चाळीस हजार निष्ठावंत शिवसैनिक असल्यामुळे
ष्काँग्रेस व राष्ट्रवादी शरद पवार पक्षाने पंढरपूर विधानसभेचा आघाडीचा उमेदवार कोण?याचा खूलासा करावा...प्रा येताळा भगत
मंगळवेढा/संतसूर्य वृत्तसेवा
पंढरपूर मंगळवेढा विधानसभेची रणधूमाळी जोरात होत आहे परंतू या विधानसभेसाठी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून अनिल सावंत व काँग्रेस पक्षाने भगिरथ भालके यानी आपापल्या पक्षाचे अधिकृत ए बी फाॅर्म जोडून उमेदवारी दाखल केल्या आहेत.अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवसापर्यत दोन्ही उमेदवारामध्ये समेट न होता दोन्ही पक्षाने आपापले उमेदवार उमेदवार लढवणार घोषित केले नारळ वाढवून प्रचाराच्या तोफा सज्ज केल्या,परंतू शिवसेना ठाकरे गट हा महाविकास आघाडीतील महत्वाचा घटक असूनही ,दोन्ही उमेदवार पक्षाकडे प्रचारात सहभागी होण्यासाठी विचारणा करीत असताना,त्याना महाविकास आघाडीची अधिकृत उमेदवारी कोणाची हे स्पष्ट झाल्याशिवाय शिवसेना प्रचारात सहभागी होणार नाही. असे जाहीर .केले आहे. पंढरपूर मंगळवेढा मतदार संघात 30ते40हजार निष्ठावान शिवसैनिक ज्याच्या पारडीत मतदान करतील तोच आमदार अशी परस्थिती आहे.याबाबत शिवसेना संपर्कप्रमूख मा.अनिल कोकीळसाहेब व जिल्हा प्रमूख मा. गणेशजी वानकर यांच्या आदेशानूसारच महाविकास आघाडीच्या उमेदवारीचा प्रचार जोमाने करणारआहे.आता प्रचाराचे फक्त दहा दिवसच उरले आहेत.या दोघाच्या वेगवेगळ्या भूमिकेमूळे महाविकास आघाडीचा आमदार कमी होवू नये ही शिवसेनेची भूमिका असल्याने तटस्थ भूमिका घेतली आहे.यावर महाविकास आघाडीच्या वरिष्ठानी अधिकृत उमेदवार कोण हे त्वरीत घोषित करण्याची अपेक्षा शिवसेना तालूकाप्रमूख प्रा येताळा भगथ यांनी व्यक्त केली आहे.
Post a Comment
0 Comments