानंतर, व्यायाम केल्यानंतर लढाई करण्यासाठी पोटाला अन्न ग्रहण करावे लागते. तरच त्यांना लढाई जिंकता येते. परंतु भगीरथ भालके व त्यांच्या समर्थकांना ही निवडणूक उपाशी राहून जिंकण्याची तीव्र इच्छा होती. या इच्छेमुळेच मतदारांची इच्छा असताना सुद्धा ते विजयापासून वंचित राहतील असे चित्र मतदारसंघात होत असलेल्या चर्चेतून दिसत आहे. शेवटी मतपेटीत मतदारांनी कोणाला मतदान केले आहे हे मतमोजणी नंतरच कळणार आहे. परंतु होत असलेल्या चर्चेत तर सध्या भगीरथ भालके हे पराभवाच्या छायेत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. प्रशांत परिचारक व समाधान आवताडे यांनी गेल्या पोटनिवडणुकीपासून विशेषता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली एकत्रित काम करण्यास सुरुवात केल्यापासून भालके गटाची ताकद पंढरपूर मंगळवेढा तालुक्यात संपवण्याचे काम सुरू झाले. त्यात त्यांना यश मिळाले आहे. यामुळेच या पोटनिवडणुकीनंतर सुद्धा सर्वसाधारण निवडणुकीत प्रशांत परिचारक यांनी भगीरथ भालके यांना राजकीय शहाणपण शिकवत या निवडणुकीत पराभवाचे पाणी आमदार समाधान आवताडे यांच्या हस्ते पाजण्याचा निर्णय घेतला. त्याप्रमाणे पाण्याचा ग्लास भरून भगीरथ भालके यांच्या हातात दिला आहे. अगदी मंगळवेढेकरांच्या भाषेत समाधान आवताडे यांनी कासेगाव एमआयडीसीच्या निमित्ताने केलेल्या गाण्यात एमआयडीसीचा पेढा भगीरथ भालके यांना चारला आहे. असे चित्र पंढरपूर मंगळवेढा तालुक्यातील मतदानानंतर मतदारात होत असलेल्या चर्चेनुसार स्पष्टपणे दिसत आहे.
या निवडणुकीत लोकसभेप्रमाणे जरांगे पाटील पॅटर्न घटना बदल संविधान बदल मुस्लिम समाज अडचणीत हे मुद्दे पुढे आले नाहीत याउलट भाजपा उमेदवार समाधान आवताडे यांच्या बाजूने लाडकी बहीण केंद्र व राज्य शासनाची शेतकरी प्रधानमंत्री किसान योजना याचा लाभ अवताडे यांना मोठ्या प्रमाणात झाला आहे

Post a Comment

0 Comments