Type Here to Get Search Results !

संतसूर्य

*अमित शहा यांचे यादीत परिचारक यांचे नाव पाहताच जेष्ठ सहकर्याना 'बा विठ्ठला' म्हणण्याची आली वेळ...*
*आणि समाधान चे झाले समाधान...!!!*


मंगळवेढा - विक्रांत पंडित 

   भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी आतापर्यंत पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात जेवढे शब्द दिले ते सगळे खरे करून दाखवले आहेत. 24 गाव पाणी योजनेच्या भूमिपूजनाच्या प्रसंगी त्यांनी मारलेला डायलॉग अखेर विधानसभेचे निवडणुकीत देखील खरा करून दाखवला आहे. यामुळे समाधान आवताडे यांनी प्रशांत परिचारक यांच्यावर केलेली कमिटमेंट ही पंढरपूर मंगळवेढा विधानसभेच्या निवडणुकीसाठी नव्हे तर मतदार संघाच्या विकासासाठी केलेली कमिटमेंट होती हे सांगून त्यांनी आपले धैर्य, कौशल्य, धुर्तपणा मतदारसंघात राजकीय विरोधकांना दाखवून दिला. चार मतदारसंघावर परिणाम करणारे चारी मतदार संघ जिंकून दाखवू शकणारे व्यक्तिमत्व म्हणून प्रशांत परिचारक यांचा सन्मान पक्षाने यापूर्वी ही केला आहे आणि पुढेही निश्चितच केला जाईल. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष यांनी स्वतः पंढरपूर मध्ये येऊन त्यांनी ही भूमिका व्यक्त केली. परिचारक समर्थकांची प्रचंड नाराजी, संताप ऐकून घेऊन त्यांनी त्याबाबत बोलताना परिचारक विधिमंडळ सभागृहात तुम्हाला दिसतील असा शब्द दिला. दिल्लीतून अमित शहा यांच्याकडून आलेल्या राज्यपाल नियुक्तीच्या दहा जणांच्या यादीत अमित शहा यांचे सहीने पाठवलेल्या कागदावर प्रशांत परिचारक यांचे नाव पाहिल्यामुळे अनेकांना पक्षाचे परिचारक यांच्यावर असलेले प्रेम पाहण्याची संधी मिळाली. यामुळे नाराज कार्यकर्त्यांना 'बा विठ्ठला' म्हणण्याची वेळ आली. महायुतीच्या शिंदे, अजित दादा यांच्या आग्रहामुळे 12 पैकी सात जागा भरल्या असल्या तरी पाच जागेमध्ये प्रशांत परिचारक यांचे नाव असल्याने परिचारक यांच्या कट्टर खंदे समर्थकांना भारतीय जनता पक्षामध्ये राहण्याशिवाय पर्याय राहिला नाही. मात्र इतर दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या फळीतील कार्यकर्त्यांना तुतारीची पिपाणी झालीय हे मात्र समजू शकले नाही.
        मुळात प्रशांत परिचारक नव्हे तर मोठे मालक सुधाकरपंत परिचारक व त्यांचा पांडुरंग परिवार हा निष्ठावंत परिवार म्हणून ओळखला जातो. शब्दात गद्दारी त्यांच्याकडून कधीही केली जात नाही. 