Type Here to Get Search Results !

संतसूर्य

मंगळवेढ्याचे नाव जागतिक उद्योग व्यवसायात सुवर्ण अक्षराने लिहिणारे उद्योजक वैभव (मालक) नागणे यांना वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन
मंगळवेढा/ विक्रांत पंडित 

जगाच्या अर्थव्यवस्थेत भारतातील तरुणांना मोठी संधी आहे यामुळे तरुणांनी मागे न पाहता राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर यश मिळवण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहिले पाहिजे असे मत मंगळवेढ्यातील जेष्ठ उद्योजक वैभव (मालक) नागणे यांनी दैनिक संतसूर्यशी वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला गप्पा करताना व्यक्त केले. ते म्हणाले जगात बदलते अर्थव्यवस्थेत राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर तरुणांना खूप मोठी संधी उपलब्ध झाली आहे .कोणतीही क्षेत्र निवडल्यानंतर त्या क्षेत्रात प्राविण्य मिळवून जागतिक पातळीच्या दर्जा मिळवणे इतपत कष्ट घेतल्यानंतर यश निश्चित मिळत राहणार आहे मात्र यासाठी जिद्द,
कष्ट ,संयम ,प्रयत्न ,प्रामाणिकपणा, सचोटी याची नितांत गरज आहे वेळ लागेल पण यश निश्चित आहे यश मिळाले नाही म्हणून निराश होण्याची गरज नाही .निराशा परीक्षा पाहत असते .या परीक्षेत पास झाल्यानंतर आयुष्याच्या परीक्षेत ,व्यवसायाच्या परीक्षेत, यशस्वीतेच्या परीक्षेत पास होणे सहज सुलभ होते मात्र अपयशाची कारणे शोधून त्यातून पुढे जाण्याची गरज आहे .मला मार्गदर्शक नाही ,मला भांडवल नाही ,मला कोणी मदत करत नाही, या न्यूनगंड मध्ये राहण्यापेक्षा स्वतः प्रयत्न करून स्वतः पुढे जाण्याची गरज आहे.
मंगळवेढ्यात शिक्षण घेतल्यानंतर सुद्धा राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर व्यवसायात यश मिळू शकते .यशस्वी होऊ शकतो याचा मला आनंद आहे परंतु माझ्याबरोबर चे मित्र व्यवसायिक मित्र सहकारी मित्र भविष्यात भेटणारी मित्र या सर्वांनी एकमेकाला मदत करून आपापल्या व्यवसायाची वाढ करत जाणे आपल्या उद्योग क्षेत्रात वाढ करत जाणे व्यवसायाची गुणवत्तेची वाढ करत गेल्यास यश मिळत राहत जाते त्यात टिकाऊ पणा राहतो यामुळे सध्याच्या बदलत्या राजकीय परिस्थितीत जागतिक पातळीवर आर्थिक व्यवहार आर्थिक पत निर्माण करण्यासाठी विश्वासार्हता निर्माण करावी लागते आज अमेरिकेचा डॉलर अमेरिकेच्या कंपन्या अग्रेसर असल्या तरी चीनने मात्र जगभरातले मार्केट मोठ्या प्रमाणात काबीज केलेले आहेm चीनची प्रगती ही खूप मोठी प्रगती आहे .चीन मधला व्यवसायिकपणा चीनमधील व्यवसाय उद्योग चीनमधील काम करण्याची क्षमता चिनी लोकांची कुवत ही खूप मोठ्या प्रमाणात आहे .त्या ठिकाणची व्यवसायिक गुणवत्ता व्यवसायिक परिस्थिती खूप मोठी आणि वेगळी आहे प्रचंड कष्ट घेतले जातात मात्र त्याच वेळी उद्योग व्यवसाय कंपनी उभा करण्यासाठी संपूर्ण सहकार्य केले जाते .चायना मध्ये प्रकल्प उभा करताना चायना शासन 51 टक्के भाग भांडवल देते .कंपनी मालकाला 49 टक्के भांडवल गुंतवावी लागते .चायना मध्ये प्रकल्प सुरू करण्यासाठी तात्काळ परवानगी मिळते .चायनातील भौगोलिक परिस्थिती पाणी मनुष्यबळ मोठ्या प्रमाणात सहज उपलब्ध होते .वीज मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतील कच्चामाल मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतो .