भाजप तालुकाध्यक्ष अंबादास कुलकर्णी यांनी जल जीवन योजनेसाठी दिली विना मोबदला जमीन संपूर्ण जिल्ह्यातून कौतुक सुरू
मंगळवेढा/ संतसूर्य वृत्तसेवा
अंबादास कुलकर्णी यांनी ग्रामीण भागातील जनतेला गावातील जनतेला पिण्याचे पाणी लवकर मिळावे यासाठी शासनाच्या योजनेमध्ये जागेची अडचण येत होती यावेळी त्यांनी स्वतःची जागा मोफत शासनाला दिली गटविकास अधिकारी पंचायत समिती मंगळवेढा यांना ही जागा हस्तांतरित करून दिले यामुळे गटविकास अधिकाऱ्यांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला परंतु ग्रामीण भागात आपलेपणाची भावना आजही कायम ठेवणारे अंबादासभाऊ कुलकर्णी यांचे संपूर्ण सोलापूर जिल्ह्यातून भारतीय जनता पक्षाचे नेते कार्यकर्ते यांच्याकडून मंगळवेढा तालुक्यातील सर्वपक्षीय नेते व कार्यकर्ते अधिकारी कर्मचारी यांच्याकडून त्यांचे कौतुक केले जात आहे
Post a Comment
0 Comments