मंगळवेढा/ संतसूर्य वृत्तसेवा
तालुक्यातील हुन्नूर येथे काँग्रेस तालुकाध्यक्ष प्रशांत पुंडलिक साळे यांच्या मनमानी माध्यमातून अवैधरित्या मुरूम उपसा केल्याचा आरोप कृषी उत्त्पन्न बाजार समितीचे संचालक जगन्नाथ रेवे यांनी केला आहे. सदर विषयासंदर्भात त्यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार केली आहे.
सदर तक्रार अर्जामध्ये त्यांनी म्हटले आहे की हुन्नूर येथील जमीन गट नं ११६ यापैकी औदुंबर तुळशीराम साळुंखे यांचे मालकीची मिळकत क्षेत्र १ हेक्टर ३७ आर गट नं ३६ पैकी अण्णा यशवंत लेंगरे यांचे मालकीची मिळकत क्षेत्र १ हेक्टर १५ आर गट नं ३६ पैकी शंकर ईश्वर पुजारी यांचे मालकीची मिळकतीतून दिनांक १४ ऑगस्ट २०२४ रोजीपासून दिनांक १६ ऑगस्ट २०२४रोजी पर्यंत शासनाकडे कोणतीही रॉयलिटी न भरता तसेच गौण खनिज विभागाकडून कोणतीही परवानगी न घेता मुरूम उत्खनन करून सदरचा मुरूम प्रशांत पुंडलिक साळे यांच्या जमीन गट नं ४९/१ या मिळकतीमध्ये हॉटेल क्षणभर विश्रांती यांचे शेजारी शेतामध्ये टाकलेला आहे. सदर उत्खननाबाबत गौण खनिज विभागाकडील रीतसर परवानगी घेऊन शासकीय परवानगी घेऊन शुल्क भरणे आवश्यक होते परंतु प्रशांत पुंडलिक साळे हे काँग्रेस पक्षाचे विद्यमान तालुकाध्यक्ष असल्यामुळे ते कोणाशी जुमानत नाही तसेच प्रशासनावर धाक ठेवण्याचा ते प्रयत्न करत आहेत.
त्यामुळेच त्यांनी विनाशुल्क विनापरवानगा बेकायदेशीर मरून उत्खनन करून वाहतूक करून गट नं ४९/१ मिळकतीमध्ये सदरचा मुरमाचा साठा केलेला आहे. तरी वर नमूद प्रकाराचे रीतसर चौकशी करण्यात येऊन सदर बेकायदा उत्खनन केल्याबाबत शेतजमीन गट नं १९६,३६, ४०९/१ तसेच जमीन गट नं ४९/१ या मिळकतीचे व मुरूम उत्खननाचे पंचनामे करण्यात येऊन त्यांच्याविरोधात फार दंडात्मक कारवाई करण्यात यावी अशी मागणी जगन्नाथ रेवे यांनी केली आहे.
Post a Comment
0 Comments