*शेतकरी, सर्वसामान्यांच्या न्यायासाठी आ. समाधान आवताडे यांची बांधिलकी*
*आजपर्यंतच्या इतिहासात सर्वाधिक निधी आणून मतदारसंघाचा केला विकास*
मंगळवेढा (प्रतिनिधी) आमदार समाधान आवताडे यांनी तीन वर्षाच्या कालावधीमध्ये केलेल्या कामाची बांधिलकी ही सर्वसामान्य मतदारांच्या न्यायासाठी आहे. सिंचन, रोजगार, पर्यटन यातून ग्रामीण बांधवांचे आयुष्य उभारण्यासाठी आमदार समाधान आवताडे यांनी गेली तीन वर्षे सातत्याने काम केले. त्यात यशही आले. भविष्यातही या मतदारसंघाचे चित्र बदलविण्यासाठी अनेक योजना त्यांच्या दृष्टिपथात आहेत. त्या साकारण्यासाठी मतदार पाठीशी असल्याचे चित्र गावोगावी पाहण्यास सध्या मिळते आहे.
कोरोनानंतर मिळालेल्या तीन वर्षांत या मतदारसंघासाठी आजवर महाराष्ट्रात जेवढे काम कुणी केले नसेल, त्यापेक्षा जास्त कामे एकट्या आमदार समाधान आवताडे यांनी केले.
महायुतीचे सरकार येथील जनतेच्या पाठीशी आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस, दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील विकास कामांना गती दिली. तीन वर्षात 3000 कोटीची कामे महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून पार पडली. देवभूमी पंढरपूर व संतभूमी मंगळवेढा या तालुक्याचा केंद्र व राज्यसरकारच्या माध्यमातून विकास साधायचा असल्याने राज्यातही महायुतीचे सरकार आणण्यासाठी आणि या क्षेत्राच्या विकासासाठी मतदार हे समाधान आवताडे यांच्या पाठीशी असल्याचे गावोगावी होत असलेल्या प्रचारार्थ सभेमधून दिसत आहे.
अवघ्या तीन वर्षाच्या कार्यकाळात सुरू केलेला विकास
आमदार समाधान आवताडे नेटाने सुरू ठेवला. या भागाचा कायापालट करताना त्यांनी बेरोजगारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी पंढरपूर येथे हजारो एकरावर होणाऱ्या 'एमआयडीसी'मुळे मोठे उद्योग येणार आहेत. रस्ते, पाणी, सिंचन, शेती, उद्योगाच्या माध्यमातून पंढरपूर मंगळवेढा तालुक्याच्या विकासाला चालना देण्याचे काम आमदार समाधान आवताडे यांनी केले आहे. तीन वर्षाच्या कार्य काळामध्ये मिळालेल्या आमदारकीत आतापर्यंत समाधान आवताडे यांनी ना भूतो, ना भविष्यती अशी विकासगंगा आणली. त्यामुळे ही सुरू असलेली निवडणूक समाधान आवताडे हे एकतर्फी जिंकतील असा विश्वास जाणकार व्यक्ती व तरुण कार्यकर्ते सगळीकडे बोलून दाखवताना दिसत आहेत.
Post a Comment
0 Comments