Type Here to Get Search Results !

संतसूर्य

आ.समाधान आवताडे निवडून आल्यानंतर नितीन गडकरी  यांच्या माध्यमातून मतदारसंघात उद्योगाला मिळणार चालना

प्रशांत परिचारक यांनी मोठ्या मनाने माघार घेतली याचे ना. गडकरी यांनी विशेष कौतुक केले

मंगळवेढा / संतसूर्य वृत्तसेवा 

 देश बदलतोय हे आपल्याला 2014 पासून पाहायला मिळते. मेक इन इंडिया असो किंवा इतर माध्यमातून देशात सर्वत्र उद्योगाला चालना मिळत आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक व राजमार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या शैलीचा कुणालाच अंदाज नाही. जनतेशी नाळ जोडून ठेवण्यात गडकरी यांचा मोठा हातखंडा आहे. ग्रामीण भागात उद्योगक्षेत्र वाढले पाहिजे ही नेहमी त्यांची भूमिका राहिली आहे. 
पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात महायुतीतील भाजपचे उमेदवार समाधान आवताडे यांच्या प्रचारार्थ सभेसाठी आल्यानंतर त्यांची उद्योग विषयीची प्रत्यक्षरीत्या भूमिका पाहायला मिळाली. 
सभेदरम्यान केंद्रीय रस्ते वाहतूक व राजमार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी समाधान आवताडे यांच्यासारखा उच्चशिक्षित, कर्तबगार, आणि जात-पात न बघणारा उमेदवार तसेच शैक्षणिक आणि सहकार क्षेत्रात उत्तम काम करणारे समाधान आवताडे यांच्या रूपाने चांगले उमेदवार आपल्याला मिळाले आहेत. तुमच्या भविष्याची ही निवडणूक आहे जर तुम्ही समाधान आवताडे यांना निवडून दिले तर मतदारसंघात सिंचन सुविधा निर्माण करून शेती व्यवसाय व उद्योगाला चालना मिळणार असल्याची भूमिका त्यांनी बोलून दाखवली. समाधान आवताडे यांना निवडून दिल्यानंतर पंढरपूर येथे हजारो एकरावर होणाऱ्या 'एमआयडीसी' मध्ये मोठमोठे प्रकल्प उभा राहतील या माध्यमातून जवळपास दहा हजाराच्या वर रोजगार उपलब्ध होण्यास मदत होईल. नितीन गडकरी यांनी अनेक भागात व्हीजन डॉक्युमेंटच्या माध्यमातून सिंचन सुविधा निर्माण करण्यावर आपला विशेष भर दिला आहे. 
गावातील पाणी गावात व शेतातील पाणी शेतातच उपयोगात आले पाहिजे. पाण्याच्या उपलब्धतेतून सिंचनाची सुविधा निर्माण करण्यात येणार आहे. शेतकरी हा आता अन्नदाता राहिला नसून तो इंधनदाता ही म्हणून ओळखू लागला आहे. शेतकऱ्यांनी तयार केलेल्या इथेनॉलवर चालणाऱ्या गाड्या सुरू केल्या. शेतकऱ्यांनी भविष्यात विमानासाठी इंधन निर्मिती केली पाहिजे असे सांगून गडकरी म्हणाले, तंत्रज्ञान बदलले आहे. त्या काळानुसार पुढे चालत राहणे गरजेचं आहे. प्रत्येक परिवाराला घर चांगले असले पाहिजे, शेतकऱ्यांना चांगली सुविधा निर्माण झाली पाहिजे, कोणतीही गोष्ट अशक्य नाही. खोटे आश्वासन आजपर्यंत 40 वर्षात दिले नाही. ऑटोमोबाईल इंडस्ट्रीने शासनाला सर्वात जास्त जीएसटी उपलब्ध करून दिला आहे. गरिबांची सेवा करून गावे समृद्ध झाली पाहिजे. शेतकरी समृद्ध झाला पाहिजे. पंढरपूर ही विठू माऊलीची नगरी आहे तसेच मंगळवेढा ही संतभूमी आहे. या भागात आमच्या विचाराचा समाधान आवताडे यांना निवडून दिले तर मला काम करण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे मी भाग्यवान ठरेल, तुमच्या भागात नवनवीन उद्योग आणण्यात माझा हातभार लाभेल. हा भाग विकसित करणार असल्याचे सांगून त्यासाठी कुठे मागे राहणार नाही. काम करण्यासाठी लोकांचे निस्वार्थ प्रेम देशात मिळाले. अशा कामातून लोकांचा विश्वास वाढतो. हे नितीन गडकरी यांच्या भाषणातून सर्वांना प्रकर्षाने जाणवले. त्यामुळे नितीन गडकरी यांच्या झालेल्या सभेनंतर समाधान आवताडे यांचा विजय निश्चित करून या भागात उद्योगाला चालना मिळावी यासाठी प्रत्येक मतदार समाधान आवताडे यांच्या पाठीशी असल्याचे चित्र मतदार संघातील दोन्ही तालुक्यातील शहरात व गावागावात पाहायला मिळते आहे.

Post a Comment

0 Comments