Type Here to Get Search Results !

संतसूर्य

स्वच्छता हीच सेवा अभियानात वारी परिवाराने केले मंगळवेढा न्यायालय चकाचक

मंगळवेढा/संतसूर्य वृत्तसेवा 

महाराष्ट्र शासनाच्या वतीने दिनांक १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोंबर २०२४ या कालावधीत सुरु असलेल्या स्वच्छता हीच सेवा या अभियाना अंतर्गत मा उच्च न्यायालय मुंबई यांच्या आदेशानुसार मंगळवेढा येथील दिवाणी व फौजदारी न्यायाधीश एस एन गंगवाल-शाह व सह दिवाणी व फौजदारी न्यायाधीश वृषाली पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दिवाणी व फौजदारी न्यायालय येथे वारी परिवार या सामाजिक संस्थेच्या वतीने स्वछता मोहीम राबवून कोर्टाचा संपूर्ण परिसर चकाचक करण्यात आला रविवारी सकाळी ६.३० ते ८.३० या वेळेत न्यायालयाच्या परिसरातील गवत,काटेरी झूडपे,प्लास्टिक,पालापाचोळा गोळा करून सदर सर्व कचऱ्याची मंगळवेढा स्मशान भूमितील नगरपालिकेच्या खत निर्मिती प्रकल्पामध्ये नेऊन विल्हेवाट लावण्यात आली यावेळी न्यायाधीश एस एन गंगवाल-शाह व सह न्यायाधीश वृषाली पाटील यांना वारी परिवाराच्या सामाजिक कार्याची माहिती देऊन मंगळवेढे भूमी संतांची हे पुस्तक भेट देण्यात आले याप्रसंगी न्यायाधीश एस एन गंगवाल-शाह यांनी वारी परिवाराच्या कार्याचे कौतुक करून स्वच्छता हीच सेवा या अभियानात श्रमदान केल्याबद्दल परिवाराचे आभार मानले याआगोदरही वारी परिवाराने स्वच्छ मंगळवेढा,सुंदर मंगळवेढा करण्यासाठी अनेकवेळा स्वच्छता मोहिमा राबवून संत गाडगेबाबा यांचे विचार नागरीकापर्यंत पोहविण्याचा प्रयत्न केलेला आहे सदर स्वच्छता अभियानात बार असोसिएशनचे अध्यक्ष ऍड उल्हास माने,जयंत पवार,विलास आवताडे,अजित जगताप,दत्तात्रय भोसले, विष्णू भोसले,राजाभाऊ गणेशकर, चंद्रकांत चेळेकर,परमेश्वर पाटील,महादेव धोत्रे,प्रफुल्ल सोमदळे,दत्ता घोडके,माणिक गुंगे,स्वप्निल टेकाळे सोहम घोडके,राजेंद्र नलवडे,नाना भगरे,सुरेश माळी,विनायक कलुबर्मे,सतिश दत्तू,अकील दरवाजकर,बसवराज कोष्टी,सिद्राम जगताप,विश्वनाथ मोरे आदिजण जणांनी सहभाग नोंदविला यावेळी मंगळवेढा नगर परिषद व कर्मचारी यांचे विशेष सहकार्य लाभले

Post a Comment

0 Comments