Type Here to Get Search Results !

संतसूर्य

 विकास कामासाठी मतदाराने सूज्ञपणे मतदान केल्याने पंढरपूर- मंगळवेढ्यात समाधानदादा आवताडे यांचा विजय..

पंढरपूर मध्ये प्रशांत परिचारक यांनी तर मंगळवेढ्यात जनतेनेच जबाबदारी स्वीकारली .

मंगळवेढा/ प्रा.विक्रांत पंडित 

पंढरपूर- मंगळवेढा विधानसभेच्या निवडणुकीमध्ये विचार मंथन झाल्यानंतर मतदारांनी उमेदवाराला नव्हे तर विकास कामाला मतदान केल्याचे स्पष्ट दिसत आहे .गेली 70 वर्षे मंगळवेढा तालुका विकासासाठी वंचित राहिला होता ,आतुर झालेला होता .अवघ्या अडीच वर्षात संधी मिळाल्यानंतर 24 गाव पाणी प्रश्न उपसा सिंचन योजना ,तामदर्डी बंधारा, सिद्धापूर -वडापूर बंधारा, निंबोणी येथील ग्रामीण रुग्णालय, मंगळवेढ्यातील 200 बेडचे सुसज्ज रुग्णालय ,मंगळवेढा शहरातील शाळेच्या इमारतीसाठी दहा कोटीचा निधी, म्हैसाळ योजनेचे पाणी माण नदीत आणून दाखवले . ग्रामीण भागात हजारो कोटींच्या रस्त्याची कामे सुरू केली. पंढरपूरमध्ये कासेगाव येथे एमआयडीसी मंजूर करून आणली .पंढरपूर शहरातील व ग्रामीण भागातील अनेक प्रश्नांना मार्गी लावत विठ्ठल- रुक्मिणी मंदिरापासून सर्वसामान्य जनतेपर्यंतचे प्रश्न समजून घेऊन निधी उपलब्ध करून दिला. यामुळे मतदारांनी या निवडणुकीत उमेदवार म्हणून पुढील पाच वर्षाचा विकास करून घेण्यासाठी भारतीय जनता पक्ष व युतीचे उमेदवार समाधानदादा आवताडे यांना परत एकदा आमदार करण्याचा निर्णय घेतला होता. त्याप्रमाणे त्यांनी त्याची अंमलबजावणी केली .निवडणुकीत प्रचाराच्या रणधुमाळीमध्ये आरोप -प्रत्यारोप झाले. अनेक कारणे सांगितली गेली ,परंतु मंगळवेढ्याच्या इतिहासात कायम पाणी प्रश्न ,भावनिक वातावरण ,जात फॅक्टर ,धर्म फॅक्टर ,पैशाचा फॅक्टर असे अनेक फॅक्टर लागू करून वेळ मारून आतापर्यंतच्या लोकप्रतिनिधींनी पोळी भाजून घेतली होती परंतु मंगळवेढा तालुक्यात ही पहिलीच वेळ आहे की, विद्यमान लोकप्रतिनिधी तथा समाधानदादा आवताडे यांनी या निवडणुकीत माझे काम पाहून मला मतदान करा .माझ्यावर विश्वास टाकला ,त्याला मी पात्र राहिलो .कधीच न सुटणारे प्रश्न या लोकप्रतिनिधीने सोडवून दाखवल्यामुळे अनेकांना विरोधाला विरोध करणे देखील जड चालले होते .मंगळवेढा शहर असो की ग्रामीण भागातील चार जिल्हा परिषद गट असो या सर्वांनी भरभरून मतदान केले .यामुळे आवताडे यांना या निवडणुकीत यश मिळाले. ट्रॅक्टर, जेसीबी, पोकलेन ने काम केल्यामुळे हा आमदार सातबारा फाटूस्तर कायम राहणार आहे. हे माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांनी स्पष्ट केले होते .परंतु राजकारणात ढोबळे टीकात्मक बोलतात असे सांगितले जात होते. परंतु कामच केले असल्यामुळे आमदार समाधानदादा आवताडे यांना आता खरोखरच सातबारा फाटूस्तर मंगळवेढा तालुक्यामध्ये कायम आमदार राहता येणार आहे, इतके यश मतदार जनतेने दिले आहे. निवडणुक प्रचारात ढोबळेनी त्यांना माजी आमदार व्हा ,म्हणून आशीर्वाद दिले होते .परंतु जनतेने सदैव आमदार राहून आता आशीर्वाद दिले आहेत .निवडणुकीत देखील ब्रह्मपुरी येथे समाधान दादा आवताडे यांनी सभेतच मतदारांना विचारले होते की ,तुम्ही समोरच्या उमेदवाराला विचारा ,तुम्ही का निवडणूक लढवत आहात? तुम्ही निवडणूक लढवण्याचे कारण विचारा अशी विचारणा करून ज्या विकास कामासाठी निवडणूक लढवणार आहे, ती कामे मी मंजूर करून आणली आहेत ,मार्गी लावली आहेत .राहिलेली कामे मार्गी लावणार असल्याचे स्पष्ट सांगितले होते .इतका प्रचंड 
