Type Here to Get Search Results !

संतसूर्य

आमदार  समधांदादा आवताडेंनी केली अधिकाऱ्यांची झाडाझडती ,अधिकाऱ्यांना आली जाग , पाणी उपलब्ध करून दिल्याने ग्रामस्थांनी मानले  आभार
मंगळवेढा संतसूर्य वृत्तसेवा 

सलगर बुद्रुक,(जिल्हा सोलापूर): ऐन पावसाळ्यात महिनाभरापासून गावात पिण्यासाठी पाणी विकत घ्यावे लागत आहे.सार्वजनिक पाणी पुरवठा विस्कळीत झाला असून याला जबाबदार अधिकाऱ्यावर कारवाही व्हावी अशी मागणी सलगर बुद्रुक येथील महिलांनी आमदार आवताडे यांच्याकडे केली होती.'आपला आमदार आपल्या गावी' या उपक्रमा अंतर्गत आमदार समाधान आवताडे हे सलगर बुद्रुक या गावात दोन दिवसांच्या दौऱ्यावर आले होते.त्यावेळेस गावात पिण्याच्या व वापराच्या पाण्याबाबत गावातील महिलांनी पाणी मिळत नसल्याची तक्रार आमदारांकडे केली होती.
## आमदारांची आगपाखड अन अधिकाऱ्यांची उडाली भंबेरी -आमदार आवताडे यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन भोसे प्रादेशिक पाणी पुरवठा विभाग व गावचे ग्रामविकास अधिकारी यांना गावातील नागरिकांसमोर उभे केले.ऐन पावसाळ्यात गेल्या महिनाभरापासून गावातील नागरिकांना पिण्यासाठी पाणी आपण जर देत नसू तर आपण भावनाशून्य झालो आहोत का, या हलगर्जी पणाला जबाबदार अधिकारी वर्गाची गाठ माझ्याशी आहे असे ठणकावून सांगून ग्रामस्थांसमोर अधिकाऱ्यांची झाडा झडती घेतली.तसेच येत्या दोन दिवसात गावात पाणी नाही आल्यास होणाऱ्या कारवाहिस आपण स्वतः जबाबदार असणार आहात असे आक्रमक रित्या अधिकाऱ्यांना सांगितल्यावर,दुसऱ्याच दिवशी गावात भोसे प्रादेशिक पाणी पुरवठा विभागाकढुन सार्वजनिक नळाला पाणी सोडण्यात आले.
## महिला वर्ग सुखावला - पाणी नसल्याने गावातील महिलांना पाणी मिळवण्यासाठी खूप त्रास होत होता.पुरुष मंडळी कामावर गेल्यावर महिला पाण्यासाठी डोक्यावर हंडा घेऊन पाण्यासाठी भटकत होत्या.त्यामुळे आमदार गावभेटीसाठी गावात येताच महिलांनी आक्रमक पणे पाण्याचा मुद्दा लावून धरला होता.याबाबत तात्काळ पावले उचलवून आवताडे यांनी नागरिकांच्या समस्येची सोडवणूक केली.

##सौ. स्मिता कुंभार,महिला सलगर बुद्रुक -आमदार साहेब गावात आल्यानंतर पाणी प्रश्नाविषयी बैठकीत गावातील महिलांच्या वतीने मी प्रश्न मांडला होता.आमदारांनी दोन दिवसात पाणी पुरवठा सुरळीत होण्याचे आश्वासन दिले होते.आमदार साहेब दौरा आटोपून गेल्यानंतर दुसऱ्याच दिवशी नळाला पाणी आले.सना सुधीच्या दिवसात पाणी आल्याने आनंद वेगळाच आहे. गावातील सर्व महिलांच्या वतीने आमदार आवताडे यांचे आभार व्यक्त करते.

## प्रसाद काटकर,उपविभागीय अधिकारी ग्रामीण पाणीपुरवठा मंगळवेढा विभाग - कंट्रोल प्यानलचा एबी स्विच खराब झाल्यामुळे पाणी पुरवठा बंद होता.त्यासाठी 40 हजार रुपये खर्च होत.शिवाय माझी नियुक्ती आठ दिवसाच्या अगोदरच या भागात झाली आहे.तरीही आमदार साहेबांच्या आदेशानंतर रात्रभर काम करून लगेचच 12 तासाच्या आतच ग्रामस्थांना पाण्याची व्यवस्था केली आहे.इथून पुढे अखंडित पाणी पुरवठा सुरू राहील.ग्रामपंचायतीने पाणीपट्टी भरून सहकार्य करावे.

Post a Comment

0 Comments