2009 या विधानसभेच्या निवडणुकीत त्यांनी प्रामाणिकपणे काम केले परंतु त्यांच्यावर काम करूनही आरोप केले गेले यापेक्षा अधिक दुर्दैव कोणते. आजही महाराष्ट्रात प्रशांत परिचारक हे सुधाकरपंत परिचारक यांचे वारसदार म्हणून वावरत आहेत. परंतु मोठे मालक सुधाकरपंत परिचारक यांनी केलेला त्याग, त्यानी केलेले काम, त्यांचे संस्कार महाराष्ट्राला गरज म्हणून उपयोगी येणारे आहेत. अशा परिस्थितीत परिचारक यांच्यावर अन्याय झाला, परीचारक यांना न्याय दिला जात नाही. असे म्हणण्यापेक्षा भारतीय जनता पक्षाने 2010 पासून त्यांचा मानसन्मान केला आहे. खुद्द परिचारक यांनी मी सत्तेत नसताना सुद्धा कोणत्याच मुख्यमंत्र्यांनी, मंत्र्यांनी, पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी मला आमदार नाही म्हणून डावलले नाही. माझे आत्तापर्यंतचे व मतदार संघातील कोणती काम राज्यातील व केंद्रातील सरकारने कधी अडवले नाही, कधी थांबवले नाही, विलंब केला नाही. एका टेक्स्ट मेसेजवर दामाजी साखर कारखान्याला 92 कोटी रुपये मिळाले. या परिस्थितीत मी मोठा, माझे कार्यकर्ते मोठे, माझा परिवार मोठा हे सगळे खोटे. केवळ पक्ष मोठा. पक्ष आहे म्हणून कार्यकर्त्याला, नेत्याला किंमत आहे. यामुळे कार्यकर्त्यांनी नाराज न होता पक्ष सांगेल ते खरे समजून पक्षाची भूमिका जनतेत वटवणे ही काळाची गरज असलेचे सांगितले.
       समविचारी बाबत परिचारक यांनी एके 47 चालवली. ज्यांनी समविचारी केली त्यांना विचारा, मी कोणतीही संस्था चांगली चालावी, सहकारी संस्था चांगली चालल्याने सभासदाचे जनतेचे कल्याण होते. या भावनेने प्रत्येक संस्थेला मी मदत करतो, सहकार्य करतो असे सांगत त्यांनी मंगळवेढ्यातील समविचारी बाबत हवेत मारले जाणारे तीर वरचेवरच दुसऱ्या तीराने संपवले असे दिसत आहे. 
गेल्या दोन महिन्यापासून जनतेत जाऊन जनतेबरोबर चर्चा केल्यानंतर प्रशांत परिचारक व त्यांच्या सहकाऱ्यांनी भाजपच्या राज्याच्या नेतृत्वाबरोबर, केंद्रीय नेतृत्वाबरोबर चर्चा केली. वैयक्तिक केलेले सर्वे, जनतेतून मिळालेला प्रतिसाद याबरोबर पक्षांची गरज असताना पक्षाबरोबर राहणे, देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर राहणे ही मतदारसंघासाठी, पुढील काळासाठी अधिक उपयुक्त भूमिका आहे. या भावनेतून परिचारक यांनी कार्यकर्त्यांच्या भावना समजून घेऊन भारतीय जनता पक्षाबरोबर राहण्याचा निर्णय घेतला. यामुळे सलग दुसरी वेळ समाधान आवताडे यांची समाधान झाले आहे. 
       परिचारक यांनी समाधान आवताडे यांचे समाधान केल्यामुळे आता मतदारसंघात कमळाच्या फुलासाठी सर्व कार्यकर्त्यांना महायुतीच्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी जीवाचे रान करावे लागणार आहे. पंढरपूर मंगळवेढा तालुक्यातील विशेषतः मंगळवेढा तालुक्यातील दक्षिण भागातील जनतेला गेली 40 वर्षे पाण्यापासून वंचित ठेवणाऱ्यांना, केवळ सत्ता मिळवून पाणी न देणाऱ्यांना या निवडणुकीत मतदारसंघातील मतदार महाविकास आघाडीला धडा शिकवतील. असे चित्र उभे करण्यात, असा विश्वास उभा करण्यात भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना यश मिळाले आहे. दिवाळीपूर्वीच दिवाळी मंगळवेढा पंढरपुरात राजकीय दृष्ट्या सुरू झाली आहे.

- विक्रांत पंडित.
   संतसूर्य.

Post a Comment

0 Comments