Type Here to Get Search Results !

संतसूर्य

अजितआप्पा ,प्रकाशआप्पा ,चोपडेआप्पा यांच्यामुळे आमदार समाधान आवताडे यांच्या मताधिक्यात होणार मोठी वाढ 

मंगळवेढा /विक्रांत पंडित 

 मंगळवेढा तालुक्यातील सर्व ग्रामीण भागाच्या राजकारणावर परिणाम करणारे अनेक नेते कार्यकर्ते आहेत. यामध्ये प्रमुख नेते म्हणून समविचारी आघाडी कडून दामाजी कारखान्या निवडणुकीत ऐतिहासिक विजय मिळवून देणारे अजित आप्पा, मंगळवेढा शहर , ग्रामीण भागातील रतनचंद शहा यांच्या काळापासून माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांच्या काळात कारकीर्द फुलवलेले नेते प्रकाश आप्पा गायकवाड व शनिवार पेठ भागापासून शहर व ग्रामीण भागाचा नीट अभ्यास असणारे अभ्यास व्यक्तिमत्व जनसंपर्क असलेले विकासाची आस असलेले मंगळवेढ्याच्या विकासासाठी ध्येय ठेवून कार्यरत असलेले आप्पा चोपडे म्हणजे चोपडे आप्पा या तीन आप्पा मुळे आमदार समाधानदादा अवताडे यांना विधानसभेच्या निवडणुकीत निर्णय अशी विजयाचे मताधिक्य मिळणार आहे असे स्पष्ट दिसू लागले आहे मंगळवेढा तालुक्यामध्ये शाळा व मर्दा असे दोन गट कार्यरत होते त्यानंतर ढोबळे यांचा गट झाला परंतु कालांतराने गट पक्ष असे तालुक्याचे राजकारण बदलत गेले नागरी आघाडी अवताडे गट असे बरेच गट व पक्ष होत गेले शेवटी समविचारी पर्यंत नेते व कार्यकर्त्यांची वाटचाल झाली या सर्व परिस्थितीत अजित आप्पा जगताप यांनी मंगळवेढा नगरपालिकेमध्ये नगरसेवक म्हणून प्रवेश केला तेव्हापासून नगरपालिकेवर त्यांची प्रचंड मोठी कमांड आहे मंगळवेढा शहरातील शिवाजी महाराज अहिल्याबाई होळकर बाबासाहेब आंबेडकर आदी पुतळे उभा करण्यासाठी त्यांचे मोठे योगदान राहिले आहे मंगळवेढा तालुक्याच्या राजकारणात श्रीकृष्ण म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात आहे त्यांच्या प्रयत्नामुळे अनेक वेळा निवडणुकीत आमदार भारत भालके यांना लाभ झाला होता आता समाधान आवताडे यांना त्यांचा लाभ मिळणार आहे हा लाभ मोठे मताधिक्य मिळवून देईल असा विश्वास अवताडे यांच्या समर्थकातून व्यक्त केला जात आहे. नगरपालिकेच्या राजकीय परिस्थितीत अजित आप्पा जगताप यांचे योगदान अधिक असून अनेक ठिकाणी त्यांचा शब्द प्रमाण मानला जात आहे याच पद्धतीने त्यांना सहकार्य करणारे प्रवीण उर्फ चंकी खवतोडे यांची जगताप यांना साथ मिळत असल्यामुळे अवताडे यांच्या मताधिक्याची बेरीज वाढत चालणार आहे. प्रकाश गायकवाड हे नगराध्यक्ष होते रतनचंदशा सहकारी बँकेचे चेअरमन होते दामाजी साखर कारखान्याचे संस्थापक संचालक होते अशी सर्व पदे त्यांनी उपभोगली असून त्यांना देखील सामाजिक कामाचा विकास कामाचा वेग आहे त्यांनी प्रत्येक पदाला न्याय मिळवून दिला आहे यामुळे प्रकाश आप्पा यांच्या अनुभवाचा त्यांच्या मताधिक्याचा अवताडे यांच्या मताधिक्यामध्ये वाढ होण्यासाठी उपयोग होणार आहे माजी नगरसेवक आप्पासाहेब चोपडे उर्फ चोपडे आप्पा यांचा राजकीय अभ्यास दांडगा असून त्यांची राजकीय निरीक्षणे महत्त्वपूर्ण ठरली आहेत समविचारी आघाडी निर्माण करण्यामध्ये किंवा त्या परिस्थितीमधील वस्तुस्थिती नेते व कार्यकर्त्यांमध्ये स्पष्ट करणारे चोपडे आप्पा हे व्यक्तिमत्व आगळे वेगळे आहे त्यांच्याकडे खूप मोठा अनुभव असून 1980 पासून त्यांना प्रत्यक्ष राजकारणाचा व त्यापूर्वीच्या राजकारणाचा देखील त्यांना अभ्यास आहे स्वतः प्रक्रियेत राहिले असल्यामुळे त्यांनी मारुती पटांगणातील अनेक सभा गाजवलेले आहेत स्पष्ट बघता प्रामाणिक व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची ओळख असून पंढरपूर मधील विवेकवर्धनीय हायस्कूलचे संस्थेचे ते माजी सचिव आहेत या तीन आप्पा मुळे समाधान आवताडे यांच्या मताधिक्यात किती वाढ होणार याकडे संपूर्ण मंगळवेढा तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे

Post a Comment

0 Comments