यामुळे कमी कष्टात कमी वेळेत कमी खर्चात उत्पादने केली जातात व त्याची विक्री जगभरात केली जाते चायनात केलेला उत्पादन जगभरात इतरांच्या तुलनेत कमी किमतीत विकले जाते यामुळे जगाची बाजारपेठ चीनच्या उद्योजकांनी ताब्यात घेतली आहे .अगदी खेळणी पासून ते मोबाईल कंपन्यापासून प्रत्येक इलेक्ट्रॉनिक इलेक्ट्रिक क्षेत्रामध्ये चीनचे वर्चस्व आहे हे केवळ सहज शक्य झालेली नाही तर चीनमधील शासन , उद्योजक ,कामगार हा प्रत्येक घटक त्या ठिकाणी सातत्याने प्रामाणिकपणे काम करत असल्यामुळे त्यांना अफाट यश मिळाले आहे 
वाढदिवसाच्या निमित्ताने गप्पा मारता मारत असताना कोणालातरी चांगले म्हणणे किंवा कोणालातरी वाईट म्हणणे हा हेतू नाही परंतु देशाला भविष्यकाळ चांगला आहे येणाऱ्या युवा पिढीला महाराष्ट्र सह भारत देशातील तरुणांना उज्वल भविष्यकाळ असल्यामुळे तरुणांनी चांगले शिक्षण घेणे गरजेचे आहे .पदव्युत्तर शिक्षण घेतल्यानंतर परदेशी भाषेचे ज्ञान घेऊन परदेशात जाऊन देखील आपले व्यवसाय उद्योग उभा करणे शक्य आहे .आता माहिती 
आणि तंत्रज्ञानाच्या युगात गुगलच्या सानिध्यामुळे तुम्हाला जगात कोठेही कधीही सहज जा ये करता येते.
आपल्या देशातील राजकीय परिस्थिती सामाजिक परिस्थिती धार्मिक वातावरण सामाजिक संघटना विविध प्रकारच्या संघटना यांच्यात समन्वय अधिक नसल्यामुळे व शासनामधील अधिकारी सनदी अधिकारी आयएएस आयपीएस या सर्व अधिकाऱ्यांच्या वेगवेगळ्या कारणामुळे भारतात उद्योग उभा करण्यासाठी विलंब होतो .नुसत्या परवानगी गोळा करण्यासाठी दोन वर्षाचा कालावधी जातो त्यानंतर प्रत्यक्ष प्रकल्प उभा करण्यासाठी आनंत अडचणी येतात. त्यावर मात करून प्रकल्प उभा केल्यानंतर कामगार संघटना स्थानिक राजकारण गाव पातळीवरील मतभेद ,जिल्ह्यातील राजकीय मतभेद याचाही परिणाम त्या प्रकल्पावर होतो या सर्व परिणामामुळे महाराष्ट्रात सहजासहजी प्रकल्प उभा राहत नसल्याचे दुर्दैवी चित्र आता दिसू लागले आहे. त्यापेक्षा गुजरात मध्ये अवघ्या सात दिवसात प्रकल्पाला मंजुरी दिली जाते विधीन सेवन डेज मंजुरी,ती एक खिडकी योजना मध्ये मिळते.ही वस्तुस्थिती गुजरात सरकारमध्ये असल्यामुळे अनेक प्रकल्प गुजरात मध्ये जात आहेत बरेच उद्योजक मुंबई येथे राहून सकाळी फ्लाईटने गुजरातला जातात रात्रीच्या फ्लाईटने परत येतात इतक्या सुविधा व संरक्षण गुजरातमध्ये मिळत असल्यामुळे अनेक उद्योजकांची पसंती आता गुजरातला मिळू लागली आहे परंतु मंगळवेढा ,सोलापूर ,पुणे ,मुंबई नाशिक ,औरंगाबाद ,नागपूर महाराष्ट्रातील अनेक भागातील तरुणांना स्वतःचे उद्योग उभा करून चांगला यशस्वी उद्योजक होण्याची संधी आंतरराष्ट्रीय पातळीवर उपलब्ध होऊ लागले आहे यामुळे गाव पातळीवरील राजकारण गाव पातळीवरील सामाजिक वाद यामध्ये अधिक न पडता आपले शिक्षण ,आपले तांत्रिक शिक्षण त्या शिक्षणाचा पुरेपूर लाभ घेऊन आपण स्वतःचे उद्योग प्रकल्प उभा करणे ही आजच्या तरुणा पुढची काळाची गरज आहे .नोकरीची शाश्वती नाही नोकरीत मिळणारा पगार हा निश्चित असला तरी मर्यादित आहे परंतु आपण उद्योजक झालो तर यशस्वी उद्योजक होऊन अनेकांना नोकरी देऊ शकतो अनेकांना मदत करू शकतो यामुळे यशस्वी उद्योजकच व्हावे असा आग्रह वैभव मालक नागणे यांनी दैनिक संतसूर्यशी बोलताना केला. 
