Type Here to Get Search Results !

संतसूर्य

३ नोव्हेंबर  रोजी संत दामाजी साखर कारखान्याचा बायलर प्रदिपन समारंभ

मंगळवेढा/संतसूर्य वृत्तसेवा 

 ः-  श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याचा सन
२०२४-२५ हंगामाकरिता ३२ व्या गळीत हंगामा चा बाùयलर अग्नि प्रदिपन समारंभ
रविवार दि०३/११/२०२४ रोजी सकाळी ११।३० वाजताचे शुभमुहुर्तावर  हभप
सुधाकर इंगळेमहाराज,राष्ट्रीय अध्यक्ष,अखिल भाविक सांप्रदाय वारकरी मंडळ,
सोलापुर यांचे शुभहस्ते व धनश्री आणि सिताराम परिवाराचे संस्थापक, दामाजी
साखर कारखान्याचे माजी चेअरमन मा प्रा श्री शिवाजीराव काळुंगे यांचे
अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे। तसेच या कार्यक्रमासाठी रतनचंद शहा
बँकेचे चेअरमन श्री राहुल शहा,  कारखान्याचे माजी चेअरमन अड श्री
नंदकुमार पवार, जिजामाता पतसंस्थेचे मार्गदर्शक मा श्री।रामाकृष्ण नागणे,
बळीराजा पतसंस्थेचे चेअरमन मा  दामोदर देशमुख, कारखान्याचे माजी
व्हाईस चेअरमन मा श्री रामचंद्र वाकडे, तसेच माजी संचालक यादाप्पा माळी
यांची प्रमुख उपस्थिती लाभणार असुन सदर दिवशी सकाळी १०।३० वाजता
कारखान्याचे संचालक श्री।भारत श्रीधर बेदरे  व त्यांच्या पत्नी सौ आशा
भारत बेदरे यांचे शुभहस्ते श्री सत्यनारायण महापुजेचे आयोजन केले असलेची
माहिती कारखान्याचे प्र कार्यकारी संचालक श्री रमेश जायभाय यांनी दिली
 यावर्षी सर्वत्र चांगल्या प्रमाणात पाऊस होवुन ऊसाचे वाढीसाठी पोषक
वातावरण असल्याने ऊसाची वाढही चांगल्या प्रमाणात झालेली आहे। परंतु मागील
वर्षी पाऊस कमी प्रमाणात झालेने उŠसाच्या लागणी झालेल्या नाहीत। त्यामुळे
खोडवा ऊसाचे प्रमाण या हंगामाकरिता जास्त आहे। कारखान्याने हंगामाकरिता
आवश्यक असणाÅया ऊस तोडणी वाहतुक यंत्रणेसाठी बैलगाडी २२०, डंपिंग
टù्रक्टर १७५, दोन ट्राùली टù्रक्टर १६५ व हार्वेस्टर मशिन १० भरती करुन
त्यांना रु।१७ कोटी ३० लाख अùडव्हान्स दिलेला आहे।  यंत्रणेसाठी वेळेवर व
गरजेनुसार अùडव्हान्स दिला असुन दररोज ४००० मे।टन प्रमाणे गळीत करणेसाठी
मशिनरी दुरुस्तीची कामे करुन कारखाना गाळपासाठी तयार आहे। या हंगामात
किमान ५।०० लाख मे।टन ऊस गळीत करणेचे उध्द्ीष्ट कारखान्याने ठेवले आहे।
तरी या कार्यक्रमासाठी कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक सभासद शेतकरी यांनी
उपस्थित रहावे असे आवाहन चेअरमन श्री। शिवानंद पाटील व व्हा।चेअरमन श्री
तानाजीभाऊ खरात यांनी केले आहे।
 सदर प्रसंगी कारखान्याचे संचालक सर्वश्री मुरलीधर दत्तू, गौरीशंकर
बुरकूल, गोपाळ भगरे, राजेंद्र चरणुकाका पाटील, भारत बेदरे, दयानंद सोनगे,
औदुंबर वाडदेकर, रेवणसिध्द् लिगाडे, भिवा दोलतडे, बसवराज पाटील, गौडाप्पा
बिराजदार, दिगंबर भाकरे, महादेव लुगडे, तानाजी कांबळे, तानाजी काकडे,
सुरेश कोळेकर, तसेच कारखान्याचे सर्व खातेप्रमुख, विभागप्रमुख उपस्थित
राहणार आहेत.

Post a Comment

0 Comments