Type Here to Get Search Results !

संतसूर्य

आमदार समाधान अवताडे यांच्यापुढे माजी आमदार प्रशांत परिचारक यांचे राहणार मोठे आव्हान येणारा काळ वेळ ठरविणार 

मंगळवेढा / संतसुर्य वृत्तसेवा

पंढरपूर मंगळवेढा विधानसभेच्या होणाऱ्या निवडणुकीसाठी आमदार समाधानदादा अवताडे यांना भारतीय जनता पक्षाकडून उमेदवारी मिळणार असल्याचे स्पष्ट संकेत भाजपाचे महाराष्ट्राचे 
सुप्रीमओ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट दिले आहेत . मात्र त्यांच्यासमोर कोण उभारणार प्रशांत परिचारक उभारणार की भगीरथ भालके उभारणार अशी चर्चा होत असताना परिचारक उभारणार का नाही याबद्दल मंगळवेढा चर्चा होत आहे. प्रशांत परिचारक यांनी कोल्हापूर येथे अमित शहा यांच्या दौऱ्यात हजेरी लावली तर मंगळवेढा फडणवीस यांच्या दौऱ्याला दांडी मारली परंतु सोलापूर येथील दौऱ्या परिचारक यांच्याबरोबर चर्चा करून अजित दादा बरोबर स्टेजवरच वेगळी चर्चा केल्याचे चित्र संपूर्ण जिल्हे आणि पाहिले आहे तर आज बुधवारपासून परिचारक यांनी मंगळवेढा तालुक्यात गावभेट दौरा सुरू केला आहे या सर्वाचा अनिवार्य अर्थ एकच आहे की प्रशांत परिचारक निवडणूक लढवणार आहे मग भारतीय जनता पक्षाच्या महायुती कडून लढवणार की की शरद पवार यांची तुतारी घेऊन महाविकास आघाडीतून निवडणूक लढवणार यावर मात्र चर्चा जोरात सुरू झाली आहे 2014 व 2019 या निवडणुकीमध्ये परिचारक यांनी केलेल्या चुका परत न करण्याचा निर्णय घेतला आहे यामुळे कार्यकर्त्यांच्या ऐकून घेणे जनतेचे म्हणणे समजून घेणे मतदान आपल्या बाजूने कसे होईल यासाठी स्वतः प्रशांत परिचारक गांभीर्याने ही निवडणूक घेऊन वाटचाल करत असल्याचे चित्र दिसत आहे पंढरपूर मध्ये परिचारक यांना चांगली संधी आहे किंबहुना पंढरपूर परिचारक यांचा बालेकिल्ला समजला जातो अशा परिस्थितीत मंगळवेढा तालुक्यात त्यांनी दामाजी कारखाना समविचारी आघाडी करून जिंकला आहे तर स्वतः परिचारक यांनी पोटनिवडणुकीमध्ये समाधान आवताडे यांना समर्थन दिले तेव्हा तालुक्यातील चारही जिल्हा परिषद गटात अवताडे यांना मताधिक्य कमी मिळाले होते या सर्व परिस्थितीचा राजकीय अभ्यास करून जातीय समीकरणे जुळवून प्रशांत परिचारक शांतचित्ताने राजकीय हालचाली करत असल्यामुळे समाधान आवताडे यांना भगीरथ भालके यांच्या आव्हान अपेक्षा प्रशांत परिचारक यांचे आव्हान आव्हानात्मक ठरणार आहे असे चित्र हळूहळू दिसू लागली आहे राजकीय परिस्थितीमध्ये हाच समाधान आवताडे लाडकी बहीण 24 गावचा पाणी प्रश्न मंगळवेढ्यातील प्राथमिक शाळेच्या इमारती आमदर्डी बंधारा सिद्धापूर वडापूर बंधारा कात्रज कागद ते भोसे मार्गे चाळीस धोंडा रस्ता असे हजारो कोटीची कामे आमदार समाधान आवताडे यांनी आणून सुरू केली आहेत परंतु विकास कामे वेगळी राजकारण वेगळे निवडणूक वेगळी निवडणुकीची पद्धत वेगळी निवडणुकीची हवा वेगळी निवडणुकीत मतदारांना आपलेसे करून घेणे निवडणुकीत कार्यकर्त्यांना आपलेसे करून आपलेच काम करून घेणे ही महत्त्वाची कामे आहेत विकास कामे ही जेवणाच्या ताटातील लोणचं ,पापड, मीठ, लोणकडी तूप, कोशिंबीर, चटणी, मेतकुट असेल तर जेवणाला चव येते परंतु पोट भरावयाची असेल तर भात पोळी भाजी भाकरी असेल तरच पोट भरते तसे राजकारणामध्ये यशस्वी होण्यासाठी केवळ विकास कामे विकास निधी पक्ष संघटन असावे लागते असे नाही तर संघटनेने सर्वांना सामावून घेऊन नेतृत्वाने यश मिळवावे लागते ही यश