Type Here to Get Search Results !

संतसूर्य

मंगळवेढा मध्ये सामजिक बांधिलकी 
वृत्तपत्र वितरकांना मोफत सायकल वाटप पार्वती ताड आयटीआय चा स्तुत्य उपक्रम


 मंगळवेढा /संतसूर्य वृत्तसेवा 

ऊन, वारा, पाऊस याची तमा न बाळगता रोज नित्यनियमाने घरपोच वृत्तपत्र पोहोच करणाऱ्या मंगळवेढा शहरामधील वृत्तपत्र वितरकांना मंगळवेढा येथील पार्वती ताड आयटीआय कॉलेज या संस्थेने मोफत सायकल व स्मार्टफोन वाटप करून सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. याप्रसंगी श्री. संत दामाजी कॉलेजचे प्राचार्य डॉ. औदुंबर जाधव, लोकमत सोलापूर आवृत्तीचे वरीष्ठ उपसंपादक डॉ समीर इनामदार,मंगळवेढा नगरपालिका चे माजी नगराध्यक्ष ,संस्थेचे अध्यक्ष पांडुरंग ताड , प्राचार्य प्रवीण रुपनवर, फुगारे गुरुजी , मल्लिकार्जुन देशमुखे, विलास मासाळ, राहुल चेळेकर, विजय भगरे, नितीन जाधव , अशिष गांडुळे,स्वप्नील तरंगे, महादेव घोडके , व्यंकटेश काटकर , आकाश बोडरे, रोहिणी बुरकूल आदी उपस्थित होते.संस्थेचे अध्यक्ष पांडुरंग ताड यांनी वृत्तपत्र विक्रेत्यांना गरज असल्याने त्यांना सायकलचे वाटप केल्याचे सांगताना सायकल चालवण्याचे महत्व विशद केलं. आजच्या तरुणांनी मोबाईलचे वेड कमी करून व्यायामकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. चौकट-- सध्या निवडणुकीचा हंगाम सुरू असून, काहीजणांनी साड्या, भांडी वाटप करण्याचा सर्वत्र सपाटा लावला आहे अशा स्थितीत वृत्तपत्रक वितरकांच्या कष्टाची जाणीव व त्यांची गरज ही ताड संस्थेने ओळखली व संस्थेचे अध्यक्ष पांडुरंग ताड यांनी उपेक्षित असणाऱ्या व गरजू वृत्तपत्र वितरण करणाऱ्या १० तरुणांना मोफत सायकल वाटप करून सामाजिक बांधिलकी जपली असल्याचे ऋण वृत्तपत्र वितरक भारत गवळी यांनी व्यक्त केले. या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे 
 मंगळवेढा येथे पार्वती ताड आयटीआय कॉलेज या संस्थेच्या वतीने वृत्तपत्र वितरकाना मोफत सायकल वाटप करताना संस्थापक अध्यक्ष पांडुरंग ताड, प्राचार्य औदुंबर जाधव,डॉ समीर इनामदार, फुगारे गुरुजी, प्राचार्य प्रवीण रुपनवर, मल्लिकार्जुन देशमुखे, विजय भागरे आदी मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments