मंगळवेढा विक्रांत पंडित
पंढरपूर मंगळवेढा विधानसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्याचे नेते दिलीप धोत्रे यांना राज साहेबांनी पहिल्या टप्प्यात उमेदवारी जाहीर केली त्याचा लाभ दिलीप धोत्रे यांनी मोठ्या प्रमाणात घेतला असून पंढरपूर मंगळवेढा तालुक्यात त्यांनी प्रचाराचा धुमाकूळ घातला आहे त्यांनी प्रचाराची स्टाईल बदलली असून नामांकित नेते पुढारी हे देखील अवाक् झाले आहेत. सर्वसामान्य जनतेत राज साहेबांचे विचार रुजवण्याचे काम आतापर्यंत दिलीप धोत्रे यांनी केले. पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील प्रश्नांना खऱ्या अर्थाने न्याय देण्याची भूमिका केवळ राज साहेबांच्या नेतृत्वाखाली मनसेच करू शकते असा विश्वास त्यांनी मतदारसंघात निर्माण केला आहे .मतदारसंघातील अनेक प्रश्नांना त्यांनी हात घातला असून आत्तापर्यंत राजकीय नेत्यांनी सर्वसामान्य जनतेला झुलवत ठेवण्यासाठी अनेक प्रश्न प्रलंबित ठेवले याचे पोलखोल त्यांनी केले असल्यामुळे सामान्य जनतेत दिलीप धोत्रे यांच्या बद्दल मोठे प्रेम आस्था निर्माण झाली आहे. हा तरुण विश्वासाह वाटतो. पंढरपूर मंगळवेढा चे प्रश्न निश्चितपणे सोडवेल असा विश्वास मतदारसंघांमध्ये निर्माण झाला आहे त्यांनी 35 गाव पाणी योजना महात्मा बसवेश्वर स्मारक संत चोखामेळा स्मारक ,पंढरपूर येथील एमआयडीसी या प्रश्नाबरोबर पारंपारिक प्रश्नाला न्याय देण्याची भूमिका घेतली आहे .पंढरपूर ही दक्षिण भागाचे काशी म्हणून ओळखले जाते या ठिकाणी केंद्र व राज्य शासनाकडून निधी दिला जाईल निधी देणार आहेत असे सांगून सत्ताधाऱ्यांनी आत्तापर्यंत फसवणूक केली आहे परंतु काशीला ज्याप्रमाणे महत्त्व आहे त्याप्रमाणे पंढरपूरचे महत्त्व निर्माण करण्यात आत्तापर्यंतच्या सत्ताधाऱ्यांना यश मिळाले नाही .आता पंढरपूर शहराचे राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्र म्हणून त्याला न्याय देण्यासाठी आपण राज साहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणार असल्याचे दिलीप धोत्रे यांनी सांगितले. याशिवाय मतदारसंघात अनेक प्रश्न आहेत.
एक संत असलेले सावता माळी यांचे
आरण हे तीर्थक्षेत्र म्हणून जाहीर झाले त्या ठिकाणी निधी आला काम सुरू झाले
. याउलट मंगळवेढा शहरांमध्ये 31 संत आहेत ज्यांनी जगाला लोकशाही शिकवली ते संत महात्मा बसवेश्वर यांची कर्मभूमी असलेल्या मंगळवेढ्यात बसवेश्वरांचा साधा एक फोटो देखील आतापर्यंतच्या सत्ताधाऱ्यांनी उभा केला नाही .एक कोटी, दोन कोटी, शंभर कोटी अशा गप्पा मारल्या आहेत परंतु प्रत्यक्ष जागा देखील सत्ताधाऱ्यांना आतापर्यंत मिळवून देता आली नाही. जागा नाही या नावाखाली बसवेश्वर स्मारकाचे काम प्रलंबित ठेवले जात आहे. मंगळवेढा नंदुर या रस्त्यावर डोनज ते नंदूर या परिसरात सुमारे 1000 एकर जमीन महाराष्ट्र शासनाच्या मालकीची आहे .त्या ठिकाणी कर्नाटकातील कुडल संगम प्रमाणे भव्य दिव्य आंतरराष्ट्रीय असे बसवेश्वराचे स्मारक होऊ शकते केवळ इच्छाशक्तीच्या अभावामुळे व हे प्रश्न सोडवले तर पुन्हा काय करायचे यामुळे सत्ताधारी व विरोधी गटाने सत्ता आल्यानंतर बसवेश्वराच्या स्मारकाचे काम उभे केले नाही सुरू केले नाही. ज्यांनी पांडुरंगा बरोबर वाद घातला त्या संत चोखामेळाचे स्मारक जागा उपलब्ध असताना शासन निधी देण्यासाठी तयार असताना अधिकारी प्रत्यक्ष काम करण्यास तयार असताना देखील राजकीय नेते व त्यांचे संधीसाधू कार्यकर्ते यांनी बाजार चौकात संत चोखावाचे स्मारक करण्यास टाळाटाळ करत आहेत .विनाकारण विलंब केला जात आहे शासकीय जागा उपलब्ध असताना हे स्मारक उभे केले जात नाही याला केवळ राजकीय द्वेष असून अनेकांचा वैयक्तिक इगो दुखावला जात आहे. तलाठी कार्यालय, बांधकाम खात्याची एक निवासस्थान ,जुनी पोलीस चौकी, नगरपालिकेचे व्यापार संकुल ,नगरपालिकेची बंद असलेली व्यायाम शाळा ,सार्वजनिक बांधकाम विभागाचे मालकीचे बंद अवस्थतील असलेली पोलीस वसाहत या जागेवर भव्य दिव्य असे संत चोखोबाचे स्मारक होऊ शकते. केवळ अकसापोटी हे स्मारक केले जात नाही याच पद्धतीने गेली 50 वर्ष 35 गावाचा पाणी प्रश्न प्रलंबित ठेवलेला आहे राष्ट्रीय नेते राज्यस्तरीय नेते यांना हा प्रश्न कधी सोडवता येणे शक्य होते परंतु निवडणुकीतील जनतेला बोलवणारे शेतकऱ्यांना फसवणारे हे आश्वासन कायम देता येईल म्हणून आजतागात या प्रश्नाकडे शासनाने दुर्लक्ष केले आहे असे अनेक प्रश्न मंगळवेढा तालुक्यात आहेत ते जाणून बजून सोडवले जात नसल्याचा आरोप दिलीप धोत्रे यांनी केला आहे पंढरपूर मंगळवेढा तालुक्यातील सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी राज साहेबांच्या मार्गदर्शनाखाली मनसेचे तरुण तडफदार उमेदवार दिलीप धोत्रे यांनाच या निवडणुकीत विजयी करावे असे वातावरण पंढरपूर मंगळवेढा तालुक्यात निर्माण होऊ लागली आहे राज ठाकरे यांच्या जाहीर सभेने या वातावरणात अधिक भर पडणार असून दिलीप धोत्रे यांचे पारडे रोजचे रोज जड होत चालले आहे.
Post a Comment
0 Comments