मंगळवेढा / संतसूर्य वृत्तसेवा
मंगळवेढा तालुक्यातील सलगर बु. येथील ग्रामस्थ, शेतकरी, महिला-भगिनी, व्यापारी, विविध क्षेत्रातील नोकरदार वर्ग यांच्याशी संवाद व चर्चा करण्यासाठी मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे हे रविवार, दिनांक ८ सप्टेंबर २०२४ रोजी दुपारी २.०० पासून सलगर बु येथे उपस्थित राहून रात्री या गावात मुक्कामी असणार आहेत, अशी माहिती जनसंपर्क कार्यालय मंगळवेढा यांच्यावतीने देण्यात आली आहे.
नियोजित मुक्कामी दौऱ्यात आ आवताडे हे या भागातील विविध विकास कामांची पाहणी करून सुरु असलेल्या विकास कामांचा आढावा घेणार आहेत. त्याचबरोबर आ आवताडे हे येथील स्थानिक ग्रामस्थ, दुध उत्पादक शेतकरी, माजी सैनिक, बचत गट महिला-भगिनी यांच्याशी संवाद साधून त्यांच्या अडी-अडीचणी व समस्या जाणून घेणार आहेत. तसेच या दौऱ्यात ते जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्र, माजी सैनिक संघटना कार्यालय आदी संस्थात्मक ठिकाणी भेटी देत संबंधित अधिकारी, पदाधिकारी व शिक्षकांशी संवाद साधणार आहेत.
आ समाधान आवताडे यांच्या या मुक्कामी दौऱ्यादरम्यान गावातील ग्रामस्थ नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आमदार जनसंपर्क कार्यालय मंगळवेढा यांच्यावतीने करण्यात आले आहे.
Post a Comment
0 Comments