मुज्जामिल काझी यांच्या तक्रारीचे शरद पवारांनी घेतली दखल ,
विचारणा करणार असल्याचे दिले आश्वासन
मंगळवेढा/ संतसूर्य वृत्तसेवा
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांची मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सेंटरला भेट घेतली असता यावेळी त्यांनी शहराध्यक्ष व मतदारसंघ कार्याध्यक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी केलेल्या कामाचा अहवाल पवारांना सादर करण्यात आला. शिवाय मतदारसंघ कार्याध्यक्षपदावरून जिल्हाध्यक्ष बळीराम साठे यांनी आपल्याला पूर्व सूचना न देता दुसऱ्याला संधी दिली याबाबतची तक्रार तक्रार करत साठे यांनी यापूर्वी देखील पदाधिकारी निवडीत इतर पदाधिकाऱ्यांना विश्वासात न शहराध्यक्ष व तालुकाध्यक्ष परस्पर निवडी केल्या व निवडीनंतर हात वर करण्याचा प्रकार केल्याचे त्यांच्या कानावर घातले झाले. याशिवाय आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून विठ्ठल कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत पाटील यांना उमेदवारी द्यावी अशी मागणी केली असता अध्यक्ष पवार यांनी अभिजीत पाटील यांनी लोकसभेला काय केले असा प्रतिप्रश्न केला त्यावर मुजम्मिल काझी यांनी साहेब जे काय केले व कशासाठी केले हे आपल्याला माहित आहे. मात्र त्या भागातील कार्यकर्त्याची मागणी आहे की अभिजीत पाटील यांना पंढरपूर-मंगळवेढा विधानसभेसाठी संधी द्यावी त्या संदर्भात विचार करावा व याकरीता मंगळवेढा-पंढरपूर तालुक्यातील विविध ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सदस्य, आजी-माजी नगरसेवक, पक्षाचे पदाधिकरी शिष्टमंडळाला त्या संदर्भात भेटणेस वेळ द्यावा अशी विनंती केली त्यावेळी पवारांनी स्मित हास्य करत निरोप देतो असे उत्तर दिले.
Post a Comment
0 Comments