मिळवण्यासाठी नेतृत्वाला प्रत्येकाच्या पाठीवर थाप टाकावी लागते त्याचवेळी त्याच्या पाठीवर थाप टाकताना त्याच्या पोटाची काळजी करावी लागते केवळ निवडणुकीच्या काळात शेवटच्या टप्प्यात दहा हजारापासून पन्नास हजारापर्यंत फार तर लाख ते दोन लाख रुपये पर्यंत मदत केली म्हणजे तो कार्यकर्ता तो मतदार तो समर्थ आपला आहे असे ज्या नेतृत्वाला वाटते त्याला निवडणुकीत फटका बसतो परंतु पाच वर्ष आपला कार्यकर्ता आपला माणूस म्हणून जो नेता आपल्या समर्थकाला सांभाळतो त्याला आर्थिक ताकद देतो त्याच्या सुखदुःखात सहभागी होऊन कौटुंबिक आपलेपणा निर्माण करण्यात यश मिळवतो त्याला राजकीय निवडणुकीत कितीही जातीय समीकरणे समोर विरोधासाठी आली तरी त्याने केलेले काम त्याचा सामाजिक सलोखा त्याची त्याच्या परिवारात त्याच्या राजकीय परिवारात तयार झालेली प्रतिमा त्याला निवडणुकीत यश मिळवून देते हे यश मिळवून देण्यासाठी पक्षाची झालर पक्षाचे चिन्ह हे उपयुक्त ठरते परंतु निवडणूक जिंकण्यासाठी नेतृत्वाच्या अंगीच नेतृत्व करण्याचे गुण असावे लागतात ज्याच्याकडे हे गुण असतात त्याला यश मिळवण्यासाठी अधिक कष्ट घ्यावे लागत नाही किंवा ऐनवेळी ची तयारी करण्याची गरज भासत नाही. 
पक्ष पातळीवर जगात सर्वात मोठा पक्ष म्हणून भारतीय जनता पक्षाकडे पाहिले जाते पक्षाची संघटना मजबूत म्हणून पाहिली जाते पक्षाला बौद्धिक वर्ग असल्यामुळे पक्षाचे चहुबाजूने लक्ष असते परंतु नेतृत्वाचे दुर्लक्ष नेतृत्वाचा अहंपणा हे काय असते हे लोकसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपाच्या उमेदवाराला भाजून घ्यावे लागल्यासारखे झाले आहे नेतृत्वाने साधे नेते कार्यकर्ते जिल्हा परिषद सदस्य नगरसेवक पंचायत समिती सदस्य ग्रामपंचायत सदस्य सरपंच यांना एकत्र करणे नव्हे तर दोन लोकप्रतिनिधी देखील एकत्र आणणे महाराष्ट्राच्या नेतृत्वाला जमले नाही याचे स्पष्ट उदाहरण म्हणजे सोलापूर लोकसभा मतदारसंघात पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात स्पष्ट दिसून आले आहे तेव्हा येणारे विधानसभेची निवडणूक ही इच्छुक नेत्याच्या इच्छुक उमेदवाराच्या स्वकर्तृत्वाची त्याच्या आज पर्यंतच्या केलेल्या कार्यकालाची त्याने उभा केलेल्या विकास कामाची त्याने उभा केलेली कुटुंबे त्याने उभा केलेली कार्यकर्त्यांना त्यांनी दिलेली ताकद त्यातून मिळालेली शक्ती ऊर्जा या सर्व केलेल्या कामाची परीक्षा येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत स्पष्ट दिसून येणार आहे निवडणूक जिंकण्यासाठी साम दाम दंड भेद हे आधुनिक लोकशाहीचे धोरण अवलंबावे लागते परंतु सर्व गोष्टी दंड भेद करून किंवा दाम देऊन मिळत नाही त्यासाठी संस्कार सुसंस्कृती सुसंस्कृतपणा सामाजिक नेतृत्व सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी जनतेसाठी केलेला लढा रस्त्यावर येऊन सामान्य जनतेसाठी केलेला संघर्ष चळवळ याचे देखील पाठबळ व ही केलेली आंदोलनाची कामे ही पाच वर्षाच्या विधानसभेच्या निवडणुकीत मतदान करण्यासाठी परिमाण ठरतात या सर्व पार्श्वभूमीचा अभ्यास करता आमदार समाधान आवताडे व माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या निवडणुकीकडे या सर्व प्रश्नांची उत्तरे ज्या नेतृत्वाकडे ज्या कार्यकर्त्याकडे ज्या पक्षाकडे ज्या आघाडीकडे किंवा ज्या युतीकडे आहेत त्यांना ही निवडणूक जिंकण्यासाठी काय करावे लागणार आहे हे स्पष्ट दिसत आहे. 
या पार्श्वभूमीवर आमदार समाधान आवताडे हे तीन हजार कोटीचे विकास कामे घेऊन निवडणुकीला सामोरे जात आहेत याशिवाय स्वतःचा साखर कारखाना स्वतःची सूतगिरणी स्वतःची राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय किर्तीची कन्स्ट्रक्शन कंपनी या सर्वाचा लाभ पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील सर्वसामान्य जनतेला उपलब्ध करून देण्यासाठी अवताडे व त्यांच्या कार्यकर्त्यांनी केलेले प्रयत्न या निवडणुकीत उपयोगी ठरणार आहेत याचवेळी आमदार प्रशांत परिचारक यांची पंढरपूर अर्बन बँक मतदारसंघातच नव्हे तर महाराष्ट्रात अग्रगण्य बँक म्हणून ओळखली जाते सर्वसामान्य शेतकऱ्यापासून उद्योजकापर्यंत सर्वांना या बँकेच्या माध्यमातून त्यांनी मोठ्या प्रमाणात पतपुरवठा केला आहे याचवेळी कचरेवाडी येथील साखर कारखाना या संस्थेच्या माध्यमातून पांडुरंग परिवार पंढरपूर तालुक्यात व मंगळवेढ्यात यशस्वीपणे काम करत आला आहे पंढरपुरातले यश हे अधिक प्रभावी आहे परंतु मंगळवेढ्यात मात्र दामाजी कारखाना या माध्यमातून प्रथमच पांडुरंग परिवाराला अप्रत्यक्षरीत्या समविचारी आघाडीच्या माध्यमातून यश मिळाले आहे हे मिळालेले यश टिकून ठेवण्यासाठी किंवा मिळालेल्या यशात नेतृत्वाला आमदार करण्यासाठी ही समविचारी आघाडी येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत किती प्रभावी ठरणार किती सक्षम ठरणार किती प्रमाणात परिचारक यांना मताधिक्य मिळवून देणार यावर परिचारक यांचे भवितव्य अवलंबून आहे.
