Type Here to Get Search Results !

संतसूर्य

कृषी विभागाकडून मंगळवेढ्याचा रानभाजी महोत्सव ,जोरदार प्रतिसाद


मंगळवेढा/संतसूर्य वृत्तसेवा 

 14 ऑगस्ट 2024 रोजी महाराष्ट्र शासन कृषी विभाग कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा अंतर्गत रान भाजी महोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमाचे उद्घाटन माननीय आमदार समाधानदादा अवताडे यांच्या मातोश्री श्रीमती पार्वतीताई महादेवराव अवताडे यांच्या हस्ते करण्यात आले. सदर कार्यक्रमांमध्ये उपस्थित नागरिकांना रानभाज्यांची ओळख होण्यासाठी निसर्गतः कोणत्याही मशागती विना कोणत्याही रसायनिक औषधाच्या किंवा खताच्या विना उगवणाऱ्या विविध रानभाज्यांचे प्रदर्शन रानभाज्याचे आरोग्याच्या दृष्टीने असणारे महत्त्व त्यामध्ये आढळून येणारे नैसर्गिक खनिज जीवनसत्वे इत्यादीची माहिती देणारे माहिती पत्रके प्रत्येक भाजीसोबत ठेवण्यात आली होती. तसेच पारंपारिक चालत आलेला औषधी गुणधर्मानी युक्त रानभाज्यांचाही वेगळा विभाग करण्यात आला होता. विविध आजाराच्या उपचारासाठी औषधी रानभाज्याचा वापर कशा पद्धतीने करावा याबाबत सविस्तर मार्गदर्शन श्री प्रशांत काटे कृषी पर्यवेक्षक मंगळवेढा यांनी केले. 
श्रीमती अवताडे यांनी आपल्या भाषणात उपस्थित सर्व नागरिकांनी रानभाज्या जास्तीत जास्त आहारात समाविष्ट कराव्यात व सुदृढ शरीर राखावे असे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष उपविभागीय कृषी अधिकारी बाळासाहेब लांडगे यांनी आपल्या भाषणामध्ये नवीन पिढ्यातील गृहिणींनी रानभाजींच्या विविध पाककला कराव्यात व कुटुंबातील सर्व सभासदांना त्या खाण्यासाठी प्रोत्साहित करावे तसेच ज्येष्ठ नागरिक यांनी रानभाज्या पचण्यासाठी हलके असल्याने व आरोग्याच्या दृष्टीने उत्तम असल्यामुळे जास्तीत जास्त सेवन कराव्यात असे आवाहन केले. 
सदर कार्यक्रमासाठी मंगळवेढा येथील ज्येष्ठ नागरिक संघाचे सदस्य भजनी मंडळातील सदस्य महिला तसेच प्रगतशील शेतकरी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका कृषी अधिकारी श्री गणेश श्रीखंडे यांनी केले व आभार प्रदर्शन तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक विक्रम सावजी यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी कृषी अधिकारी श्रीमती अश्विनी शिंत्रे मंडळ कृषी अधिकारी राजेंद्र भांगे, बालाजी टेकाळे, नितीन रणदिवे तसेच तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील सर्व कृषी सहाय्यक कृषी पर्यवेक्षक यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments