हळदी-कुंकू व रक्षाबंधनाच्या कार्यक्रमानिमित्त घेतले महिला मेळावे
मंगळवेढा संतसूर्य वृत्तसेवा
पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघांमध्ये स्व महादेव आवताडे प्रतिष्ठान आयोजित केलेल्या रक्षाबंधन कार्यक्रमानिमित्त हळदी कुंकू कार्यक्रमासाठी मतदारसंघातील सुमारे 67 हजार महिलांनी उपस्थिती दर्शवत आ समाधान आवताडे यांना राखी बांधत आशीर्वाद दिले नुकतेच आवताडे प्रतिष्ठान ने पंढरपूर मतदारसंघात प्रथमेश मंगल कार्यालय पंढरपूर, यल्लमा देवी मंदिर परिसर कासेगाव, शनेश्वर मंगल कार्यालय पंढरपूर,मीराबाई मठ पंढरपूर,
श्रीराम मंगल कार्यालय इसबावी तर मंगळवेढा तालुक्यातील मल्लिकार्जुन मंगल कार्यालय सिद्धापूर,तांबोळी मंगल कार्यालय मरवडे,जि प शाळा भोसे,दत्ताजीराव भाकरे प्रशाला आंधळगाव,आप्पाश्री लॉन्स मंगळवेढा या ठिकाणी महिलांचे मेळावे आयोजित करून रक्षाबंधन व हळदी कुंकू कार्यक्रम आयोजित केला होता.
यावेळी बोलताना आ समाधान आवताडे म्हणाले की तुम्ही तीन वर्षांपूर्वी मला आशीर्वाद देऊन विधानसभेत पाठवले तुमच्या आशीर्वादाच्या जोरावर मी दिवसरात्र काम करत असून मतदारसंघात अल्प काळात हजारो कोटींची निधी मंजूर करून आणला आहे. कमी कालावधी मिळाला असताना सुद्धा मी मतदार संघामध्ये दिवस-रात्र झटत प्रामाणिक काम केले आहे. मला मिळालेल्या तीन वर्षांमध्ये एक वर्षे हे कोरोना मध्ये गेले राहिलेल्या दोन वर्षांमध्ये मी फक्त मतदारसंघाच्या विकासासाठी झटत राहिलो प्रत्येक गावात निधी देऊन एक आमदार गावांना किती निधी देऊ शकतो मतदारसंघात किती निधी मंजूर करून आणू शकतो हे माझ्या कामातून या मतदारसंघाने पाहिले आहे वर्षानुवर्षे रखडलेल्या पंढरपूरच्या एमआयडीसीचा प्रश्न असो की, निवडणुकीपुरते पाण्याचे प्रश्न पेटवून मंगळवेढा तालुक्यातील जनतेच्या भावनेशी खेळलेला मंगळवेढा उपसा सिंचन योजनेचा प्रश्न असो..! हे वर्षानुवर्ष धुपत राहिलेले प्रश्न मी मार्गी लावले आहेत. त्याचबरोबर म्हैसाळ उपसा सिंचन चे पाणी मंगळवेढ्याच्या दक्षिण भागात आणले,मान नदीमध्ये टेंभूचे पाणी इतिहासात पहिल्यांदा सोडून मान नदीकाठच्या शेतकऱ्यांनाही दिलासा दिला अशा अनेक प्रश्नांची उकल आमदार समाधान आवताडे यांनी महिला भगिनी समोर करून केलेल्या कामाची यादी वाचून दाखवत ज्या भावाला तुम्ही निवडून दिल त्या भावाने तीन वर्षात काय केले हे तुमच्यासमोर मांडले आहे तुम्ही मला येऊन राखी बांधली आहे त्या राखी चे ऋण मी आयुष्यभर विसरणार नाही मी जे काम केले ते तुमच्यासमोर मांडले आहे तुम्ही स्वतः खात्री करा तुमच्या गावात बदल दिसत असेल तर मला पुन्हा एकदा आशीर्वाद देऊन पाच वर्ष सेवा करण्याची संधी द्या अशी विनंती आमदार समाधान आवताडे यांनी करत कार्यक्रमाला उपस्थिती दाखवल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. आमदार समाधान आवताडे यांनी विधानसभेच्या तोंडावर रक्षाबंधनाची निमित्त साधून आयोजित केलेल्या महिलांच्या हळदीकुंकू कार्यक्रमावर ही विरोधकांकडून टीका होत असून हळदी कुंकू कार्यक्रमाच्या काढून विधानसभेच्या निवडणूक प्रचाराची रंगीत तालीम आमदारांनी सुरू केल्याची चर्चा मतदारसंघात सुरू आहे
Post a Comment
0 Comments