मराठा आरक्षण धनगर आरक्षण मनोज जरांगे पाटील यांचा मराठा आरक्षणाचा लढा 24 गाव पाणी प्रश्न पंढरपूरची एमआयडीसी पंढरपूरचा कॅरीडोर दामाजी कारखान्याला मिळालेले 94 कोटी रुपये याशिवाय महात्मा बसवेश्वरांचे स्मारक संत चोखामेळाचे स्मारक या प्रश्नाबाबत परिचारक अवताडे या इच्छुक उमेदवारांनी केलेले प्रयत्न त्यांना मिळालेले यश मिळालेले यश ग्रामीण भागात सर्वसामान्य जनतेपर्यंत किती पर्यंत सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी पोहोच केले आहे किती रुजवले आहे त्याचा परिणाम म्हणून मतात किती टक्के रुपांतरित करून घेता येणार आहे हे सर्व पाहता येणारी निवडणूक ही कार्यकर्त्यांची कामाची पावती ठरणार आहे मात्र ही पावती फाडण्यासाठी नेतृत्वाला मात्र राजकीय नव्हे आर्थिक सामाजिक सांस्कृतिक अशा सर्व स्तरावरील बँकेत खाते उघडून त्याची किंमत करून द्यावी लागणार आहे अथवा त्या खात्यात ही रक्कम क्रेडिट करावी लागणार आहे तरच कार्यकर्ता आपल्या नेत्याला आपल्या गल्लीतून आपल्या घरातून आपल्या वार्डातून आपल्या प्रभागातून आपल्या गावाच्या ग्रामपंचायत मधून आपल्या पंचायत समिती गणातून आपल्या जिल्हा परिषद गटातून मताधिक्य मिळवून देणार आहे नसेल तर वाड्यावर गेलो अड्ड्यात येऊन सांगून जाऊन आलो मालकाने ऐकले नाही दादा ने सांगून देखील ऐकले नाही मग मी काय करू असा म्हणणारा कार्यकर्ता ना मालकाला परवडणार आहे ना दादांना परवडणार आहे हे देखील निवडणुकीपूर्वी नेतृत्वाने लक्षात घेण्याची गरज आहे नेत्याचा आदेश पाळणारा निष्ठावंत कार्यकर्ता परंतु नेत्याची माप काढणारा नेत्यांच्या चुका शोधून चौकात गप्पा मारत बसणारा नेत्यांवर ढाब्यावर किंवा हॉटेलमध्ये बसून टीकाटिप्पणी करणारा कार्यकर्ता आपल्या कोणत्या नेत्याला हा कार्यकर्ता निवडणुकीत विजयाचे यश मिळवून देऊ शकत नाही ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन येणाऱ्या निवडणुकीत ज्याला लोकप्रतिनिधी व्हायचे आहे ज्याला मतदारसंघाचे नेतृत्व करायचे आहे त्या नेतृत्वाने या कार्यकर्त्याचा विचार करण्यापासून विजयी होण्यापर्यंत इतकेच नव्हे तर येणाऱ्या पाच वर्षाच्या काळात मतदार संघाचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी कोणी मदत केली कोणी विरोध केला याचा अभ्यास करण्यापेक्षा मतदारसंघाचा विकास करणे मतदारसंघाचे प्रश्न सोडवणे अशी दूरदृष्टी असलेल्या नेत्याकडे सर्वसामान्य जनता पाच वर्षापासून पाहत आहे त्यामुळे नेतृत्वाने कार्यकर्त्याने कानात सांगितलेले ऐकण्यापेक्षा तोंडावर सगळ्यात एकच स्पष्ट सांगणाऱ्या कार्यकर्त्यांच्या ऐकून आपली भूमिका वेळप्रसंगी बदलवून जनतेच्या हिताची भूमिका घेणाऱ्या नेतृत्वाला या निवडणुकीत पंढरपूर मंगळवेढा ची जनता निश्चित लोकप्रतिनिधी करेल असे सध्या तरी दिसत आहे निवडणुकीत पैसा यशस्वी करेल निवडणुकीत धर्म यशस्वी करेल निवडणुकीत जात यशस्वी करेल या कल्पना या कल्पनाच आहेत याचा मतदाराला अधिकसा संबंध येत नाही सर्वसामान्य मतदार मतदार संघाचा मतदारसंघाच्या विकासाचा आपल्या तालुक्याचा सार्वजनिक विकास करण्यासाठी सर्वधर्मसमभाव सर्वांना बरोबर घेऊन जाणारा लोकप्रतिनिधी असावा म्हणून इच्छुक उमेदवारातील इच्छुक व पात्र उमेदवाराला लोकप्रतिनिधी करून घेण्यासाठी मतदार सदैव तयार असतो केवळ इच्छुक उमेदवाराने कार मधून त्याला हात करणे हात जोडणे किंवा कार्यकर्त्यामार्फत निरोप देऊन बोलावून घेणे मोबाईल वरून त्याला कसे चालले विचारणे यापेक्षा त्याच्या जवळ जाऊन त्याला आपलेसे करून घेऊन त्याला व त्याच्या कुटुंबाचे मतदान मिळवून यश मिळवणारा उमेदवार या निवडणुकीत लोकप्रतिनिधी म्हणून विजयी होणार आहे या निवडणुकीत होणारा लोकप्रतिनिधी महाराष्ट्राच्या विधानसभेत पंढरपूर मंगळवेढ्याचे लोकप्रतिनिधित्व सक्षमपणे करणारा ठरणार आहे

Post a Comment

0 Comments