Type Here to Get Search Results !

संतसूर्य


अँड कोमल ढोबळे यांनी घेतली शरद पवार सुप्रिया सुळे यांची भेट, राजकीय समीकरणे बदलणार बहुजन रयत परिषदेचा लाभ महाविकास आघाडीला होणार

मंगळवेढा/संतसूर्य वृत्तसेवा 

आज मुंबई येथे यशवंतराव चव्हाण सेंटर येथे बहुजन रयत परिषदेच्या प्रदेशाध्यक्ष ॲड कोमलताई साळुंखे यांच्या समवेत बहुजन रयत परिषदेचे राज्य कार्यकरणी सदस्य यांनी मा.खा शरदचंद्र पवार साहेब, खासदार सुप्रियाताई सुळे  यांची भेट घेतली. माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांनी दोन दिवसांपूर्वीच भारतीय जनता पक्षाला सोडचिट्टी देण्याचा निर्णय घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याचे जाहीर केले होते या पाठोपाठ कोमल ढोबळे यांनी शरद पवार व सुप्रिया सुळे यांची भेट घेतल्यामुळे भोजन रयत परिषदेच्या कार्यकर्त्यात व ढोबळे समर्थकात प्रचंड उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे ढोबळे यांच्या या भूमिकेमुळे पंढरपूर मंगळवेढा मोहोळ बार्शी माळशिरस सोलापूर अक्कलकोट आधी ठिकाणी जिल्ह्यात मोठे परिणाम होणार आहेत महायुतीला याचे परिणाम भोगावे लागणार असून महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मोठी संधी मिळणार आहे पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून प्रशांत परिचारक यांना किंवा भगीरथ भालके यांना उमेदवारी मिळाली तर त्यांना विजयी करण्यासाठी ढोबळे यांचे योगदान महत्वपूर्ण ठरणार आहे भारतीय जनता पक्षामध्ये ढोबळे यांची उणीव मोठ्या प्रमाणात जाणवणार आहे. ढोबळे यांना सोलापूर जिल्ह्याचा राजकीय सामाजिक सांस्कृतिक अभ्यास असून खडा ना खडा माहिती आहे गेली 25 वर्षे आमदार मंत्रीपद भोगल्या शिवाय दोन वेळा लोकसभेची निवडणूक पंढरपूर मधून लढवली आहे तर उस्मानाबाद बार्शी मधून एकदा लोकसभेची निवडणूक लढवली आहे सोलापूर महानगरपालिकेची निवडणूक एक हाती त्यांनी पुलोदला जिंकून दिली होती जिल्ह्याच्या राजकारणात त्यांना चाणक्य म्हणून ओळखले जातात ढोबळे मास्तर हे खोडील मास्तर आहेत हे ज्या राजकारणी नेत्यांना माहित आहे त्यांना त्यांच्या खोड्या माहित आहेत त्यांच्या राजकीय कारकीर्दीत त्यांनी अनेक उलथापालती केले आहेत आता या विधानसभेच्या निवडणुकीत ते करणार असणाऱ्या उलथापालतीमध्ये त्यांना किती यश मिळणार याकडे सोलापूर जिल्ह्यातील राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागून राहिले आहे

Post a Comment

0 Comments