मंगळवेढा/संतसूर्य वृत्तसेवा
सोलापूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री देशाचे नेते शरद पवार यांचे जुने सहकारी अनुयायी यांनी नुकताच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे त्यांची पवार साहेबांवर असलेली निष्ठा त्यांनी पवार साहेबांसाठी केलेले काम त्यांच्या चाळीस वर्षाचे काम पाहतात त्यांनाच मोहोळ विधानसभा मतदारसंघातून विधानसभेचे उमेदवारी मिळणार असल्याची चिन्हे दिसू लागली आहेत
महाविकास आघाडी मोठ्या ताकदीने विधानसभा निवडणूक लढवित आहे. सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ मतदार संघात तुल्यबळ उमेदवार नसल्याने सदर जागेवर ज्येष्ठ नेते लक्ष्मणराव ढोबळे यांना उमेदवारी मिळावी, अशा मागणीचे निवदेन बहुजन रयत परिषदेच्या राज्य कार्यकरणीने प्रदेशाध्यक्षा ॲड. कोमलताई साळुंखे-ढोबळे यांच्या नेतृत्त्वाखाली राष्ट्रवादी कांग्रेसचे सर्वेसर्वा ज्येष्ठ नेते शरद पवार यांची मुंबई येथे यशवंतराव चव्हाण सेंटर मध्ये भेट घेऊन दिले. याबाबत आपण सकारात्मक विचार करू, असे शरद पवार यांनी म्हटले असल्याने बहुजन रयत परिषदेच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात ज्यांना शब्दप्रभू म्हणून ओळखले जाते, असे माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांना भारतीय जनता पक्षामध्ये गेली दहा वर्षे सातत्याने कार्यरत राहूनही पक्षाकडून कोणतीही दखल घेतली नाही. कोणत्याही योग्य पदावर संधी दिली नाही, याउलट कनिष्ठ दुसऱ्या-तिसऱ्या फळीतील कार्यर्त्यांच्या रांगेत उभे केले. सोलापूर जिल्ह्यासंदर्भात पक्षपातळीवर कुठलाही निर्णय घेताना विचारात घेतले जात नव्हते, अगदी फ्लेक्सवरील फोटोही हटविण्यापर्यंतचे राजकारण केले गेले, या कारणातून लक्ष्मणराव ढोबळे यांनी भाजप पक्षातून बाहेर पडून त्यांचे राजकीय गुरू असलेले शरद पवार यांच्यासोबत जावे, तुतारी हाती घ्यावी, असा दबाव बहुजन रयत परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी आणल्याने अखेर भाजपमधून बाहेर पडण्याचा निर्णय लक्ष्मणराव ढोबळे यांनी घेतला, खुद्द शरद पवार यांनीही ढोबळे यांच्या निर्णयाचे स्वागत केले.
या पार्श्वभुमीवर मुंबई येथे यशवंतराव चव्हाण सेंटर मध्ये राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार. खासदार सुप्रिया सुळे यांची भेट घेत बहुजन रयत परिषदेच्या प्रदेशाध्यक्ष ॲड कोमलताई साळुंखे यांच्या नेतृत्तवाखाली बहुजन रयत परिषदेचे पदाधिकाऱ्यांनी विधानसभा निवडणुकीत ढोबळे यांना मोहोळ येथून उमेदवारी देण्याची मागणी निवेदनाद्वारे केली आहे.
सोलापूर जिल्ह्यातील जाणते नेतृत्त्व म्हणून लक्ष्मणराव ढोबळे यांची ओळख आहे. २५ वर्षे आमदार तसेच मंत्री म्हणून कार्यरत असताना पंढरपूर-मंगळवेढा मतदार संघाचा पूर्ण अभ्यास त्यांना आहे. पालकमंत्री म्हणून कार्यरत असताना त्यांनी आपल्या कामाचा छाप उमटविली आहे. मोहोळ, बार्शी, माळशिरस, सोलापूर, अक्कलकोट आदी ठिकाणी एक भक्कम नेतृत्त्व म्हणून ते सुपरिचीत आहेत. सोलापूर जिल्ह्याचा राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक अभ्यास असलेले ढोबळे यांनी लोकसभेची निवडणूकही पंढरपुरातून लढविली आहे. उस्मानाबाद, बार्शी येथूनही ते लोकसभेच्या रिंगणात उतरले होते. याशिवाय सोलापूर महापालिका, जिल्हा परिषद अशा निवडणुकांत त्यांनी आपल्या नेतृत्त्वात पक्षाला एक हाती सत्ता मिळवून दिलेली आहे. दामाजी साखर कारखाना, सूत गिरणी आणि शाहू शिक्षण संस्था ही लक्ष्मणराव ढोबळे यांची बलस्थाने मानल जातात. याशिवाय समाज मोठ्याप्रमाणात त्यांच्या मागे उभा आहे. त्यामुळे मोहोळ विधानसभेसाठी त्यांच्या सारख्या सक्षम नेतृत्वाला संधी मिळाल्यास ते नक्की विजयी होतील, असा विश्वास आम्हा बहुजन रयत परिषदेच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांना वाटतो, राजकीय निरीक्षकांनीही असे मत नोंदविले असल्याचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांना दिलेल्या निवेदनात म्हटले असल्याचे प्रदेशाध्यक्ष ॲड. कोमलताई साळुंखे-ढोबळे यांनी सांगितले.
Post a Comment
0 Comments