Type Here to Get Search Results !

संतसूर्य

पुन्हा परिचारक यांच्या पाठिंब्यामुळे भाजप विरोधी वातावरणात निराशा , आवताडे यांनी धोरण बदलण्याची गरज


मंगळवेढा संतसूर्य वृत्तसेवा 

 मंगळवेढा तालुक्यातील आमदार आवताडे यांच्या राजकीय विरोधकांनी विधानसभेच्या निवडणुकीत आमदार आवताडे यांना तीव्र विरोध करण्याचा निर्णय घेतला होता .यासाठी त्यांनी माजी आमदार प्रशांत परिचारक यांना महाविकास आघाडी कडून तुतारी चिन्ह घेऊन लढावे किंवा अपक्ष म्हणून निवडणूक लढवावी यासाठी प्रचंड दबाव आणला होता .यामुळे परिचारक विरुद्ध आवताडे अशी लढत जोरदार होईल असे चित्र मतदारसंघात निर्माण झाले होते .या सर्व पार्श्वभूमीवर चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत परिचारक यांनी आमदार आवताडे यांच्या भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला विजयी करण्याचे आवाहन केले आहे. यामुळे आवताडे यांच्या विरोधात असणाऱ्या मंडळींमध्ये मोठ्या प्रमाणात अस्वस्थता निर्माण झाली आहे. नाराजी आहे, पण व्यक्त करता येत नाही ,राग आहे तोही व्यक्त करता येत नाही. परिचारकांचे निष्ठावंत म्हणून घ्यायचे आणि परिचारिकांनी घेतलेल्या निर्णयाच्या विरोधात जायचे हा त्रास त्यांना होत आहे .परंतु राजकीय नेत्यांमध्ये समय सूचकता ,राजकीय कार्यकर्त्यांमध्ये सहनशीलता असणे आवश्यक आहे. भारतीय जनता पक्षाच्या एका विचाराने काम करत असताना मतभेद असणे, आक्षेप असणे हे मान्य आहे परंतु नेत्याने मान्य केल्यानंतर खाली कार्यकर्त्याला ते मान्य करणे अवघड जाते. परंतु परिस्थिती काही करू शकत नाही .यामुळे भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला असलेला विरोध त्याची तीव्रता कमी होत जाईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. याच वेळी आमदार समाधान आवताडे यांची जबाबदारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे .पक्षातील सर्व लोकांना विशेषतः परिचारक समर्थकांना सामावून घेण्यासाठी स्वतःच्या भूमिकेत मोठ्या प्रमाणात बदल करून घ्यावा लागणार आहे. व्यापकता वाढवावी लागणार आहे .जेणेकरून या सर्वांना न्याय देण्याची जबाबदारी परिचारक यांच्या मार्गदर्शनाखाली समाधान आवताडे यांना घ्यावी लागणार आहे. यामुळे या सर्व कार्यकर्त्यांना भारतीय जनता पक्षाचे काम करणे सहज सुलभ व सोपे होणार आहे .निवडणुकीचा निकाल हा मतदारांच्या हाती आहे परंतु उमेदवार ,समर्थ कार्यकर्ते, पक्षाचे नेते, पक्षाचे कार्यकर्ते यांना मात्र मतदान होईपर्यंत सतत प्रयत्नशील राहावे लागणार आहे .अशा परिस्थितीत कार्यकर्त्यात निर्माण झालेली अस्वस्थता कमी करण्यासाठी त्याची तीव्रता कमी करण्यासाठी समय सूचकता दाखवण्याची गरज आहे. त्याच वेळी प्रत्यक्ष कर्तव्य देखील दाखवण्याची गरज आहे. कार्यकर्त्याच्या अडीअडचणी समजून घेण्याची गरज आहे. चुकावर पांघरून घालण्यापेक्षा चूक दुरुस्त करण्याची गरज आहे. यामुळे पक्षाला उमेदवाराला त्रास होणार नाही. कार्यकर्त्यांना देखील नाराजी लपवण्याची गरज राहणार नाही .कार्यकर्ता हा सर्वसामान्य जनतेची कामे करण्यासाठी मतदारसंघातील वार्डातील, गावातील ,कामे करण्यासाठी अग्रेसर भूमिका घेत असतो. शासनाच्या योजना सामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी सहकार्य करत असतो .यामुळे कार्यकर्त्याला न्याय देण्याची गरज, कार्यकर्त्याला विश्वास देण्याची गरज, कार्यकर्त्यांमध्ये आपलापणा निर्माण करण्याची गरज निर्माण झालेली आहे. या पार्श्वभूमीवर आमदार आवताडे यांनी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील परिस्थितीचा अंदाज घेऊन काम करण्याची गरज आहे. असे मत सर्व सामान्य जनतेतून व्यक्त केले जात आहे.

Post a Comment

0 Comments