पंढरपूर मंगळवेढा विधानसभेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम घटीका आली असताना अद्याप महाविकास आघाडी, महायुती यांच्याकडून उमेदवार जाहीर केला गेला नाही ,तर अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्यासाठी चर्चेत असलेले प्रशांत परिचारक यांनीही अर्जही दाखल केला नाही. युती आघाडी सह कोणत्याच पक्षाचे नाव घेण्याची मानसिकता त्यांच्याकडून दिसून येत नसताना निवडणूक लढवण्याबाबत मात्र निर्धार असल्याचा त्यांच्या कार्यकर्त्यातून दिसून येत आहे . हॉटेल मैत्रेय मध्ये परिचारक समर्थकांच्या दोन बैठका झाल्या त्यांना मिळालेल्या प्रतिसादावरून समविचारी कोणती भूमिका घेणार याकडे तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे.अशा परिस्थितीत पंढरपूर, मंगळवेढा तालुक्यात भावी आमदार तिघेही ढगाळ झाले असल्याचे चित्र दिसत आहे. 3000 कोटीची विकास कामे केलेले उपमुख्यमंत्री तथा भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष्मी दहिवडीच्या माळरानावर 24 गाव पाणी योजनेचे भूमिपूजन करताना समाधान आवताडे यांना मी पाठीशी आहे अशी ग्वाही दिली होती .तर नंदुर येथील आवताडे शुगर कारखान्याच्या कार्यक्रमात पुढील उमेदवारी व आमदार हे समाधान आवताडे असतीलच हे त्यांनी जाहीर केले होते .अशा परिस्थितीत आवताडे यांनी प्रचाराचा धुमाकूळ माजवला होता. नवरात्र महोत्सवात मंगळवेढा शहरात गल्लीबोळापासून चौका- चौकात बायपासला सुद्धा समाधान आवताडे यांच्या प्रचाराच्या गाड्या दिसत होत्या .खुद्द समाधान आवताडे ची भाषणे लावली जात होती. यामुळे आवताडे यांची उमेदवारी लवकरच जाहीर होईल अशी परिस्थिती होती. आताही आवताडे यांचीच उमेदवारी होईल मात्र महाविकास आघाडी कडून कोण लढणार याबद्दल मात्र उत्सुकता निर्माण झाली आहे .गेल्या दोन दिवसात प्रशांत परिचारक यांना महाविकास आघाडी मधून राष्ट्रवादी काँग्रेसची तुतारी मिळेल असे सांगितले जात होते, परंतु तुतारीसाठी त्यांनी मुंबई दौराच केला नाही .त्यांच्या वतीने काही उत्साही कार्यकर्त्यांनी उमेदवारी मागितली होती. याउलट भगीरथ भालके यांनी राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस दोन्हीकडे मुलाखती देऊन उमेदवारी मागितली आहे .आता महाविकास आघाडी कडून कोणाला संधी मिळणार याबद्दल उत्सुकता निर्माण झाली होती. या परिस्थितीत उमेश परिचारक यांनी आमची भूमिका स्पष्ट असणार आहे. कार्यकर्ते सांगतील त्याप्रमाणे आम्हाला जनतेच्या भरोश्यावर राजकीय निर्णय घेणार असल्याचे सांगितल्याने परिचारक यांचा कल अपक्ष असेल असे वाटू लागले आहे .यामुळे राष्ट्रवादीची ही जागा कदाचित काँग्रेसला दिली जाईल व काँग्रेसकडून भगीरथ भालके यांना संधी मिळेल. पर्यायाने महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून भगीरथ भालके पुढे येतील असे दिसत आहे .याच काळात महाविकास आघाडी कडून तथा राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळावी म्हणून लवंगी कारखान्याचे व्हाईस चेअरमन अनिल सावंत यांनी गेल्या दोन महिन्यात कोट्यावधी रुपयाचा खर्च करून मतदारसंघात जोरदार प्रयत्न केला .परंतु महाविकास आघाडी कडून उमेदवारी मिळवण्यात विशेषता राष्ट्रवादी काँग्रेस कडून उमेदवारी मिळवण्यास त्यांना अद्याप सूचिन्हे दिसत नाहीत. ज्यांनी त्यांना राष्ट्रवादीचे उमेदवारी मिळवून देतो म्हणून सांगितले ,अनेकांनी त्यांच्याकडून सहकार्य घेतले, त्यांनी घेतलेल्या सहकार्याची पंढरपूर- मंगळवेढा तालुक्यात जोरदार चर्चा होत आहे. मात्र हे सहकार्य घेतलेले निवडणुकीत व निवडणुकीनंतर त्यांच्याबरोबर राहतील का याबद्दल शंका निर्माण होत आहे. अनिल सावंत यांना भोसे जिल्हा परिषद गटाची निवडणूक सहज जिंकण्याची तयारी त्यांच्या समर्थकांकडून केली जात आहे .अशी शंका राजकीय निरीक्षकातून व्यक्त केली जात आहे.
Post a Comment
0 Comments