Type Here to Get Search Results !

संतसूर्य

 
*विधानसभेच्या निवडणुकीसाठी आमदार अवताडे टॉप वन वर...!!!*

*24 गाव योजनेची निविदा निघाल्याने योजना खोटी ठरवणारांना मोठी चपराक -*

मंगळवेढा /संत सूर्य वृत्तसेवा -

 मंगळवेढा तालुक्यातील 24 गाव उपसा सिंचन योजनेसाठी आमदार समाधान आवताडे यांनी केवळ प्रशासकीय मान्यता, शासनाची मंजुरी आणली असे नव्हे तर प्रत्यक्ष या योजनेसाठी संपूर्ण निधी आणला असून योजना सुरू करण्यासाठी दोन्ही प्रकारची संपूर्ण निविदा प्रकाशित झाली आहे. या निविदा प्रकाशित झाल्यामुळे आता या योजनेबद्दल अजूनही शंका घेणाऱ्यांना चांगली चपराक बसली आहे. निवडणुकीचे निकाल ,राजकीय पक्षाची भूमिका, राज्यातील सरकार अशा वेगवेगळ्या परिस्थिती व भूमिका बदलत जात असतात परंतु पहिल्यांदाच आमदार झाल्यानंतर भूमिपुत्र आमदाराने अवघ्या तीन वर्षात एवढी मोठी कमाल करून दाखवली आहे .योजना मंजूर करून आणून संपूर्ण निधी आणला आहे .अनेकांनी गुंजेगाव येथे पाणी साठवण्यासाठी भांडे नाही .असा कल्पना विलास करून कल्पना मांडून या योजनेची टिंगल टवाळी करण्याचा प्रयत्न केला. ही बिन पाण्याची अवताडेची योजना आहे म्हणून हिणवण्याचा प्रयत्न केला तर बरेच जणांना आपण जी योजना आणली, मीच आंदोलन केले माझ्यामुळेच तालुक्याला ही योजना माहीत झाली, माझ्यामुळेच लोकांनी बहिष्कार टाकला, माझ्यामुळेच या योजनेचे महत्त्व जनतेला पटले आहे, माझ्यामुळेच आमदार भारत भालके असो की राम साळे असो यांना हा प्रश्न समजला आहे, माजी मंत्री ढोबळे यांना या पाणी प्रश्नातले काही समजत नव्हते. मीच सांगितले अशा प्रकारचे वक्तव्य करून या प्रकारची चर्चा पंढरपूर मंगळवेढ्यात घडवणाऱ्यांना आमदार आवताडे यांच्या योजना मंजूर करून आणून प्रत्यक्ष निधी उपलब्ध करून काम सुरू करण्याच्या प्रक्रियेमुळे त्यांचा संपूर्ण खोटेपणा उघडा पडला आहे.
आता काम सुरू होत असून काही काळात शेतकऱ्यांच्या शेतातून पाईपलाईन जाणार आहेत. बंद पाइपने पाणी येणार असल्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याला शाश्वत्व, निश्चित पाणी मिळणार आहे. दांडगावा करणारे शेतकऱ्याचे लहान शेतकऱ्याला त्रास होणार नाही. यामुळे या 24 गाव पाणी योजनेला अखेर समाधानदादा अवताडे यांनी केलेले प्रयत्न मंगळवेढेकरांनी त्यांना दिलेला दुवा हा उपयुक्त ठरला आहे. ही योजना मृगजळ आहे असे जाहीर भाषण माजी आमदार डॉक्टर राम साळे यांनी आंधळगाव येथील एका सभेत केले होते परंतु योजनेला नाव बदललं, योजनेतील गावे कमी जास्त झाली तरी देखील आमदार आवताडे यांनी शेतकऱ्यांना बांधील राहून, तालुक्याच्या मातीला बांधील राहून या भूमिपुत्र आमदाराने कमाल करून दाखवली आहे. आत्तापर्यंतच्या 75 वर्षाच्या इतिहासात आमदाराला इतका प्रचंड निधी आणताना आला नाही. अगदी तालुक्यातील अनेक प्रश्न नव्हे तर सर्वच प्रश्न आमदार अवताडे यांनी सोडविले आहेत. याच पद्धतीने पंढरपूर येथील एमआयडीसीचा प्रश्न सोडवला, अनेक वर्षे प्रलंबित असलेला हा पंढरपूरचा एमआयडीसीचा प्रश्न सोडवल्यामुळे आमदार समाधान आवताडे यांच्या बद्दल सर्वसामान्य जनतेत, मतदारात कमालीची सहानभूती निर्माण झाली आहे .
अवताडे ठेकेदार आहेत कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांची कन्स्ट्रक्शन कंपनी आहे ते केवळ त्यांच्या कंपनीचे काम पाहतात असे आरोप केले गेले, 
परंतु यापेक्षा त्यांनी मतदारसंघात 700 कोटीची उपसा सिंचन योजना आणली, ते काम सुरू करून दाखवले याकडे मात्र राजकीय विरोधक सोयीने दुर्लक्ष करत आहेत. अगदी तिसरा राष्ट्रीय महामार्ग मंद्रूप ते चाळीस धोंडा हा तालुक्यात आणला त्याचे काम सुरू केले यापेक्षा सर्वाधिक महत्त्व व अधिक गुण देण्याचे आमदार अवताडे यांना कारण म्हणजे म्हैसाळचे पाणी त्यांनी मान नदीत आणून दाखवले. भविष्यात हे पाणी नियमित केले तर मान नदीकाठचा दुष्काळ कायमस्वरूपी हटणार आहे.
 या सर्व सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय परिस्थितीबरोबर सर्वसामान्य जनतेला, शेतकऱ्यांना, शालेय विद्यार्थ्यांना ज्याची गरज आहे ती गरज आमदार अवताडे यांच्याकडून पूर्ण केली जात आहे. यामुळे येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत आमदार अवताडे यांचे पारडे सध्या जड असून, सध्या ते टॉप वन ला आहेत असे चित्र पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात दिसत आहे.

संतसूर्य
Santsurya News
संत सूर्य न्यूज
मुख्य संपादक-
विक्रांत पंडित मो. 9850177710
संत सूर्य न्यूज

Post a Comment

0 Comments