मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री 24 गाव उपसा सिंचन योजना कासेगाव एमआयडीसीच्या भूमिपूजनासाठी येणार जयत तयारी
मंगळवेढा/विक्रांत पंडित
नियोजित असणाऱ्या पंढरपूर कासेगाव एम.आय.डी.सी व मंगळवेढा उपसा सिंचन शुभारंभ सोहळ्याच्या पूर्वसंध्येला कार्यक्रम स्थळाची पाहणी करून कार्यक्रम व्यवस्थापन तयारीबाबत कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती तथा युवक नेते श्री.सोमनाथ आवताडे यांनी संबंधित व्यवस्थापन समितीकडून आढावा घेत मार्गदर्शन पर सूचना केल्या.
गेल्या अनेक पिढ्यांचा विकास वनवास संपुष्टात आणून ऐतिहासिक निधीच्या रूपाने मतदारसंघाचे प्रगतीपूरक परिवर्तन करणारे कर्तबगार लोकप्रतिनिधी म्हणून आमदार समाधान आवताडे यांच्या नजरेतील मतदारसंघाच्या विकास कामांचे राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री तथा सदर विकास कामांचे मुख्य प्रवतर्क ना.देवेंद्र जी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार साहेब यांचे हस्ते व इतर मंत्री महोदय यांचे उपस्थितीमध्ये संपन्न होणार आहे.
सदरवेळी व्यवस्थापन समितीचे प्रमुख श्री.कुर्मदास चटके सो, माजी उपसभापती श्री.धनंजय पाटील गुरुजी, माजी संचालक श्री.भारत निकम सो, माजी सरपंच श्री.चंद्रकांत दादा गोडसे, उपसरपंच श्री.सुहासदादा पवार पाटील, आवताडे शुगरचे श्री.सुहास शिनगारे सो, शेतकी अधिकारी श्री.राहुल नागणे सो, श्री.तोहीद शेख सो, एस.एम.आवताडे कंपनीचे कंपनीचे श्री.बाळासाहेब आवताडे साहेब आदी मान्यवर उपस्थित होते.
मंगळवेढा तालुक्यातील दुष्काळी भागातील ही उपसा सिंचन योजना कधीच होणार नाही ही भावना या भागातील जनतेमध्ये निर्माण झाली होती माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे माजी आमदार डॉक्टर राम साळे स्वर्गी आमदार भारत नाना भालके या सर्वांनी या भागात पाणी मिळावं म्हणून प्रयत्न केले परंतु प्रत्यक्ष मिळणारे पाणी होणारी योजना लागणारा निधी मंजुरी यामध्ये ढोबळे ते भालके यांना मेळ लावता आला नाही. भालके यांनी शरद पवार अजित पवार पृथ्वीराज चव्हाण अशोक चव्हाण यांच्यापासून सर्वांपर्यंत प्रयत्न केले परंतु प्रत्यक्ष मंजुरी व निधी त्यांना मिळवता आला नाही त्यांनी प्रयत्न टिचून केले परंतु निधी मिळवण्यासाठी राजकीय व नशिबाची साथ मिळाली नाही याउलट अवघे तीन वर्ष आमदारकी मिळालेल्या एक वर्ष करणाने काहीही करताना येणाऱ्या काळामध्ये समाधान दादा अवताडे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पाठीमागे लागून ही योजना मंजूर केली प्रशासकीय मंजुरी मिळवली नेते मिळवला निविदा काढल्या आता प्रत्यक्ष भूमिपूजनासाठी खुद्द मुख्यमंत्री व दोन्ही मुख्य उपमुख्यमंत्री मंगळवेढ्यात येत आहेत यामुळे येणाऱ्या काही काळात या योजनेचे पाणी दुष्काळी भागाला निश्चित मिळणार आहे कालवे खोदणे ऐवजी लोखंडी पाईपलाईन द्वारे पाणी दिले जाणार असल्याने काम नियोजित वेळेपेक्षा कमी वेळेत होणार आहे शाश्वत पाणी मिळणार आहे यामुळे आमदार समाधान आवताडे यांना आपण आमदार झालो याच्या समाधान मिळण्यापेक्षा ही योजना मार्गी लावणे , योजनेसाठी निधी आणला, ही योजना
पूर्ण होऊन शेतकऱ्याला पाणी मिळणार याचे समाधान आवताडे यांनाच अधिक समाधान झाले आहे. पंढरपूर तालुक्यातील चार ते पाच दशकापासून प्रलंबित असलेली औद्योगिक वसाहत अखेर ही एमआयडीसी आमदार अवताडे यांच्या प्रयत्नातून कासेगावच्या परिसरात होत आहे ही देखील पंढरपूर मंगळवेढासाठी मोठी जमेची बाजू आहे देश स्वतंत्र झाल्यापासून आतपर्यंत सर्वाधिक निधी आमदार समाधान आवताडे यांनी मतदारसंघासाठी आणला आहे
मंगळवेढा नगरपालिकेच्या प्राथमिक शाळेसाठी आत्तापर्यंत कोणत्याही आमदाराने एक रुपयाचाही निधी दिलेला नाही केवळ आमदार अवताडे यांनी सुमारे दहा ते बारा कोटी रुपयांचा निधी प्रत्यक्षात आणून काम सुरू करून दाखवले आहे प्राथमिक शाळेचा दर्जा उंचावण्यासाठी इमारतीसह प्राथमिक सुविधा देण्यासाठी आमदारनी हा निधी आणला आहे.
मंगळवेढा ग्रामीण रुग्णालयाचे जिल्हा रुग्णालयात रूपांतर केले असून 200 खाटाचे जिल्हा रुग्णालय मंगळवेढ्यात होत आहे शिवाय मंगळवेढा तालुक्यातील निंबोणी येथे ग्रामीण रुग्णालय होत आहे याच्या मंजूर्या देखील आमदारा अवताडे यांनी मिळवले आहेत.
तीन ते चार दशकापासून प्रलंबित असलेला राटेवाडी बंधारा आता होणार आहे यास मंजुरी व निधी मिळाला आहे एकनाथ मंगळवेढा तालुक्यातील भूमिपुत्राला मंगळवेढेकरांनी संधी दिली या संधीचे सोने समाधान आवताडे यांनी करून दाखवले आहे राजकीय विरोधकांनी विरोध करणे मतदानाला विरोध करणे ही बाब साहजिक आहे परंतु प्रत्यक्ष मतदारांनी वाढप्या आपला असल्यानंतर जेवण कसे जास्त मिळते तसा जास्त निधी मतदार संघात मिळाला आहे.
मतदारसंघातील विशेषता मंगळवेढा तालुक्यातील अनेक प्रश्न त्यांनी मार्गी लावले आहेत त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत मतदार विकास करणाऱ्या नेतृत्वाच्या मागे जाणार की राजकीय दृष्ट्या राजकीय नेत्यांच्या ऐकून आपला मार्ग बदलणार हे येणाऱ्या निवडणुकीच्या निकालानंतर स्पष्ट होणार आहे
Post a Comment
0 Comments