47 लाख रुपयांच्या कामाची भूमिपूजन
युवक नेते शैलेश अवताडे यांचा वाढदिवसानिमित्त ग्रामस्थांना भेट
मंगळवेढा संतसूर्य वृत्तसेवा
सोलापूर जिल्ह्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून संत दामाजी नगर ग्रामपंचायत ओळखले जाते जिल्ह्याचे नेते बबनराव आवताडे ,दामाजी कारखाना संचालक सिद्धेश्वर अवताडे, शैलेश अवताडे यांच्या मार्गदर्शनाखाली दामाजीनगर ग्रामपंचायतचे सरपंच जमीर सुतार यांनी कृषी उद्योग संघाचे चेअरमन शैलेश अवताडे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून दामाजीनगर ग्रामपंचायत च्या कार्यक्षेत्रात सुमारे 47 लाख रुपयांच विकास कामाचे भूमिपूजन करण्यात आले. या कार्यक्रमाला कृषी उत्पन्न बाजार समितीची सभापती सुशील अवताडे यांच्यासह पाठखळ चे सरपंच ऋतुराज बिले ,दामाजीनगर ग्रामपंचायतचे उपसरपंच संजय जगताप, ग्रामपंचायत सदस्य सोमनाथ शिंदे ,अण्णासाहेब आसबे, अमित गवळी, अर्जुन ओमने, विष्णू जावळे ,दिलीप उघाडे, एडवोकेट दत्ताजीराव तोडकरी, संजय माळी ,सत्यजित सुरवसे ,बसवेश्वर माळी ,गणेश ओमने , रजाक पठाण, ज्यापूद्दिन सुतार, युसुफ सुतार ,अजिंक्य भोसले ,स्वप्निल हेंबाडे , वनराई हाउसिंग सोसायटीमधील जिल्हा मध्यवर्ती बँकेचे सेवानिवृत्त शाखाधिकारी श्रीमंत चव्हाण, लेखापरीक्षक दत्तात्रय कोरे, प्रगतशील शेतकरी संजय गायकवाड, लोकप्रिय सूत्रसंचालक दिगंबर तोडकरी, सेवानिवृत्त मुख्याध्यापक राजाराम केदार ठेकेदार विजय गाढवे, आदर्श शिक्षक कैलास हेगडे ,ज्ञानेश्वर घोडके, ठेकेदार आनंद टोणगे, दीपक पाटील, जयदीप हेंबाडे ,मन्सूर पठाण बबलू माने, इमरान सुतार, मारुती भोसले, दर्याप्पा केनुर, हुसेन मुलानी ,प्रशांत डावरे, जावेद मुजावर, सरताज शेख ,शकील पठाण, रेहान सुतार, रिजवान सुतार ,प्रदीप पवार, वसीम मुजावर ,धीरज माळी ,कर्तव्यदक्ष ग्रामविकास अधिकारी अरुण मोरे यांच्यासह अनेक मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते.
संत दामाजी नगर ग्रामपंचायतच्या नूतन कार्यालयाचे भूमिपूजन यावेळी करण्यात आले 25 लाख रुपये खर्चून मंगळवेढा तालुक्यात सुसज्ज अशी ग्रामपंचायत कार्यालय या ठिकाणी उभे केले जाणार आहे बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्राम अभियान योजना या योजनेतून हा 25 लाख रुपये निधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शासनाकडून मिळाला आहे .अकरा लाख रुपये खर्चून 60 फुटी रोड पर्यंत दयानंद पाटील ते पाटील प्लॉट या रस्त्याचे काम केले जाणार आहे .खासदार निधीतून या रस्त्याचे काम केले जाणार आहे. वनराई कॉलनी मधील दलित वस्ती मध्ये चार लाख रुपये खर्चून सिमेंट काँक्रिटीकरण चा रस्ता करून दिला जाणार आहे. तुकाईनगर मध्ये दलित वस्ती मधून सात लाख रुपये खर्चून या भागातील नागरिकांसाठी रस्ता करून दिला जाणार आहे या ग्रामपंचायतीने ग्रामस्थांसाठी सुसज्ज्ञ अशी कार्यालय इमारत प्राथमिक सुविधा अधिक उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करून पाठपुरावा करून ही कामे मार्गी लावली असल्यामुळे मंगळवेढा तालुक्यात दामाजीनगर ग्रामपंचायत बद्दल कौतुकाने बोलले जात आहे.
Post a Comment
0 Comments