मंगळवेढा विक्रांत पंडित
पंढरपूर मंगळवेढा विधानसभेच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडी कडून आज उमेदवारी अर्ज परत घेण्याच्या अखेरच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार लवंगी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन अनिल दादा सावंत यांना संधी मिळणार असल्याचे स्पष्ट दिसू लागले आहे दरम्यान विठ्ठल साखर कारखान्याचे माजी चेअरमन काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल केलेले भगीरथ भालके यांनी दिल्लीवरून उमेदवारी आणली होती त्यांना काँग्रेस पक्षाने बी फॉर्म दिला होता परंतु महाविकास आघाडीच्या काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना या तीन पक्षाच्या आघाडीमध्ये पंढरपूरची जागा ही राष्ट्रवादी काँग्रेसकडे असल्यामुळे या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार म्हणून अनिल दादा सावंत यांचे नाव उशिरा का होईना निश्चित करण्यात आले आहे त्यांना पंढरपूर माळशिरस अकलूज बारामती असा पाठिंबा मिळाला असल्यामुळे आता अर्ज परत घेण्याच्या अखेरच्या दिवशी काँग्रेस पक्षाचे उमेदवार असलेले भगीरथ भालके हे आपला उमेदवारी अर्ज परत घेतील अशी चिन्हे दिसत आहेत त्यांनी आपला अर्ज परत न घेतल्यास भारतीय जनता पक्षाचे उमेदवार आमदार समाधान दादा अवताडे यांच्या विरुद्ध सरळ लढत होण्याऐवजी तिरंगी लढत होण्याची शक्यता दिसत आहे यामध्ये मनसेचे उमेदवार दिलीप भाऊ धोत्रे यांनी देखील मोठ्या प्रमाणात जान भरली आहे यामुळे या मतदारसंघात चौरंगी लढत होईल असे सध्या दिसत आहे परंतु अर्ज परत घेण्याच्या अखेरच्या दिवशी भगीरथ भालके की अनिल सावंत यांचा निर्णय होणार असल्यामुळे या मतदारसंघातील निवडणूक वेगळ्या वातावरणात चालली आहे कार्यकर्त्यांचा व जनतेचा कल पाहता ही निवडणूक महा विकास आघाडीला अधिक परिश्रम घेण्यास भाग पडणारी आहे कार्यकर्त्यांचा कल अनिल दादा सावंत यांच्याकडे आहे तर सामान्य जनतेचा कल भगीरथ भालके यांच्याकडे आहे यामुळे महाविकास आघाडीचे नेते कार्यकर्त्याच्या ऐकणार कीस जनतेचा कौल आजमावून पाहणार हे पाहणे आता उत्सुकतेचे ठरले आहे माढा तालुक्यातील अनिल दादा सावंत पंढरपूर मध्ये राहत असून मंगळवेढा तालुक्यातील लवंगी येथे त्यांचा साखर कारखाना आहे त्यांनी या निवडणुकीसाठी मंगळवेढा तालुक्याचे लोकनेते राहुल शहा यांच्यापासून पंढरपूर तालुक्यातील नेते अकलूजचे मोहिते पाटील यांच्यासह अनेकांना आपलेसे करून ते शरद पवार यांच्या सानिध्यात गेले त्यांच्याकडून त्यांनी उमेदवारी देखील मिळवली आता अंतिम क्षणी अनिल दादा सावंतच समाधान दादा अवताडे यांच्या विरुद्ध निवडणूक लढवतील असे स्पष्ट दिसू लागले आहे परंतु भगीरथ भालके देखील भारत नानाचा बछडा असल्यामुळे या निवडणुकीत अर्ज परत घेण्याचे दिवशी नेमकी कोणती भूमिका घेणार यावर या विधानसभेच्या निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे दरम्यान मंगळवेढा तालुक्याचे लोकनेते बबनराव आवताडे यांच्या गटाची भूमिका पाच नोव्हेंबर रोजी जोगेश्वरी मंगल कार्यालयात गटाच्या सर्व कार्यकर्त्यांच्या विचार विनिमय बैठकीत घेतली जाणार आहे बबनराव आवताडे गटाला देखील मोहिते पाटील गटाकडून काही आश्वासने दिली जाणार असल्याचे समजते यामध्ये जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन पद बबनराव तारे यांना जिल्हा बँकेच्या निवडणुकीनंतर दिले जाणार आहे तर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत त्यांचे चिरंजीव सिद्धेश्वर अवताडे यांना संधी देण्याबद्दल चा शब्द महाविकास आघाडीकडून दिला जाण्याची शक्यता आहे दरम्यान शरद पवार यांच्या दोन रोहित पवार यांची एक जयंत पाटील यांची एक सुप्रिया सुळे यांची एक अशा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रमुख नेत्यांच्या सभा पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात होणार असल्यामुळे राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात परत एकदा राष्ट्रवादीचे उमेदवार अनिल दादा सावंत यांना मतदारसंघातून विजयी करण्यात शरद पवार व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना यश मिळणार का याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे
Post a Comment
0 Comments