पतसंस्थेने काटकसरीने व पारदर्शकपणे केलेल्याकारभारामुळे संस्थेला दिलेले शाहू महाराजांचे नाव सार्थ ठरले माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे
मंगळवेढा/ संतसूर्य वृत्तसेवा
शाहू शिक्षण संस्था संचलित, शिक्षक सेवक सहकारी पतसंस्थेने काटकसरीने व पारदर्शकपणे केलेल्या कारभारामुळे संस्थेला दिलेले शाहू महाराजांचे नाव सार्थ ठरले असे प्रतिपादन माजी मंत्री तथा शाहू शिक्षण संस्थेचे संस्थापक प्रा. लक्ष्मणराव ढोबळे यांनी शाहू शिक्षण संस्था संचलित शिक्षक सेवक सहकारी पतसंस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभे प्रसंगी व्यक्त केले. पतसंस्थेची 14 वी वार्षिक सर्वसाधारण सभा नूतन चेअरमन सौ क्रांतीताई आवळे मॅडम यांच्या अध्यक्षतेखाली राजश्री लॉन्स कामती बुद्रुक या ठिकाणी पार पडली. यावेळी व्यासपीठावर माजी चेअरमन चिदानंद माळी माजी व्हाईस चेअरमन अंबादास पांढरे, प्राचार्य जयंत डोलारे, विद्यमान व्हाईस चेअरमन सचिन पाटील, विद्यमान संचालक मंडळातील प्राचार्य तानाजी देशमुख, मुख्याध्यापक चंद्रकांत लाड, महेंद्र शिंदे, अशोक केदार, सुरेश मांडवे ,रामचंद्र घोडके, सौ. वर्षा माळी, सौ .रोहिणी पोटफोडे, सचिव नानासाहेब खराडे ,प्रा. श्रीकांत लवटे व संस्थेच्या सर्व शाखांचे प्राचार्य व मुख्याध्यापक उपस्थित होते. संस्थेचे सचिव नानासाहेब खराडे यांनी सन 2023- 24 या आर्थिक वर्षात झालेला संस्थेचा लेखाजोखा सभासदांपुढे मांडला. तसेच चालू आर्थिक वर्षात संस्थेला रुपये 1731634 इतका निव्वळ नफा झाल्याचे नमूद केले. माजी चेअरमन चिदानंद माळी यांनी आपल्या पंचवार्षिक कालावधीत संस्थेच्या सभासदांना शैक्षणिक ,धार्मिक व वैद्यकीय कारणाकरिता त्वरित पतपुरवठा केला असल्याचे मत व्यक्त केले . माजी व्हाईस चेअरमन अंबादास पांढरे यांनी सभासदांकरिता इतर सेवक सहकारी पतसंस्थेप्रमाणे वैद्यकीय योजना राबवणीची मागणी नूतन संचालक मंडळाकडे केली. अध्यक्षीय भाषणात सौ क्रांतीताई आवळे यांनी प्रथमता आपल्यावर चेअरमन पदाकरिता सभासदांनी दाखवलेल्या विश्वासाबद्दल आभार व्यक्त केले व विश्वास सार्थ ठरवण्याचे आश्वासन सभासदांना दिले .संस्था वाढविण्याकरता सभासद वाढवणे. संस्थेचा कारभार संगणीकृत करणे. संस्थेचे कार्यक्षेत्र महाराष्ट्र राज्य करणे व संस्थेला शेड्युल बँकेचा दर्जा प्राप्त करून देणे ही आपल्या संचालक मंडळापुढे उद्दिष्ट असल्याचे स्पष्ट केले. उपस्थितांचे स्वागत प्राचार्य जयंत डोलारे यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. सरिता वाघमारे मॅडम यांनी केले तर आभार प्रदर्शन प्राचार्य तानाजी देशमुख यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी देशमुख प्रशाला व जुनियर कॉलेज कामती बुद्रुक व महात्मा गांधी विद्यालय वाघोली तसेच संस्थेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांनी परिश्रम घेतले.
Post a Comment
0 Comments