गोल्डन सिताफळ व तैवान पेरु नी मंगळवेढा बाजार समिती फुलली, पेरू सिताफळ चालले कलकत्ता दिल्ली लखनऊ कानपूरला
मंगळवेढा /विक्रांत पंडित
कृषी उत्पन्न बाजार समितीने मंगळवेढा तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी डाळिंब खरेदी विक्री केंद्र सुरू केले याचा लाभ तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांना झाला शेतकऱ्यांचा नाहक वेळ वाचला त्यांना चांगला दर मिळाला बाजार समितीने त्यांना चांगल्या सुविधा उपलब्ध करून दिल्या त्यामुळे सोलापूर सांगोला या ठिकाणी जाण्याचे त्यांचा त्रास वाचला फसवणूक वाचली यामुळे शेतकरी वर्गातून आनंद व्यक्त केला जात होता मंगळवेढा तालुक्याची लोकनेते बबनराव आवताडे तात्कालीन सभापती सोमनाथ अवताडे संचालक सुरवसे यांच्या प्रयत्नाने बाजार समितीमध्ये डाळिंब खरेदी विक्री सुरू झाली परंतु आता या ठिकाणी सिताफळ पेरू याची देखील आवक वाढली असून या सिताफळ पेरूला मुंबई दिल्ली कलकत्ता लखनऊ बेंगलोर कानपूर आदी भागातून मागणी येत आहे मंगळवेढा तालुक्यातील खुपसंगी येथील शेतकऱ्यांनी सिताफळाची लागवड मोठ्या प्रमाणात केली आहे गोल्डन सिताफळामुळे बाजारात आवक वाढली आहे एक सीताफळ 200 ते 400 ग्रॅम चे असल्यामुळे व्यापाऱ्यांना देखील हे सीताफळ खरेदी करण्यासाठी उत्साह वाढला आहे खुपसंगी येथील मोहन शंकर माळी यांच्या आडती वर मोठ्या प्रमाणात गोल्डन सीताफळाची आवक झाली आहे आंधळगाव गोणेवाडी मरवडे खुपसंगी या भागातून सिताफळ येत असून लखन तांबे, गणपत माळी ,भास्कर पवार ,तावशी मारापुरच्या विद्याराणी यादव यांच्याकडून गोल्डन सिताफळची आवक वाढलेली आहे. याशिवाय तैवान पेरूचे उत्पादन देखील तालुक्यात चांगले होत आहे सीताफळ व पेरू उत्पादकांना चांगला दर मिळत असल्यामुळे मंगळवेढ्याच्या बाजार समितीच्या आवारात आता डाळिंबाच्या मार्केट चे आवारात पेरू सिताफळाचे मार्केट वाढलेले दिसत आहे.
डाळिंब पेरू सिताफळ चे व्यापारी मोहन माळी यांनी हा व्यवसाय अनेक वर्षांपासून करत आहे असे सांगून आता सध्या मार्केटमध्ये चांगले बस्तान बसले असल्याचे सांगत हा व्यवसाय अतिशय रिस्क घेऊन जबाबदारीने करावा लागत आहे जे मिळेल त्यात समाधान मानावे लागते परंतु शेतकऱ्यांचे बिलाची पट्टी मात्र वेळेवर देत असल्यामुळे त्याचे वेगळे समाधान मिळत आहे या व्यवसायाला केंद्र शासनाने राज्य शासनाने संरक्षण देण्याची गरज आहे व्यवहाराला संरक्षण मिळण्याची गरज आहे अनोळखी व्यापाऱ्यावर विश्वास टाकून लाखो, कोट्यावधी रुपयाचा माल उधार द्यावा लागत आहे त्याच्याकडून मिळालेले पैसे प्रत्यक्ष मिळे पर्यंत अनंत अडचणी असतात यामध्ये आत्तापर्यंत पूर्वी मोठा तोटा सहन करावा लागलेला आहे शेवटी परमेश्वराची कृपा म्हणून झालेले नुकसान भरून काढून हा व्यवसाय पुढे आता सध्या चांगल्या पद्धतीने करत आहे केवळ शेतकऱ्यांच्या आशीर्वादामुळे या व्यवसायात तग धरून आहे मात्र मंगळवेढा तालुक्यातील शेतकऱ्यांना सेवा देण्याचे भाग्य लाभल्यामुळे शेतकऱ्यांचे बाजार समितीचे बबनराव आवताडे ,सिद्धेश्वर अवताडे, चेअरमन सुशील अवताडे यांचे त्यांनी आभार मानले आहे.
Post a Comment
0 Comments