मंगळवेढा/संतसूर्य वृत्तसेवा
पंढरपूर मंगळवेढा विधानसभेच्या निवडणुकीत अंतिम क्षणी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून
अनिलदादा सावंत यांना उमेदवारी मिळाली. महाविकास आघाडीमधे बिघाडी झाली, पवार यांच्या मंगळवेढ्यातील समर्थकांनी पवार यांच्यावर मात करून महाविकास आघाडीच्या जागा वाटपात संधी साधली. किंबहुना या समर्थकांची रणनीती शरद पवार यांच्या समोर सरस ठरली असल्याचे दिसत आहे.
हे समर्थक महाविकास आघाडीच्या उमेदवाराला विजयी करणार की राष्ट्रवादीच्या उमेदवाराला विजयी करणार. की माळरानावर कमळ फुलण्यासाठी पाणी देणार याबद्दल मतदारसंघात उलट सुलट चर्चा सुरू आहे. दरम्यान प्रणिती शिंदे यांनी ज्या पद्धतीने भगीरथ भालके यांना उमेदवारी मिळवून दिली त्याच पद्धतीने आता महाविकास आघाडीतील बंडखोरी कशा पद्धतीने शमवणार, त्यांना भालकेना विजयी करण्यापूर्वी बंडखोरी संपुष्टात आणावी लागणार आहे. यामध्ये देखील आता खासदार प्रणिती शिंदे यांचे कौशल्य ,राजकीय रणनीती दिसून येणार आहे. अनिल दादा सावंत हे चांगले व्यक्तिमत्व आहे दूरदृष्टी आहे उद्योजक आहेत समाजाचे जनतेच्या सार्वजनिक विकासासाठी काम करणारे आहेत परंतु माढा तालुक्यातून मंगळवेढ्यात येऊन पंढरपुरात राहून विधानसभेची निवडणूक लढवणे जिंकणे सोपे नाही निवडणूक लढवत आहेत हे कौतुकास्पद आहे परंतु यश मिळवणे हा त्यांचा स्थायी स्वभाव असताना या ठिकाणी समोर हिमालया एवढ्या अडचणी असताना ते ही राजकीय भूमिका कशी व कोणाच्या जीवावर पटवणार हा प्रश्न महत्त्वाचा आहे.
राज्याच्या राजकारणात आमदार विजयी झाल्यानंतर पन्नास कोटीला विकले गेले ही चर्चा देशभर होत आहे. परंतु निवडणुकीत नेता आमदार झाला काय किंवा नाही झाला काय आपल्याला काय मिळणार या ध्येयाने काम करणाऱ्या कार्यकर्त्याला या निवडणुकीत पाहिजे त्याप्रमाणे करण्याची संधी उपलब्ध झाली, त्या संधीचे सोने त्या कार्यकर्त्यांनी करून घेतले आहे.
परिचारक यांची उमेदवारी दाखल न झाल्यामुळे अनेकांना नाते लागत नसताना सुद्धा सुतक आले, पांढरी साडी परिधान करण्याची वेळ आली, कपाळ पांढरे करून घेण्याची वेळ आली. अनेकांनी पुढील पाच वर्षाचे नियोजन होईल या पद्धतीने आर्थिक नियोजन करून ठेवले होते, फोर व्हीलर गाडीचे हप्ते पासून बरेच काही ठरवले होते. परिचारकांचा अर्ज दाखल न झाल्यामुळे अनेकांचा आर्थिक शेअर बाजार मोठ्या प्रमाणात कोसळला. त्यामध्ये उमेश परिचारक यांनी समाधान आवताडे यांच्याबरोबर जाऊन अर्ज दाखल केले. आमदार समाधान आवताडे यांनी मोठे मालक श्रद्धेय सुधाकरपंत परिचारक यांच्या प्रतिमेचे पूजन करून अर्ज दाखल केला. अशा परिस्थितीत अनेकांची राजकीय समीकरणे व आर्थिक समीकरणे बिघडली. आर्थिक समीकरणे बिघडल्यामुळे दिवाळीच्या तोंडावर वेगळा सण साजरा करण्याची वेळ आली.
दरम्यान महाविकास आघाडीतील बंडखोरी म्हणजे देशी चिकन असल्याची महती बऱ्याच जणांना निवडणुकीपूर्वी आली होती, आता तर शंभर टक्के खात्री झाली आहे. सावंत यांचा अर्ज कायम राहिला तर अनेकांना देव पाण्यात ठेवण्याची वेळ येणार नाही, अगदी त्यांच्या कार्यकर्तेवर निर्मला सीतारामन यांचे कडून कारवाई करण्याची वेळ येऊ नये अशी हलक्याने कार्यकर्त्यात चर्चा होत आहे.
महाविकास आघाडीत बिघाडी झाल्यामुळे युतीमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. सोन्यापेक्षा महाग राजकीय चमचा जन्माला घेऊन आलेले नशीबवान समाधान आवताडे सलग दुसऱ्या वेळी नशीबवान ठरले असून आता निवडणुकीत देखील नशीबवान ठरणार असल्याचे चित्र सध्याच्या राजकीय परिस्थितीतून स्पष्ट दिसत आहे. लोकसभेच्या निवडणुकीत व निकालानंतर समाधान आवताडे यांच्याबाबत बोलणारे यांचे दात आता त्यांच्यात घशात पडले आहेत असे स्पष्ट चित्र दिसत आहे. राहता राहिला विषय परिचारक गट अवताडे यांना मदत करणार नाही अशा कितीही पुंगळ्या बाहेर काढल्या तरी परिचारक हे निष्ठावंत आहेत, स्वाभिमानी आहेत, शब्द पाळणारे आहेत. मोठ्या मालकांपासून त्यांच्याकडे ही परंपरा आहे. भालके किंवा सावंत यांना कार्यकर्ते मदत करतील अशा प्रकारचे दुखणे परिचारक गट विकत घेणार नाही. त्यामुळे परिचारक यांच्याकडून भारतीय जनता पक्षाला कोणत्याही प्रकारचा धोका होणार नाही हे सूर्यप्रकाशाइतके स्पष्ट आहे. यामुळे भारतीय जनता पक्षाचे, उमेदवाराचे चांगभले झाले आहे.
Post a Comment
0 Comments