मंगळवेढा / विक्रांत पंडित
पंढरपूर मंगळवेढा विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज पंढरपूर येथे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या चर्चेनंतर आमदार समाधान आवताडे व माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्यात समझोता झाला असून दरम्यान पक्षाने अवताडे यांना उमेदवारी जाहीर केली आहे यामुळे विधानसभेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाकडे ही जागा जाणार असल्याचे निवडणुकीच्या निकालापूर्वीच स्पष्ट दिसू लागले आहे महायुतीचे उमेदवार समाधान आवताडे यांच्यासमोर आता महाविकास आघाडी कडून कोणाला संधी मिळणार याकडे तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे मतदारसंघात भगीरथ भालके अनिल सावंत ,नागेश भोसले,कासेगावचे वसंत नाना देशमुख ,राहूल शहा, यापैकी कोणाला तरी मिळेल असे दिसत आहे. मात्र परिचारक व अवताडे एकत्र आल्यामुळे परत एकदा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाची ताकद मोठ्या प्रमाणात वाढणार आहे याचा परिणाम भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराच्या विजयात होणार आहे अवताडे व परिचारक यांच्यात म्हणून मिलन झाले असल्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत अवताडे यांनी भारतीय जनता पक्षाच्या सर्व नेते कार्यकर्ते यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट शिवसेना एकनाथ शिंदे गट व महायुतीला मदत करणारे सर्व नेते कार्यकर्ते पंढरपूर मंगळवेढ्यातील सर्व हितचिंतकांना अवताडे यांनी या निवडणुकीत आपलेपणाने सामावून घ्यावे व ही निवडणूक जिंकून पक्षाला एक चांगली संधी उपलब्ध करून द्यावी यापुढील काळात कायम राजकारण करताना सर्वांचा सन्मान ठेवावा सर्वांना आपलेसे करून घ्यावे जेणेकरून भारतीय जनता पक्षाची ताकद वाढेल प्रशांत परिचारक यांच्या समर्थकांना कार्यकर्त्यांना अधिक सन्मानाची वागणूक देऊन त्यांना सामावून घेऊन त्यांचा सन्मान करून त्यांची कामे करावी जेणेकरून या पुढील काळात भारतीय जनता पक्षाला कोणती निवडणूक जिंकताना परिचारक अवताडे यांना ती निवडणूक जिंकणे सहज सोपे जाईल व भारतीय जनता पक्षाचा पंढरपूर मंगळवेढा हा कायमस्वरूपी बालेकिल्ला होईल या पद्धतीने या पुढील काळात परिचारक अवताडे यांनी काम करत पक्षाची संघटना पक्ष अधिक मजबूत करावा व त्याची तयारी याच विधानसभेच्या निवडणुकीत करून पुढील अनेक दशके ही परिस्थिती कायम ठेवावी मोठे मालक स्वर्गीय सुधाकर पंत परिचारक यांनी पंढरपूर तालुक्यांमध्ये अनेक विकासाची कामे केली सर्वांना सहकार्य केले त्यातून पंढरपूर तालुका त्यांनी बालेकिल्ला करून चांगल्या पद्धतीने हाताळला होता त्याच पद्धतीने या पुढील काळात प्रशांत परिचारक यांनी हा तालुका अधिक मेहनत घेऊन हाताळावा पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात आमदार समाधान आवताडे यांनी विकास कामासाठी पक्ष वाढीसाठी एकत्रित काम करावे व या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला आपला विजय निश्चित करून घ्यावा देवेंद्र फडणवीस चंद्रशेखर बावन खुळे यांच्यासह अनेक नेते महाराष्ट्रात युतीचे शासन यावेळी साठी प्रयत्न करत आहेत त्याला प्रशांत परिचारक समाधान आवताडे यांनी चांगल्या पद्धतीने हातभार लावावा दरम्यान अवताडे यांना उमेदवारी मिळाल्याबरोबर व प्रशांत परिचारक व अवताडे यांच्यात म्हणून मिलन झाल्यामुळे पंढरपूर मंगळवेढा तालुक्यात भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांनी समर्थकांनी हीतचिंतकांनी फटाके फोडून मिठाई वाटून दिवाळीपूर्वीच दिवाळी साजरी केली
Post a Comment
0 Comments