मंगळवेढा तालुक्यात किमान हजार ते दीड हजार तरुणांना हाताला काम मिळावे या साठी कतारच्या कंपनीच्या माध्यमातून मंगळवेढ्यात प्रकल्प उभा करण्याचा मानस आहे काही दिवसापूर्वीच कतार कंपनीतील काही अधिकारी मित्र मंगळवेढा ला आली होती तेव्हा त्यांना मंगळवेढ्यातील साईट देखील दाखवण्यात आली आहे भविष्यात नाही तर लवकरच हा प्रकल्प उभा करणार आहे जेणेकरून आपल्या गावातील आपल्या भागातील तरुणांसाठी आपण काहीतरी करू शकलो याचे समाधान यातून मिळणार आहे. 
आयुष्यातील 50 व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा स्वीकारण्यापूर्वी अतिशय कमी बोलणारे ,स्वतःबद्दल कमी माहिती सांगणारे ,व्यवसायाबद्दलच नव्हे तर कोणत्याही बाबतीत चांगले असेल त्याला छान हो ओके म्हणून शुभेच्छा म्हणून सांगणारे जास्त बोलण्याची सवय नसल्यामुळे संयमी असलेले वैभव मालक नागणे यांनी मात्र पन्नासाव्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आपले मन मोकळे करताना सांगितले आठ ते नऊ उद्योग चांगल्या पद्धतीने सुरू आहे 
फार्मा युनिकॉर्न या कंपनी चे काम चांगल्या पद्धतीने चालू आहे जेट क्लास कंपनीच्या माध्यमातून लवकरच एअर टॅक्सी सुरू केली जाणार आहे. आपल्या व्हीसीएन या नोंदणीकृत कंपनीच्या माध्यमातून हा एअर टॅक्सीचा प्रकल्प राबवला जाणार आहे. कतारमध्ये आयटीच्या क्षेत्रात 35000 कामगारांना रोजगार उपलब्ध झाला असून ही कंपनी उत्कृष्टपणे काम करत आहे पुण्यातील स्टील कंपनी दक्षिण मधील तीन राज्यात स्टीलचे पत्रे पुरवत आहे टाटा ,जिंदाल आदि कंपन्यांना आपली कंपनी आपले दर्जेदार पत्रे पुरवत आहे. ही देखील बाब अभिमानास्पद आहे 
पर्यावरण बदलत आहे संदर्भ बदलत आहेत समीकरण बदलत चालले आहेत अशा परिस्थितीत उद्योग क्षेत्रात देखील ग्रुपिंग शिवाय बिजनेस ला आता पर्याय राहिला नाही बिझनेस ग्रुपिंग झाला असून ग्रुपच्या माध्यमातून बिजनेस ला मोठे भवितव्य मिळत आहे 
दरवर्षी चीनमध्ये उद्योजकांची आंतरराष्ट्रीय शिबिर असते मी सुरुवातीपासून जात असल्यामुळे आता मला मेंबरशिप मिळाल्यासारखे झाले आहे .चायना सरकारच्या खर्चाने माझा प्रवासासह सर्व खर्च केला जातो . जग भरातील सुमारे साडेतीन लाख उद्योजक या ठिकाणी येतात या ठिकाणी विचारांची देवाण-घेवाण होते उद्योग व्यवसाय प्रकल्पातील अडीचनी वर चर्चा होते.
