प्रशांत परिचारक यांच्या प्रयत्नाला यश येणार मतदारसंघात ‘कमळ’ चीच हवा
मंगळवेढा /विक्रांत पंडित
महायुतीचे भाजप, शिंदेसेना, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, रिपाई आठवले गट व मित्रपक्षाचे अधिकृत उमेदवार आमदार समाधान आवताडे यांना मोठ्या मताधिक्याने निवडून आणण्याचा निर्धार पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील नेते प्रशांत परिचारक,पांडुरंग परिवार,सर्व मातृ शक्ती-पितृ शक्तीसमवेत समस्त जनसामान्यांनी केला आहे. पाच वर्षे नेत्यांच्या गराड्यात राहण्यापेक्षा जनसामान्यांसाठी दिवस-रात्र झटणारे आमदार समाधान आवताडे यांच्याबद्दल संपूर्ण पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघांत आपुलकीची भावना दिसून येत आहे.
नेहमी गोरगरिबांसाठी २४ तास उपलब्ध आमदार समाधान आवताडे हे कधी स्वतःला नेते म्हणवून घेत नाहीत, तर नेहमीच एक कुटुंबातील सदस्य म्हणून काम करण्याचा त्यांचा स्वभाव आहे. हे संपूर्ण पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील जनसामान्यांनी मागील कित्येक वर्षांपासून पाहिले आहे. त्यामुळेच त्यांच्या गावोगावी सभेला, पदयात्रेला संपूर्ण मतदारसंघात प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.
पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यातील ग्रामीण व शहरी भागात 'आपला हक्काचा माणूस आपल्या दारी' यात्रेत आमदार समाधान आवताडे यांचा जागोजागी स्वागत सत्कार झाले. मतदारसंघातील काही भागात पूर्वी पावसाळ्यात रस्त्यावर चालणेसुद्धा मुश्किल होते, परंतु आमदार निधीतून आवताडे यांनी डांबरी रस्त्यांचे जाळे निर्माण केले. कोट्यवधी रुपयांचा निधी खर्चुन विकासकामे केली.
अवघ्या तीन वर्षाच्या कार्यकाळात सुरू केलेला विकास
आमदार समाधान आवताडे नेटाने सुरू ठेवला. या भागाचा कायापालट करताना त्यांनी बेरोजगारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी पंढरपूर येथे हजारो एकरावर होणाऱ्या 'एमआयडीसी'मुळे मोठे उद्योग येणार आहेत. रस्ते, पाणी, सिंचन, शेती, उद्योगाच्या माध्यमातून पंढरपूर मंगळवेढा तालुक्याच्या विकासाला चालना देण्याचे काम आमदार समाधान आवताडे यांनी केले आहे. तीन वर्षाच्या कार्य काळामध्ये मिळालेल्या आमदारकीत आतापर्यंत समाधान आवताडे यांनी ना भूतो, ना भविष्यती अशी विकासगंगा आणली.
म्हणून या दोन्ही तालुक्यातील मातृ पितृ शक्ती, लाडक्या बहिणी, युवा वर्ग यांनी आमदार समाधान आवताडे यांना मोठ्या मताधिक्याने निवडून आणण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. त्यामुळे ही सुरू असलेली निवडणूक समाधान आवताडे हे एकतर्फी जिंकतील.
Post a Comment
0 Comments