कोट्यावधी रुपयाचा निधी आणला म्हणून गाजावाजा केला जात असताना महिलांना साडी वाटप करण्याची वेळ का आली माजी आमदार प्रशांत परिचारक यांचा खडासवाल
मारोळी येथे पांडुरंग परिवारातील कार्यकर्त्यांची विचार विनिमय बैठक
मंगळवेढा (प्रतिनिधी)-
आम्ही शब्द पाळणारे आहोत. खरं बोलण्यापेक्षा बरं बोलणारे जास्त आहेत. त्यांचे राजकारणत चालते.बरं बोलणे एक वेळ,दोन वेळ चालेल, मात्र तिसऱ्या वेळी त्यांना पराभवाला सामोरे जावं लागतं.जो ही निर्णय घेऊ ठामपणे सांगून,बोलून घेऊ. कोणालाही वाऱ्यावर सोडले जाणार नाही.असा विश्वास माजी आमदार प्रशांतराव परिचारक यांनी बोलताना व्यक्त केले.
मारोळी तालुका मंगळवेढा येथील संत बागडेबाबा महाराज मठ येथे झालेल्या कार्यकर्ता मेळावा बैठक पार पडली,याप्रसंगी कार्यकर्त्यांसमोर प्रशांतराव परिचारक बोलत होते.
परिचारक पुढे म्हणाले, गेल्या 30 ते 35 वर्षापासून आमदारकी आमच्याकडे होती.आम्ही कार्यकर्त्याला विश्वासात घेऊन काम करीत असतो, ज्या अपेक्षांनी गेल्या पोट निवडणुकीत पक्षाचा आदेश मानून 80 हजार मते आपणाकडे असतानाही 40 हजार मते घेणाऱ्या उमेदवाराला मदत केल्याने आमदार झाले. मी काय ठेकेदार, कॉन्ट्रॅक्टर, उद्योगपती नाही,परिचारक गटाच्या एकनिष्ठ कार्यकर्त्याच्या सहकार्यामुळे आमदार झाले, विकासाच्या अनेक गप्पागोष्टी आज मारल्या जात आहेत.कोट्यावधीचा निधी आणला म्हणून गाजावाजा केला जातोय.... तर आमदाराला साड्या वाटण्याची वेळ कशी आली... असा सवाल परिचारक यांनी उपस्थित केला.
या बैठकीत श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन शिवानंद पाटील बोलताना म्हणाले, आपले नेते प्रशांतराव परिचारक यांच्या मार्गदर्शनाखाली दामाजी कारखाना चांगला चालवीण्याचा प्रयत्न केला, एकत्रित बसून दामाजी कारखान्याची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी मालकांनी सूचना केल्या होत्या. मात्र आमच्या संचालक मंडळाची लायकी काढण्यात आली होती. परिचारक मालक यांच्या सहकार्याने आज दामाजीचा कारभार सभासदांच्या विश्वासहारतेने चालू आहे. कोणाचेही देणे बाकी नाही, संस्था टिकाव्यात यासाठी मालकांचे मार्गदर्शन लाख मोलाचे आहे. मालकांच्या प्रयत्नातून दामाजी कारखान्याला 94 कोटी रुपये खात्यावर जमा झाले आहेत. दामाजी कारखान्याची आर्थिक व्यवस्था सुधारण्यासाठी मोठी मदत झाली.
तालुक्यात पाणी आणण्याचा गाजावाजा करून डंका वाजविला जातोय, हे पाणी कागदावरच राहणार... प्रत्यक्षात पाणी आल्यानंतर किती शेतकऱ्यांना या योजनेतून पाणी मिळणार याचा विचार होणे गरजेचे आहे.
हक्काचे दोन टीएमसी पाणी मंगळवेढा तालुक्याला मिळणार होते. त्याकडे दुर्लक्ष झाले, गुंजेगाव बंधाऱ्यावरती बॅरेज उभारले असते, तर पाणीसाठा मोठ्या प्रमाणात झाला असता, असे मत पाटील यांनी बोलताना व्यक्त केले.
2024 साठी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आपण सर्वांनी एकजुटीने मंगळवेढा तालुक्यात एक नंबर ला मालकांना मताधिक्य देऊन विजयी करूयात असे मत पाटील यांनी बोलताना व्यक्त केले.
यावेळी जिल्हा नियोजन मंडळाचे माजी सदस्य युन्नुस शेख,तानाजी पवार,कांतीलाल ताटे,एकनाथ होळकर,सुनिल थोरबोले,रणजित जगताप,राजु पाटील,शशिकांत कस्तुरे,बिरा करे आदीनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी दामाजी शुगरचे चेअरमन शिवानंद पाटील,जिल्हा नियोजन मंडळाचे माजी सदस्य युन्नुस शेख,दामाजी शुगरचे संचालक औदुंबर वाडदेकर,पं.स.माजी उपसभापती काशिनाथ पाटील,रामभाऊ माळी,दामाजी शुगरचे संचालक राजेंद्र पाटील,गौरीशंकर बुरकुल,महादेव लुगडे,दिगंबर भाकरे,मारोळीचे सरपंच राजकुमार पाटील,दामाजी शुगरचे माजी संचालक कांतिलाल ताटे,एकनाथ होळकर सर,माजी जि.प.सदस्य नामदेव जानकर शिवाजी नागणे,विठ्ठल बिराजदार सर,मा.सरपंच शिवाजी वाघमोडे,बाबासाहेब पडोळकर,राजु पाटील,मानेवाडीचे सरपंच सिध्देश्वर मेटकरी,रेवेवाडीचे सरपंच बिराप्पा रेवे,तानाजी पवार सर,अशोक माळी,बबलु सुतार,रणजित जगताप सर,रड्डेचे सरपंच सुनिल थोरबोले,अंकुश खताळ,जंगलगिचे सरपंच आमसिध्द चौगुले,शशिकांत कस्तुरे,सिदमल चौगुले,रघुनाथ पडोळकर,संजय बिराजदार,जालिहाळचे सरपंच सचिन चौगुले,येड्रावचे सरपंच संजय पाटील,पौटचे सरपंच हरीदास हिप्परकर,माजी सरपंच भागवत भुसे,माधवानंद आकळे,खुदबुद्दीन शेखा,आप्पासाहेब पाटील,कुमार स्वामी,संजय बिराजदार,संजय वाघमोडे,गोविंद भोरकडे,नागेश कनशेट्टी,सुरेश कोटगोंडे,हणमंत मोरे,पांडुरंग कांबळे,माणिक खटकाळे,बाळु घुंबरे,बापु गरंडे,सुरेश कुलाळ,राहुल गडदे,भाऊसो रेवे,श्रीकांत गणपाटील,शिवाजी गावडे,केराप्पा मेटकरी,बाळु लेंगरे,जयवंत बाबर,हौसाप्पा शेवडे,विष्णू मासाळ,सुरेश पाटीला,चंद्रकांत कांबळे,तानाजी मोटे,मधुकर गरंडे,गोविंद मोरे,अजित पाटील यांचेसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.प्रास्तविक दामाजी शुगरचे संचालक औदुंबर वाडदेकर यांनी केले तर आभार तानाजी पवार यांनी मानले.
Post a Comment
0 Comments