चायना मधील एक अनुभव सांगताना वैभव नागणे म्हणाले मी त्या छोट्या उद्योजकाची चर्चा करत होतो दुभाषिक माहिती सांगत होता न राहून मी त्या दुभाषिकेला सांगितले याचा मालक कोण आहे तर कंपनीचा मालक टेबलच्या कोपऱ्याला चहा तिथल्या तिथे तयार करून चहा पिण्यासाठी देत होता. हजारो कोटीचा मालक असलेला तरुण स्वतःच्या बनवून देत होता अधिक माहिती विचारले असता तो तरुण म्हणाला मी नुसते या ठिकाणी उत्पादनाचे काम करतो माझ्या कंपनीचे व्यवस्थापन माझी आई करते तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर तुम्ही माझ्या आईची चर्चा करा असे त्या तरुण उद्योजकांनी सांगितले मला हे यासाठी सांगायचे आहे की चीनमध्ये तरुण उद्योजक काम करत असताना आपल्या उद्योग व्यवसायात आपल्या कुटुंबाला सामावून घेतात .आईला सामावून घेऊन आईच्या माध्यमातून ते व्यवसायावर त्या प्रकल्पावर अधिक लक्ष राहते मुळात चीनमध्ये प्रत्येक काम प्रत्येक प्रकल्प हा काटेकोरपणे पार पाडला जातो गुणवत्तेच्या बाबतीत तडजोड केली जात असल्यामुळे त्यांनी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत बाजी मारली आहे असे नव्हे तर वर्चस्व करून बसले आहेत 
इतके क्षेत्र जरी चीनने काबीज केले असले तरी अमेरिकेच्या डॉलरची अमेरिकन कंपनीची जागतिक बाजारपेठेत उंची असली तरी युरोप खंडातील जर्मनी आयर्लंड फ्रान्स या देशाची प्रगती असली तरी आपल्या देशाने देखील मोठी प्रगती केली आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर भारतीयांना मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे पूर्वीपेक्षा देशात आता अनेक सुविधा अनेक मार्ग अनेक मार्गदर्शन मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाले आहे केवळ महाराष्ट्रासह देशातील तरुणांनी आपल्या ज्ञानाचा पुरेपूर वापर करून मोठी झेप घेण्याची गरज आहे देश महासत्ता होण्यासाठी आपल्या तरुणांनी आपल्यामध्ये जिद्द निर्माण करण्याची गरज आहे माझ्या 50 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने मंगळवेढा सारख्या ग्रामीण भागातील तरुणांनी केवळ निराशे पोटी ,नाराज न राहता आपण देशपातळीवरील जागतिक पातळीवरील यश मिळवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्याची गरज आहे हे लक्षात ठेवून प्रयत्न केल्यास यात स्वतःची प्रगती होणार आहे देशाची प्रगती होऊन देश आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठी उंची घेणार आहे भारत महासत्ता बनवायचा असेल तर मंगळवेढा देशातील सर्व ग्रामीण भागातील तरुणांनी आपली भूमिका अचूक नियमित व वेळेवर ठामपणे निभावण्याची गरज आहे सातत्याने प्रयत्न केल्यास यश निश्चित मिळते एकेकाळी आपल्या देशात अनंत अडचणी होत्या आज देश स्वावलंबी झाला आहे या सर्व परिस्थितीत तरुणांनी आता मागे वळून न पाहता वैयक्तिक मतभेद, सामाजिक मतभेद, राजकीय, अहमपणा बाजूला ठेवून स्वतःची उद्योग क्षेत्रात प्रगती करून घेणे देशाच्या प्रगतीमध्ये मोठे योगदान देणे ही काळाची गरज असल्याचे मत वैभव नागणे यांनी शेवटी व्यक्त केले.

Post a Comment

0 Comments