रिकव्हरीप्रमाणे उसाला दर द्यावा, दामाजीचे चेअरमन, व्हाईस चेअरमन व संचालकांना मानधन देण्यात यावे, ठराव मांडणार -----
ऍड भारत पवार
मंगळवेढा/संतसूर्य वृत्तसेवा
दामाजी सरकार साखर कारखान्याचे आज रविवार दिनांक 15 रोजी वार्षिक सर्वसाधारण सभा होणार असून या बैठकीमध्ये सभासद शेतकऱ्याकडून प्रत्येक शेतकऱ्याच्या उसाच्या रिकवरी प्रमाणे दर देण्यात यावा असा ठराव बळीराजाच्या संस्थापक माननीय दामोदर देशमुख व कारखान्याचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, संचालकांना मानधन देण्यात यावे असा ठराव सजग नागरिक संघाचे संजय कट्टे सर मांडणार आहेत अशी माहिती एडवोकेट भारत पवार यांनी दिली
याबाबत बोलताना एडवोकेट भारत पवार म्हणाले की अलीकडच्याj काळामध्ये कारखान्याच्या एफआरपीप्रमाणे दर ठरवण्यात येत आहे त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्यांच्या उसाचे रिकवरी ही वेगवेगळी असू शकते त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याचे रिकव्हरी मोजणे अलीकडे तंत्रज्ञानामुळे सहज शक्य होणार आहे याबाबत मांजरी येथील शुगर इन्स्टिट्यूट मध्ये संशोधन व विचारविनिमय झाला असून त्याबाबतची यंत्रणा ही विकसित करण्यात आलेली आहे ज्याप्रमाणे सध्या दुधाला प्रत्येकाचे फॅट आणि गुणवत्तेप्रमाणे दर दिला जातो त्याचप्रमाणे उसालाही त्याच्या रिकव्हरीप्रमाणे दर दिल्यास उसाच्या टनेज बरोबर रिकव्हरी बाबतही शेतकऱ्यांमध्ये निकोप स्पर्धा होऊन साखर कारखान्यावर चांगलया रिकव्हरीचा वजनदार ऊस मिळेल व कष्ट करणाऱ्या आणि चांगल्या शेतकऱ्यांना योग्य भाव मिळेल
त्यामुळे त्यामुळे उसाच्या रिकव्हरी प्रमाणे व वजनाप्रमाणे योग्य तो शेतकऱ्यांना दर मिळावा अशी मागणी या ठरावा तर्फे बळीराजाचे बळीराजा पतसंस्थेचे संस्थापक चेअरमन माननीय दामोदर देशमुख मांडणार आहेत
तसेच सहकारी सारखा साखर कारखान्यामध्ये चेअरमन व्हाईस चेअरमन व सर्व संचालक मंडळ स्वतःच्या संसाराची घराची कामे सोडून कारखान्याच्या कॉर्नर पाहण्यासाठी प्रचंड वेळ व मेहनत देतात त्यांना बरेच आर्थिक सामाजिक निर्णय घ्यावे लागतात त्यांनी योग्य निर्णय घेतले तरच कारखान्याचा विकास होऊ शकतो व त्यामुळे कारखान्यास चांगले दिवस येतात तर शेतकऱ्यांना चांगला दर मिळतो यासाठी चेअरमन व्हाईस चेअरमन व इतर संचालक जीवापाड मेहनत घेत असतात ही सर्व कामे संचालक मंडळ केवळ सेवा म्हणून निस्पृह पणे करत असतात दामाजी कारखान्यावर फार मोठे कर्ज असून सदरचे कर्ज खेड करून कारखाना कर्जमुक्त करणे हे आव्हान संचालक मंडळापुढे आहे अशा परिस्थितीमध्ये कारखान्यात वेळ देत असताना त्यांच्या स्वतःच्या वैयक्तिक कामाकडे दुर्लक्ष होणे नैसर्गिक आहे माननीय चेअरमन यांना एक लाख रुपये, व्हाईस चेअरमन यांना 50 हजार रुपये व संचालकांना दहा हजार रुपये महिना मानधन देण्यात यावे मानधनाची रक्कम शेतकऱ्या सभासदांच्या
मंजुरीप्रमाणे कमी जास्त करून करून ठरवण्यात यावी कारखाना व सभासद दोघांचाही फायदा होणार आहे सजग नागरिक संघाचे माननीय संजय कट्टे सर मांडणार आहेत
अशी माहिती एडवोकेट भारत पवार यांनी दिली
Post a Comment
0 Comments