मंगळवेढा/ संतसूर्य वृत्तसेवा
मराठा आरक्षणासाठी महाराष्ट्र विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलवणे बाबत आमदार समाधान आवताडे यांना सकल मराठा समाज मंगळवेढा यांच्यावतीने निवेदन देण्यात आले मराठा आरक्षणाबाबत सत्ताधारी व विरोधक एकमेकांवरती आरोप प्रत्यारोप करून टोलवाटोलवी करत आहेत प्रसारमाध्यमावरती चर्चा करण्यापेक्षा विधानसभेत चर्चा घडवावी मराठायोद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीनुसार मराठा समाजास ओबीसी मधून व 50 टक्के च्या आतून आरक्षण देणे बाबत महाराष्ट्र विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलवण्यात यावे त्यामध्ये मराठा आरक्षणाबाबत प्रस्ताव ठेवावा आणि त्याच्यावर सर्वपक्षीय सर्व आमदारांची चर्चा घडवून प्रत्येक आमदारांनी आपली भूमिका मांडावी व त्याचा एकमुखी ठराव करण्यात यावा आणि या सर्व कामकाजाचे थेट प्रक्षेपण करण्यात यावे अशी मागणी मुख्यमंत्री व विधानसभा अध्यक्षाकडे करावी यासाठी सकल मराठा समाज मंगळवेढा तालुका यांच्यावतीने निवेदन देण्यात आले
Post a Comment
0 Comments