युवा नेते अमित ठाकरे यांच्या हस्ते चांदीची गदा व रोख रक्कम देवून केला सत्कार
मंगळवेढा/ संतसूर्य वृत्तसेवा
मनसे नेते दिलीप धोत्रे यांच्या संयोजनाखाली मंगळवेढा येथे भरवण्यात आलेल्या मनसे केसरी 2024 चा मानकरी मंगळवेढयाचा पै.महेंद्र गायकवाड ठरला असून त्याने दिल्लीचा पै आशिष हुड्डा याला घुटना डावात चितपट केले. 10 मिनिट चाललेल्या या लढतीत तीन वेळा हुड्डा याने डाव सोडण्याचा प्रयत्न केला. विजेता महेंद्र गायकवाड यास चांदीची गदा व पाच लाखाचे बक्षीस देण्यात आले.मनसे विद्यार्थी सेना प्रमुख अमित ठाकरे,मनसे नेते दिलीप धोत्रे यांच्या हस्ते ही कुस्ती लावण्यात आली.
मनसे नेते दिलीप धोत्रे यांच्या संयोजनाखाली मंगळवेढा येथे भव्य कुस्ती स्पर्धेचे येथील इंग्लिश स्कूलच्या मैदानावर आयोजन करण्यात आले होते. या आखाड्यात शेकडो कुस्तीपटूंनी भाग घेतला होता .यावेळी लाखो रुपयांची बक्षिसे देण्यात आली. यावेळी 2 लाख, 1लाख ,50 हजार अशा कुस्त्या लावण्यात आल्या होत्या. मंगळवेढा येथे एवढ्या मोठ्या प्रमाणात कुस्ती मैदान आयोजित करण्यात आल्याने कुस्ती शौकिनानी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. मनसे नेते दिलीप धोत्रे यांच्यासह त्यांच्या टीमने योग्य व नेटके नियोजन केले होते.
यावेळी दिलीप धोत्रे यांनी यावेळी सांगितले की, ग्रामीण भागातील कुस्तीपटूंना आपल्या हक्काचे मैदान मिळावे यासाठी या मनसे केसरीचे आयोजन करण्यात आले असून येत्या काही दिवसात नोकरी महोत्सवाचे आयोजन करणार असून कुस्तीपटूना नोकरी देणार असल्याचे सांगितले. आहे.
यावेळी पंच म्हणून महाराष्ट्र केसरी छोटे रावसाहेब मगर म्हणून काम पाहिले.आखाडा प्रमुख म्हणून मारुती वाकडे, दामोदर घुले, भिमान्ना माळी, सोमनाथ सुर्वे, महेंद्र देवकते यांनी काम पाहीले.स्पर्धेच्या वेळी माजी माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे मनसे नेते दिलीप धोत्रे,मल्लसम्राट रावसाहेब मगर ,महाराष्ट्र केसरी समाधान घोडके, महाराष्ट्र केसरी रावसाहेब मगर, कोल्हापूर केसरी मारुती माळी पंढरपूर केसरी सोमा सुर्वे ,वामन बंदपट्टे ,नाना कदम, भीमराव माळी पवन महाडिक, प्रा येताळा भगत, मनसे चे नारायण गोवे,चंद्रकांत पवार,राजवीर हजारे आदी उपस्थित होते.
यावेळी मनसे नेते अमित ठाकरे यांनी व्यासपीठावर बसण्याऐवजी मैदानात अर्धा तास उभा राहून कुस्त्या पाहत आनंद घेतला व मैदानात मैदानातच उभे राहून भाषण केले.
चौकट -
मनसे केसरी 2024 या
कुस्ती स्पर्धेचे मंगळवेढा येथे प्रथमच आयोजन करण्यात आले होते.तसेच उद्घाटन समारंभासाठी मनसेचे महाराष्ट्राचे युवा नेते अमित ठाकरे यांचे मंगळवेढा येथे प्रथमच आगमन होत असल्याने मनसेच्या कार्यकर्त्यांनी,नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती संध्याकाळी 7वा येथील दामाजी चौकामध्ये अमित ठाकरे यांचे 10 जेसिबीच्या सहाय्याने फुलांची उधळण फटाक्यांची आतिषबाजी, हालग्यांच्या कडकडाटात जोरदार स्वागत करण्यात आले.
चौकट:-
मनसे नेते अमित ठाकरे म्हणाले, शेतकरी, युवक,पैलवान यांचे अडचणी सोडवण्यासाठी आपण प्रयत्न करू असे सांगत त्यांनी मला पैलवानानीआग्रह केला की तुम्ही मैदानात उभा राहिला पाहिजे पण मैदानात जर उभा राहिलं नाही तर यांच्यापैकी जर कोणी फेकून दिलं तर मग मी मुंबईत पोहोचेल. अशी कोपरखळी त्यानी यावेळी मारत पैलवानांच्या अडचणी समजून घेणारा कार्यकर्ता म्हणून दिलीप धोत्रे सर्व परिचित असून त्यांनी केलेले नियोजन कौतुकास्पद आहे राज साहेबांनी जे पाच उमेदवार जाहीर केले त्या पाच मध्ये तुम्ही एक जण आहात तुमच्याकडून साहेबांना काय अपेक्षा आहे हे तुम्हाला माहिती आहे त्यामुळे आपण एकत्र येवून पूर्ण करू अशी ग्वाही त्यांनी दिली.
Post a Comment
0 Comments