आत्मविश्वास आमदार आवताडे 
 यांनी जाहीर सभेत व्यक्त केला होता .नदीकाठच्या भागाला नदीत पाणी हवे होते. सिद्धापूर- वडापूर पासून उचेठाण पर्यंत नदीत कायम पाणी राहील या पद्धतीचे काम आवताडे यांनी केले आहे .त्याची अंमलबजावणी येत्या काही काळात झालेली दिसेल .याच पद्धतीने दक्षिण भागातील पाण्याला न्याय मिळवून दिला .ज्या भोसे गावातील प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेबद्दल कौतुक केले जात होते, परंतु त्याबद्दलच्या त्रुटी त्यांनी स्वीकारून त्यावेळच्या लोकप्रतिनिधीबद्दल मत व्यक्त न करता झालेली चूक दुरुस्त करून पिण्याच्या पाण्याची योजना देखील मार्गी लावण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. यामध्ये टीका करत राजकारण केले नाही ही बाब सुद्धा दक्षिण भागातील जनतेला मान्य झाली आहे. यामुळे या भागात आता पिण्याचे पाणी व्यवस्थित मिळेल, शेतीला पाणी मिळेल असा विश्वास लक्ष्मी दहिवडी येथील कार्यक्रमातून स्पष्ट झाला .तेव्हाच आवताडे यांचा विजय निश्चित झाला होता .माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे ,माजी आमदार डॉक्टर राम साळे, स्वर्गीय आमदार भारत नाना भालके यांनी पाणी प्रश्नावर निवडणुका लढवल्या ,जिंकल्या, सोडवण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांना यश मिळाले नाही .पाणी प्रश्नाबाबत गुंजेगाव येथे भांडे नाही, पाणी अडवायला, पाणी साचवायला अडचण आहे. अशी टीका अनेक नामवंत अभ्यासू ,पाण्याबद्दल ज्यांनी शिक्षण घेतले, पाण्याबद्दलचे अभियांत्रिकी ज्ञान घेतले, पाण्यापासून शेती कशी करायची याबद्दलची आगाध ज्ञान असलेल्या, मंत्रालयातली लढाई पासून न्यायालयीन लढाई केली. म्हणून अनेक जण सांगत होते त्यांनी आमदार आवताडे यांची योजना खोटी आहे. असे सांगण्याचा आटोकाट प्रयत्न केला .परंतु त्यांच्या विश्वासार्हतेमुळे कदाचित मतदारांनी त्यांचे ऐकले नाही. यामुळे दक्षिण भागात देखील आमदार आवताडे यांना चांगले मताधिक्य मिळाले .स्वतः आमदार आवताडे हे इंजिनिअर आहेत, ते केवळ रस्त्याचे इंजिनियर आहेत असे समजून अनेकांनी त्यांच्यावर टीका केली. परंतु इंजिनीयर होताना जे ज्ञान मिळते त्यामध्येच सिंचनासाठी उभारली जाणारी यंत्रणा ,कालवे, पाईप ,पाणी उचलल्या जाणाऱ्या मोटारी, विजेची बिल ,विजेची उपलब्धता, पर्यावरणाचा अभ्यास हे सर्व त्यांना शिक्षण घेत असतानाच ज्ञान मिळाले आहे .परंतु अनेकांना ते वयाने लहान असल्यामुळे आपल्यापेक्षा त्यांना राजकारण समजत नाही, त्यांना यातील गंध नाही असे समजून त्यांच्या राजकीय विरोधकांनी विशेषता पाणी प्रश्न बाबत जो गोंधळ निर्माण करण्याचा प्रयत्न केला, तो गोंधळ मतदारांनी हाणून पाडला .आता हे कामच होणार असल्यामुळे येणाऱ्या कोणत्याही निवडणुकीत दक्षिण भागातील सिंचनाच्या पाण्याचा प्रश्न हा निवडणुकीचा विषय ठरणार नाही ,इतकी दुर्दैवी अवस्था आमदार आवताडे यांनी समोरील विरोधकांची करून ठेवली आहे. 
