बेंबळेच्या विवेक पवार यांनी , वेळ दिला फक्त उद्धारासाठी
मंगळवेढा/ संतसूर्य वृत्तसेवा
विवेक जीवराज पवार राहणार बेंबळे, तालुका माढा जिल्हा सोलापूर येथे सामजिक कार्य करत आहेत.त्यांचे कार्य गेले आठ ते नऊ वर्ष महा सेवा केंद्र व आधार सेंटर आहे या माध्यमातून सात ते आठ हजार विधवा अपंग ज्येष्ठ नागरिक यांना सरकारी पेन्शन योजना चालू करून देण्यात मोलाचा वाटा आहे.कसलीच कोणाची अपेक्षा न बाळगता तसेच त्यांचा रक्तगट दुर्मिळ असल्यामुळे बी निगेटिव्ह आहे त्यामुळे 76 जणांना रक्तदान केले आहे तसेच बांधकाम कामगार नोंदणी आतापर्यंत दोन ते अडीच हजार लोकांच्या नोंदणी केले आहेत तसेच चारशे ते पाचशे लग्न विवाह जमवण्याचे काम केले आहे त्यातील तर आंतरजातीय अपंग कुठल्या स्तरावरची लोकांची युवा जमवण्याचे काम केले आहे तसेच आतापर्यंत इतर कार्यातील राज्य पातळीवर राष्ट्रीय तळावर नऊ ते दहा पुरस्कार मिळाले आहेत .
विवेक पवार यांच्या सामाजिक कार्याने बेंबळे करकम टेंभुर्णी आदी भागातील जनतेमध्ये ते लोकप्रिय झाले आहेत केवळ आपण बरे आपले भले हे न पाहता सर्वसामान्य बरोबर अपंग विधवा परितात त्या निराधार ज्यांना मदतीची गरज आहे सहकार्याची गरज आहे अशांना विवेक पवार मदत व सहकार्य करत आहेत एक सामाजिक बांधिलकी त्यांच्या अंगीभुती भिनली आहे. त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना आतापर्यंत अनेक पुरस्कार मिळाले आहेत परंतु पुरस्कारामध्ये त्यांना समाधान नसून सामाजिक कार्य जितके होईल ज्या गोरगरिबाला हसायला मदत करता येणे आणि मदत केल्यानंतर त्यात तो यशस्वी होणे तू यशस्वी झाला म्हणजे विवेक पवार यांना पुरस्कार मिळाल्यासारखे वाटते यामुळे प्रसिद्धीच्या पाठीमागे न लागता केवळ आपले सामाजिक कार्य ते पुढे तेवत आहेत त्यामुळे त्यांचे माढा पंढरपूर करमाळा आदी भागातून कौतुक केले जात आहे.
Post a Comment
0 Comments