Type Here to Get Search Results !

संतसूर्य

ज्यांनी देवेंद्र फडणवीस चे ऐकले नाही ते बावनकुळे यांचे ऐकणार का ? परिचारक अपक्ष  राहण्याची शक्यता जास्त 
मंगळवेढा / विक्रांत पंडित 

पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघांमध्ये महायुतीकडून उमेदवार म्हणून विद्यमान आमदार समाधानदादा अवताडे यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नंतर येथील अवताडे शुगर च्या कार्यक्रमात जाहीर उमेदवारी केली होती तर लक्ष्मी दहिवडी येथील 24 गावच्या पाणी भूमिपूजन या कार्यक्रमात पाठराखण केली यामुळे अवताडे यांनी नवरात्र महोत्सव व दसरा मिरवणुकीत मोठ्या प्रमाणात दृकश्राव्य माध्यमातून मोठ्या प्रमाणात जाहिरात केली या परिस्थितीत अवताडे व परिचारक यांच्या तोडगा काढण्यासाठी आता प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे येत आहेत परंतु परिचारक यांचे समर्थक कोणतेही, काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीत. त्यांना पांडुरंग परिवाराच्या माध्यमातून परिचारक यांना आमदार करावयाचे आहे. यामुळे प्रशांत परिचारक ना महायुतीची उमेदवारी ना महाविकास आघाडीची उमेदवारी घेण्याच्या मानसिकतेत नाहीत. परिचारक समर्थकांनी यंदा ठरवलं आहे त्यामुळे परिचारक समर्थकांना प्रशांत परिचारक यांना आमदार केल्याशिवाय शांत राहायचे नाही .या परिस्थितीत चंद्रशेखर बावनकुळे यांचे प्रस्ताव परिचारक व परिचारक यांच्या समर्थक मान्य करतील. याकडे संपूर्ण सोलापूर जिल्ह्याचे लक्ष लागले आहे लोकसभेच्या निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांना परिचारक व अवताडे यांना एकत्र आणणे जमले नाही आता खुद्द स्वतःच्या निवडणुकीत परिचारक व अवताडे हे एकमेकाला मदत करण्याची शक्यता नाही परंतु अवताडे राजकीय चाल म्हणून परिचारक यांना मदत करण्याची घोषणा किंवा इच्छा जाहीर करू शकतात यामुळे पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील युतीची उमेदवारी ही आता संघर्षमय टोकाला आली आहे तोडगा न निघाल्यास ,तोडगा मान्य न झाल्यास फुटाफुटी अटळ आहे .मात्र याच वेळी महाविकास आघाडीमध्ये देखील काही आनंदाचे लाडू फुटत नाहीत त्यांच्याकडे देखील उमेदवार व उमेदवारांची पार्श्वभूमी बघता दिवाळीतील सणांमध्ये करंजी ,चकली साठी तेल उकळून तयार ठेवले आहे .यात भालके की अनिल सावंत ,काँग्रेस की राष्ट्रवादी काँग्रेस असे वेगवेगळे प्रश्न निर्माण झाले आहेत कढई तयार आहे तेल तयार झाले आहे फक्त त्यामध्ये भगीरथ भालके की अनिल सावंत असे प्रश्न निर्माण झाले आहेत परंतु महाविकास आघाडीमध्ये त्यांना हवा असलेला उमेदवार पाहिजे आहे यामध्ये भगीरथ भलके ,अनिल सावंत ,वसंतनाना देशमुख ,राहुल शहा, चंद्रशेखर कोंडुभैरी, प्रथमेश पाटील ,पांडुरंग जावळे यांच्यासह अनेक जण इच्छुक आहेत .यापैकी चकली करंजी होण्याचा मान कोणाला मिळणार याकडे पंढरपूर मंगळवेढा तालुक्यातील मतदारांचे लक्ष लागून राहिले आहे 
दरम्यान चंद्रशेखर बावनकुळे यांचे म्हणणे परिचारक स्वीकारणार की अवताडे मानणार याबद्दल मात्र मार्ग निघेल असे दिसत नाही

Post a Comment

0 Comments