रस्त्याबाबत देखील त्यांच्यावर टीका करण्यात आली .त्यांनी रस्ते मंजूर करून आणले. निधी आणला ,तेच काम करत आहेत परंतु त्यांच्या कामाला मंगळवेढ्यात नव्हे, जिल्ह्यात नव्हे, राज्यात नव्हे तर देशात देखील प्रमाणित केले जात आहे. रस्त्याबाबत आवताडे यांची कन्स्ट्रक्शन कंपनी खरोखरच डॉन आहे परंतु विरोधाला विरोध करणे यामध्येच विरोधकांचे स्वतःचे खच्चीकरण कधी झाले हे समजले नाही. रस्त्याच्या दर्जाबाबत, रस्त्याच्या कामाबाबत त्यांना देशभरातून मागणी आहे .यामुळे मंगळवेढ्यातील रस्ते विशेषतः दक्षिण सोलापूर कडून येणारा रस्ता हा लेंडवे चिंचाळे परिसरात मिळत आहे .हा राज्यस्तरीय रस्ता होत असल्यामुळे या भागातील नागरिकांना शेतकऱ्यांना या रस्त्याचा मोठा लाभ मिळणार आहे. परंतु कायम निवडणुकीत पैसे मिळवणे, प्रचारात पैसे आणणे, पक्षाचा निधी मिळाला की घरी नेऊन ठेवणे असे उद्योग करणाऱ्यांना या निवडणुकीत आवताडे यांच्यावर टीका करणे अवघड झाले होते. परंतु वस्तुस्थितीच जनतेला माहीत झाली होती. समोरचे उमेदवार ही निवडणूक जनतेने हातात घेतली आहे ,असे सांगून माझ्या गाड्या पोलीस यंत्रणेने अडवल्या आहेत, 35 कोटी वेळापूर मध्ये अडकले आहेत ,साडेतीन कोटी गोपाळपूर मध्ये पकडले आहेत अशा अफवा या निवडणुकीत सोडून खोटी सहानभूती घेऊन पुन्हा सहानभूतीवर निवडून येण्याचा प्रयत्न केला .अनेक विचारवंतांना, विश्लेषकांना या निवडणुकीत विरोधकांचा विजय होणार आहे असा साक्षात्कार झाला होता. त्यामुळे ते रस्त्यावरून जा ये करताना समोरच्या नेत्याकडे कार्यकर्त्याकडे वेगळ्या नजरेने बघत होते. त्यांचे छद्मी हास्य पाहून त्यांचीच कीव येत असल्याचे दिसत होते.
या निवडणुकीच्या निकालाने आता यापुढील काळात मंगळवेढ्याच्या राजकारणाला वेगळी दिशा मिळणार आहे .विकास कामावर राजकारण करता येते ,यावर नेते -कार्यकर्ते यांचा मोठ्या प्रमाणात विश्वास निर्माण झाला आहे. केवळ निवडणुकीमध्ये राजकीय गप्पा मारून पक्षाचे व नेत्यांची नावे सांगून मते मिळत नाहीत, यासाठी स्वतःची कामे करून प्रतिमा उभी करावी लागते. जनतेसाठी केलेली कामे दाखवावी लागतात. या कामावरच मतदार मतदानाचा निर्णय घेतो हे या निवडणुकीत स्पष्ट दिसलं आहे .पंढरपूर शहर व ग्रामीण भागात प्रशांत परिचारक यांनी दिलेला शब्द पाळला आहे. शब्दासाठी ते जिल्ह्यात नव्हे तर राज्यात प्रसिद्ध आहेत .यामुळे पंढरपूर शहर भागात आमदार आवताडे यांना झालेले मतदान हे केवळ त्यांच्या प्रयत्नामुळे व भाजपच्या कार्यकर्त्यांमुळे झालेले स्पष्ट दिसत आहे. पोटनिवडणुकीप्रमाणे यावेळी देखील परिचारक यांच्या पांडुरंग परिवाराने आमदार आवताडे यांचे पंढरपुरात पुण्य बांधून घेतले आहे. प्रदीप खांडेकर, अंबादास कुलकर्णी ,राजेंद्र पाटील, दिलीप चव्हाण, दत्ता साबणे, विकास पुजारी,मंगळवेढ्यात अजित जगताप, प्रकाश गायकवाड, आप्पासाहेब चोपडे ,प्रवीण खवतोडे , प्रतीक किल्लेदार यांच्यासह ग्रामीण व शहर भागातील प्रत्येक कार्यकर्त्यांनी , परिचारक गटाच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी गाव पातळीवरील कार्यकर्त्यांनी अजित पवार यांच्यावर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी चांगल्या पद्धतीने काम केले. याचा लाभ या निवडणुकीत झालेला स्पष्ट दिसत आहे. ग्रामीण भागात देखील आवताडे यांच्या समर्थकांनी भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी लोकसभेत झालेल्या चुका दुरुस्त केल्या. मात्र याचवेळी राष्ट्रीय स्वयं संघ ,विश्व हिंदू परिषद या हिंदुत्ववादी संघटनेने मंदिर, मठ, भाविक ,वारकरी यांच्याशी साधलेला संपर्क यासाठी केलेले प्रयत्न हे यावेळी निवडणुकीत निर्णय मताधिक्य मिळवण्यासाठी उपयुक्त ठरलेले स्पष्ट दिसत आहे.पंढरपूर येथील संत संमेलन, मंगळवेढा शहर व ग्रामीण भागात हिंदुत्ववादी संघटना, ओबीसी संघटना, ओबीसी नेते या सर्वांनी आमदार आवताडे यांना मतदान करण्यासाठी केलेले प्रयत्न व त्यातून झालेले मताधिक्य यामुळे आवताडे यांची विजयाची नाव पैलतीरी पोचली. यापुढील काळात आमदार आवताडे यांनी पंढरपूर- मंगळवेढ्याच्या विकास कामाबरोबर भारतीय जनता पक्षाची संघटना विकास कामासाठी काम करणारे कार्यकर्ते या सर्वांची संघटना मजबूत बांधण्याची गरज आहे. राजकारणातील विरोध बाजूला ठेवून विकास कामासाठी विकास करण्याचे त्यांचे धोरण हे योग्य व अचूक होते, हे परत एकदा स्पष्ट झाले आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका ,ग्रामपंचायत आधी निवडणुका भविष्यकाळात होणार आहेत. यामध्ये यश मिळवणे यासाठी पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी त्यांना स्वतंत्र व्यवस्था करावी लागणार आहे. याशिवाय केलेल्या चांगल्या कामाची पोचपावती घेण्यासाठी मतदारांमध्ये जनजागृती करणे ,जनतेत केलेल्या कामाचे आढावा घेण्याची यंत्रणा उभा करावी लागणार आहे .आणखी बऱ्याच निवडणुका त्यांना लढवून जिंकावयाचे आहेत यामुळे कायम भविष्याचा वेध घेणाऱ्या या नेतृत्वाला आता मंगळवेढ्याचे नाव विकास कामाच्या माध्यमातून महाराष्ट्रात अग्रेसर करावे लागणार आहे .यासाठी मतदार संघातील सर्व जनतेच्या वतीने हार्दिक शुभेच्छा, हार्दिक अभिनंदन....
[24/11, 23:11] Vikrant Pandit: कोट 
आमदार समाधानदादा अवताडे यांच्यासमोर पाच वर्षाचे पुढील कामे

1 शहरात संत चोखोबा यांचे स्मारक उभा करणे 

2 महात्मा बसवेश्वरांचे राष्ट्रीय स्मारक नंदुर डोनज परिसरातील 1000 एकर उपलब्ध शासकीय जागेवर उभा करणे

3 मंगळवेढा शहरात संतसृष्टी निर्माण करून शहराला तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळवून देणे

4 महादेव विहिरीतील ब्रह्मदेवाच्या मूर्तीची निगा राखून स्थितीत आणून पर्यटनासाठी मार्केटिंग करणे

5 राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्पर्धा घेण्यासाठी कृष्णा तलावालगत शासनाच्या 42 एकर जागेतील 15 एकर जागेत क्रीडा संकुल उभा करणे 

6 तालुक्यात अभियांत्रिकी महाविद्यालय उभा करणे

7 पंढरपूर येथे चारवारीसाठी येणाऱ्या भाविकांना मंगळवेढ्यात आणण्यासाठी प्रचार ,प्रसार करून मंगळवेढ्यात हॉटेल लॉजिंग व्यवसायाला संधी उपलब्ध करून देणे यामध्ये रोजगार मोठ्या प्रमाणात उपलब्ध होऊ शकणार आहे.

Post a Comment

0 Comments