मंगळवेढा/ संतसूर्य वृत्तसेवा
पंढरपूर मंगळवेढा विधानसभेच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून भगीरथ भालके यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली त्यांची उमेदवारी जाहीर होतात मंगळवेढा शहरात व तालुक्यात युवक वर्गाने फटाके फोडून पेढे वाटप करून मोठ्या आनंदाने जल्लोष साजरा केला. संत दामाजी चौक मुरलीधर चौक, शिवाजी तालीम जुनी भाजी मंडई, साठेनगर, सरकार चौक, शिवप्रेमी चौक, संत चोखामेळानगर, संत दामाजीनगर ,शांतीनगर या ठिकाणी मोठ्या उत्साहात या उमेदवारीचे स्वागत करण्यात आले सोशल मीडियामध्ये तरुण वर्गाने सर्वांनी भगीरथ भालके यांचे स्टेटस ठेवले होते रात्री उशीर पर्यंत भगीरथ भालके यांच्या उमेदवारीचा आनंद व कशा पद्धतीने भगीरथ भालके विजयी होतील यावर तरुण वर्ग जोरात चर्चा करत होता खासदार प्रणिती शिंदे यांच्या प्रयत्नामुळे भगीरथ भालके यांना उमेदवारी मिळाली आहे अशी चर्चा होत असताना प्रणिती ताईला ज्या पद्धतीने मताधिक्य मिळाले तसेच मताधिक्य भगीरथ भालके यांना मिळेल अशी चर्चा चौकाचौकात गल्लीबोळात सर्व स्तरावर होत होती. हात चिन्ह मिळाले असल्यामुळे दलित मुस्लिम मताबरोबर जरांगे फॅक्टर या सर्वांचा लाभ भगीरथ भालके यांना होणार असल्याचा विश्वास भालके यांच्या समर्थकातून व्यक्त केला जात होता मुळातच पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात स्वर्गीय आमदार भारत भालके यांचे समर्थक आजही मोठ्या प्रमाणात भारत नानांच्या आठवणी काढून त्यांच्या भावना तेवत ठेवत आहेत. या पार्श्वभूमीवर भगीरथ भालके यांना ही विधानसभेची निवडणूक त्यांचे राजकीय करिअर घडवण्यासाठी अतिशय उपयुक्त ठरेल असे चित्र पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात दिसू लागली आहे. माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी या निवडणुकीत माघार घेऊन आमदार समाधान आवताडे यांना पाठिंबा दिला होता यामुळे समाधान आवताडे यांचे पारडे जड झाले होते निवडणूक एकतर्फी होईल अशी चर्चा 24 तासापूर्वी होत होती परंतु अवघ्या 24 तासातच भगीरथ भालके यांची उमेदवारी हाच चिन्ह घेऊन जाहीर झाल्यामुळे आता ही निवडणूक रंगतदार होईल अशी चिन्हे दिसू लागली आहेत.
दामजी चौकात दामाजी पुतळ्यास पुष्पहार घालून कार्यकर्त्यांनी आनंद साजरा केला यावेळी पंचायत समितीचे नितीन पाटील, माजी नगराध्यक्ष सोमनाथ माळी ,राहुल वाकडे ,गणेश धोत्रे ,अरबाज तांबोळी ,संदीप बुरकुल, अँड दत्तात्रेय खडतरे अजित यादव, रवींद्र घुले ,कयूम मुल्ला यांच्यासह अनेक नेते कार्यकर्ते यांनी आनंदोतव साजरा केला
Post a Comment
0 Comments