Type Here to Get Search Results !

संतसूर्य

अखेर 24 गाव पाणी योजनेचा आ. समाधान आवताडे यांनी पाडला कांडका
वारे पट्ट्या याला म्हणतात पैलवान

 ८ ऑक्टोबरला होणार भूमिपूजन 

मंगळवेढा संतसूर्य वृत्तसेवा 

मंगळवेढा तालुक्यातील ऐतिहासिक व सर्वांच्याच अत्यंत जिव्हाळ्याचा प्रश्न बनलेल्या “मंगळवेढा उपसा सिंचन” योजनेच्या कामाचा शुभारंभ तसेच “पंढरपूर एम.आय.डी.सी” शुभारंभ सोहळ्याच्या पूर्वसंध्येला पाणीदार आमदार तथा एम आय डी सी जनक श्री.समाधानदादा आवताडे यांनी कार्यक्रम स्थळाची पाहणी करून कार्यक्रम व्यवस्थापन तयारीबाबत संबंधित व्यवस्थापन समितीकडून आढावा घेत मार्गदर्शन पर सूचना केल्या.
आमदार आवताडे यांच्या लोकप्रतिनिधी कालावधीतील एक ठळक आणि महत्वाचा असा मंगळवेढा तालुक्यातील २४गावच्या उपसा सिंचन योजनेच्या कामाला मंजुरी मिळवण्याचा निर्णय तसेच पंढरपूर तालुक्यातील एम आय डी सी चा प्रश्न मार्गी लावता आला आणि आज स्वप्नपुर्तीकडे घेऊन येता आला याचे समाधान आहे
 *येत्या ८ॲाक्टोबर* रोजी सकाळी ठीक १०.०० वाजता या योजनेचे तसेच मतदारसंघाच्या विकास कामांचे शुभारंभ *राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री तथा सदर विकास कामांचे मुख्य प्रवतर्क ना.देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री ना.अजित दादा पवार साहेब* यांचे हस्ते व इतर मंत्री महोदय यांचे उपस्थितीमध्ये संपन्न होणार आहे.
          या योजनेचा एकूण खर्च ६९७ कोटी ७१ लाख रुपये येणार असून १७१८७ हेक्टर क्षेत्र ओलीताखाली येणार आहे .
तीन पंपग्रहाद्वारे पाणी उचलण्यात येणार असून पहिला टप्पा गुंजेगाव, दुसरा टप्पा लक्ष्मी दहिवडी व तिसरा टप्पा गोणेवाडी असे तीन ठिकाणाहून प्रत्येकी चार पंपाद्वारे पाणी उचलण्यात येणार आहे.
या योजनेच्या पहिल्या टप्प्याचे काम यामध्ये पोहोच कालवा, पंपगृह, कळ यंत्र, नलिका व शेलेवाडी येथील गुरुत्वीय नलिका व त्यावरील वितरण व्यवस्थेच्या कामाचे भुमिपूजन होईल या पहिल्या टप्पा क्रमांक एक अंतर्गत शेलेवाडी गुरुत्वीय नलिका द्वारे २०६८.७९ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे.
गेल्या अनेक पिढ्यांचा विकास वनवास संपुष्टात आणून ऐतिहासिक निधीच्या रूपाने मतदारसंघाचे प्रगतीपूरक परिवर्तन करण्याचा माझा मानस आहे आणि तो लवकरच पुर्णत्वास ही येईल हा विश्वास आहे.

Post a Comment

0 Comments