Type Here to Get Search Results !

संतसूर्य

आमदार समाधानदादा अवताडे यांनी अपेक्षा पूर्ण केल्या पंढरपूर मंगळवेढेकरांच्या

मंगळवेढा / विक्रांत पंडित 

पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे आमदार समाधानदादा अवताडे यांनी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील अनेक वर्षाचे अनेक दशकाचे प्रलंबित असलेले प्रश्न मार्गी लावले आहेत जे प्रश्न गेली दोन पिढी सुटणार नाहीत या प्रश्नाची उकल होणार नाही असे ठामपणे सांगितले जात होते असे प्रश्न आमदार अवताडे यांनी मार्गी लावल्यामुळे मंगळवेढेकरांच्या अपेक्षा पूर्ण झाले आहेत. आत्तापर्यंत शरद पवार , सुशील कुमार शिंदे विजयसिंह मोहिते पाटील यांच्यासह अनेक घर मातब्बर नेत्यांनी मंगळवेढा तालुक्यातील प्रश्न सोडवण्याचे आश्वासन दिले होते हे प्रश्न न सोडवल्यामुळे त्याची किंमत त्यांना मोजावी लागली आहे .2009 असो की अन्य निवडणुका असो शेवटची पोटनिवडणूक देखील असो पंढरपूर मंगळवेढेकरांनी त्याची किंमत मोजून दाखवली मात्र त्याचवेळी देवेंद्र फडणवीस यांनी मतदारसंघातील जनतेने दिलेल्या पाठिंबा हा कायमचा लक्षात ठेवून राज्यात सत्ता बदल केला. त्याप्रमाणेच पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात देखील न सुटणारे प्रश्न सोडवून मोठा बदल घडवून आणला आहे. पंढरपूरची एमआयडीसी ही कधीच होणार नाही अशी कल्पना पंढरपूरकरांनी ठेवली होती ती फडणवीस यांनी मोडीत काढली यासाठी आमदार समाधानदादा अवताडे यांनी केलेले प्रयत्न उपयोगी ठरले. मंगळवेढा तालुक्यातील 24 गाव पाणी योजना हा प्रश्न मृगजला सारखा होता राज्यपालाची परवानगी मुख्यमंत्र्यांची परवानगी कॅलेंडर तारखा अशा अनेक गोंधळाच्या चर्चा तालुक्यात होत् असत .चाळीसधोंडा तेलधोंडा गद्यागाढव उपसा सिंचन योजना अशा अनेक योजनांची नावे झाली परंतु दमदार समाधानदादा नी यांनी या प्रश्नाची उकल करून मंजुरी व निधी एकाच वेळी मिळवून आज या कामाचे भूमिपूजन होत आहे ही बाब मंगळवेढेकरांसाठी सुवर्ण अक्षराने लिहिणारी ठरली आहे .भूमिपुत्र आमदार झाल्यानंतर काय करू शकतो वाढप्या आपला असल्यानंतर किती जेवण मिळते मतदारसंघात सुमारे 3000 कोटी रुपयांचा निधी देश स्वतंत्र झाल्यापासून आजतागायत एकाही आमदाराला आणता आला नव्हता. ही वस्तुस्थिती लक्षात घेतल्यानंतर समाधान दादांनी पंढरपूर मंगळवेढा साठी केलेल्या कामाची पावती मिळते. सिधापुर वडापूर , तामदरडी बंदरा असो या गप्पा मारायच्या विषय असायचे परंतु आज हे देखील प्रश्न मार्गी लागले आहेत .तालुक्यातून तिसरा राज्यस्तरीय महामार्ग नेण्याचे काम अवताडे यांनी केले. ज्या पाण्यासाठी गप्पा मारणे, चेष्टा केली जात होती अशा परिस्थितीत आमदार अवताडे यांनी म्हैसाळचे पाणी मान नदीत आणून आपण पण इतरांपेक्षा वेगळे आहोत असे नव्हे तर वेगळे करून दाखवणारे व्यक्तिमत्व आहोत .हे त्यांनी मान नदीत पाणी आणून दाखवून दिले आहे मंगळवेढा शहरातील प्राथमिक शाळेला 75 वर्षात आज तगायत एकाही आमदाराने एक रुपयाचाही निधी आणून दिला नाही अगदी शासनाकडून सुद्धा मिळाला नाही मात्र अवताडे यांनी दहा कोटी रुपयांच्या निधी इमारतीसाठी आणून प्रत्यक्ष काम सुरू करून दाखवले आहे. मंगळवेढा शहरात 200 खाटचा उपजिल्हा रुग्णालय मंजूर करून आणले इतकेच नव्हे तर निंबोनी येते ग्रामीण रुग्णालय मंजूर केले.
सजग नागरिक संघाने दिल्ली येथे जाऊन प्राथमिक शाळा व आरोग्य केंद्राची पाहणी केली होती त्याप्रमाणे मंगळवेढा तालुक्यात सुविधा व्हाव्यात म्हणून आमदार अवताडे यांच्याकडे पाठपुरावा केला त्याप्रमाणे आमदार अवताडे यांनी देखील महाराष्ट्र शासनाकडे पाठपुरावा करून आरोग्य व प्राथमिक शाळा हे प्रश्न मार्गी लावले आहेत .मंगळवेढा तालुक्यातील अनेक प्रलंबित प्रश्न अवघ्या तीन वर्षाच्या कालावधीत आमदार अवताडे यांनी सोडवून दाखवले आहेत यामुळे त्यांच्या नेतृत्वाची परीक्षा ते पास झाले असल्याचे दिसत आहे येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवारी त्यांना निश्चितपणे मिळणार आहे केवळ मतदार संघातील मतदारांनी त्यांना पुन्हा आमदार करण्याची औपचारिकता राहिली आहे इतके प्रचंड काम त्यांनी केले आहे

Post a Comment

0 Comments