मंगळवेढा / संतसूर्य वृत्तसेवा
ग्रामीण रुग्णालय मंगळवेढा येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वतीने ग्रामीण रुग्णालयासाठी केलेल्या आरोग्य सेवेतील उल्लेखनीय कार्याबद्दल वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुलोचना जानकर यांना ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले .
या स्त्रीरोग तज्ञ म्हणून सन 2021 पासून कार्यरत असून सद्यस्थितीत वैद्यकीय अधीक्षक पदाची जबाबदारी सांभाळताना मागील वर्षी 177 सिझरियन तर 312 नॉर्मल डिलिव्हरी रुग्णालयात झालेल्या आहे तर या वर्षी112 सिझेरीन तर 183 नॉर्मल डिलिव्हरी रुग्णालयात झालेल्या आहेत. गोरगरीब रुग्णाला मोफत आरोग्य सेवेबरोबरच दर्जेदार आरोग्य सेवा देण्याबाबत प्रयत्न केला जात असल्यामुळे बाह्य रुग्ण विभाग व आंतर रुग्ण विभाग रुग्णांची लक्षणीय वाढ झाली आहे. रुग्णालयात वेगवेगळ्या संकल्पना राबविल्या जात असून "आयुष गार्डन" तयार करण्यात आली असून दुर्मिळ अशा आयुर्वेदिक वनस्पती, झाडे यांचे योग्य प्रकारे संगोपन केले जात आहे.रुग्णालयीन स्वच्छतेबरोबरच रुग्णांना स्वच्छ पाणी,अंतर रुग्णांना मोफत जेवण, प्रसूतीपूर्व-प्रसूती पश्चात मोफत रुग्णवाहिका सेवा ,बाल स्वास्थ्य विभाग ,आयुष विभाग ,नेत्र तपासणी व मोफत ऑपरेशन, डिजिटल एक्स-रे विभाग, महागड्या रक्त तपासणीची प्रयोगशाळेत मोफत सेवा, संशयित क्षयरुग्नांची मोफत तपासणी व उपचार,एमडीआर तपासणी,HIV तपासणी व बाधितांना मोफत एआरटी उपचार, दंतशल्य चिकित्सा,आदी सर्व विभाग रुग्णालयात चांगल्या पद्धतीने कार्यरत आहेत. त्यामुळे ग्रामीण रुग्णालय हे गोरगरिबांसाठी वरदानच असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
स्वातंत्र्य दिनानिमित्त ग्रामीण रुग्णालयात प्रत्येक विभागामार्फत केलेल्या कामाची रांगोळी, पोस्टर, बॅनर याद्वारे स्पर्धा आयोजित करण्यात आली होती, प्रत्येक विभागामार्फत केलेल्या उत्कृष्ट कामाची मांडणी याद्वारे करण्यात आली होती. विजेत्या कर्मचाऱ्यांचां सन्मान ट्रॉफी व सर्व कर्मचाऱ्यांचां प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला.जिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. महेश कोडलकर व डॉ. निखिल कोडलकर, वैद्यकीय अधिकारी डॉ .रोंगे डॉ.कुंभार यांनी पर्यवेक्षण केले.
या कार्यक्रमास राष्ट्रीय बाल स्वास्थ विभागाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रवीण माने, डॉ. शिरीष कुलकर्णी, डॉ.अनिल चौगुले, डॉ. स्नेहा गंदगे, डॉ. ऋतुजा गायकवाड आयुष विभागाचे डॉ. निखिल जोशी डॉ.रेवता स्वामी, आदिपरिचारिका सुवर्णा सरताळे, फुलन आगलावे ,तेजश्री मेटकरी, वैशाली शिंदे सारिका कोळेकर, काजल धायगुडे सुनिता सातालोलू सुरेखा खरात औषध निर्माण अधिकारी पांडुरंग कोरे, रेश्मा सरडे, अविनाश पट्टणशेट्टी समुपदेशक आबासाहेब नागणे ,प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी सीमा मुलगे ,नेत्रचिकित्सा अधिकारी अनिल यादव, वरीष्ठ क्षयरोग पर्यवेक्षक प्रल्हाद नाशिककर, सिद्धाराम चनशेट्टी बाबासाहेब शिवशरण,मोरे डांगे आदि उपस्थित होते.
..
Post a Comment
0 Comments