पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात मनसेचे दिलीप भाऊ धोत्रे बाजी मारणार
मनसे सैनिकातून आत्मविश्वास
मंगळवेढ्यात आज अमित ठाकरे यांच्या उपस्थितीत जंगी कुस्त्यांचे मैदान
मंगळवेढा संतसूर्य वृत्तसेवा
महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित राजसाहेब ठाकरे यांच्या हस्ते कुस्तीच्या मैदानाचे उद्घाटन होणार आहे .पैलवान महेंद्र गायकवाड विरुद्ध पैलवान आशिष हुडा, पैलवान सिकंदर शेख विरुद्ध पैलवान दीपक कुमार, पैलवान माऊली जमदाडे विरुद्ध पैलवान रोहित दलाल, पैलवान उमेश चव्हाण विरुद्ध पैलवान संग्राम साळुंखे अशा मानाच्या कुस्त्या इंग्लिश स्कूलच्या भव्य मैदानात होणार आहेत अशी माहिती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पंढरपूर मंगळवेढ्याचे अधिकृत उमेदवार दिलीप धोत्रे यांनी दैनिक संत सूर्याशी बोलताना दिली. पंढरपूर मंगळवेढ्यातील नागरिकांच्या मागणीनुसार व कुस्तीप्रेमींच्या इच्छेनुसार मंगळवेढ्यात जंगी कुस्त्यांचे मैदान आयोजित करण्यात आले आहे महाराष्ट्र केसरी उपमहाराष्ट्र केसरी दिल्लीचे पैलवान यांच्या रोमांचक कुस्त्यांचा मुकाबला मंगळवेढेकरांना पाहता येणार आहे आनंद लुटता येणार आहे महाराष्ट्राचे लोकप्रिय नेते महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित साहेब ठाकरे यांच्या हस्ते बक्षीस वितरणाचा कार्यक्रम होणार आहे. आज 22 सप्टेंबर रोजी इंग्लिश स्कूलच्या मैदानावर हा कुस्तीचा फड आयोजित करण्यात आलेला आहे या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पंढरपूर मंगळवेढ्यातील नेते कार्यकर्ते मनसेचे समर्थक मनसेवर प्रेम करणारे नागरिक यांच्यासह अनेक जण हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेत आहेत खुद्द अमित साहेब ठाकरे या कार्यक्रमाला उपस्थित राहणार असल्यामुळे पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील हा कुस्तीचा फड आकर्षक व लक्षवेधक ठरणार आहे.
महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी मनसेकडून अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर झाली आहे पहिल्याच यादीमध्ये पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघांमध्ये दिलीप धोत्रे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे दिलीप धोत्रे यांनी आत्तापर्यंत पंढरपूर मंगळवेढ्यातील मतदारांना चांगल्या पद्धतीने सामंजसपणे राजकीय सामाजिक सांस्कृतिक सर्व प्रकारचे व्यवहार केले आहेत स्वतःची एक विश्वासार्हता निर्माण केली आहे धार्मिक क्षेत्रात मोठी आघाडी घेतली असून मुस्लिम बांधवांना अजमेर यात्रा करून दिली आहे तर हिंदू बांधवांना देखील अयोध्या काशी आधी यात्रेचे नियोजन करून मार्गी लावले आहेत पंढरपूर मंगळवेढ्यातील सर्वसामान्य मतदारांमध्ये दिलीप भाऊ धोत्रे यांचे नाव आपला माणूस म्हणून हक्काने घेतले जात आहे याच पार्श्वभूमीवर पंढरपूर मंगळवेढ्यातील महाराष्ट्राची पारंपारिक कला कुस्तीची परंपरा जोपासण्यासाठी कुस्ती पैलवानांना चांगल्या कुस्त्या पाण्याची सुवर्णसंधी दिलीप भाऊ धोत्रे यांनी उपलब्ध करून दिली आहे कुसत्याच्या स्पर्धेसाठी नामांकित पैलवान नामांकित मल्ल अशा कुस्त्या होणार असल्याने संपूर्ण जिल्हाभरातील कुस्तीप्रेमी या कुस्तीचा आनंद घेण्यासाठी आज रविवारी मंगळवेढ्यात येत आहेत
पंढरपूर मंगळवेढ्याचे विविध प्रश्न मार्गी लावण्यासाठी गेली 30 वर्ष दिलीप धोत्रे सातत्याने प्रयत्न करत आहेत सामाजिक कार्यात त्यांना अधिक रस असल्यामुळे सर्व क्षेत्रात त्यांचे सलोख्याचे संबंध आहेत पंढरपूर शहर व ग्रामीण भागात आपला भाऊ दिलीप भाऊ म्हणून त्यांना ओळखले जाते त्यांच्या कार्याची माहिती आता मंगळवेढा शहर व ग्रामीण भागात होऊ लागली आहे पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात पंढरपूर मतदार संघातून त्यांनी निश्चित विजय होण्याचा निर्धार केला आहे त्याप्रमाणे त्यांना पंढरपुरात जोरदार प्रतिसाद मिळत आहे मंग एवढ्यात देखील आता प्रतिसाद मिळू लागला आहे.
Post a Comment
0 Comments